मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| नवम किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - नवम किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ अज्ञातवास Translation - भाषांतर श्रीसद्गुरुनाथायनमः -- जय जय श्रीयोगनारायणा । जय जय भवगजमदहरणा । जय जय मोहमधुसूदना । सद्गुरुराया ॥१॥देवा ! जन्ममरणाच्या वनीं । मातला संसारगज फिरूनी । सद्वृत्ति - इक्षुदंडिनी । खाई मनसोक्त ॥२॥यातें आतां आवरावें । याचें वनही तोडावें । निज ज्ञानमंदिरीं न्यावें । महाराजा ॥३॥हा न येईसहजपणें । म्हणोनी कांहीं युक्ति योजणें । स्वतेजाचें जाळें पसरविणें । मग सांपडेल ॥४॥सांपडतां न घाली वृत्तिचारा । माया - जलाचा बिंदूही जरा । तेणें निर्बल होउनी खरा । होईल तव अंकीत ॥५॥ऐसा गज वश होता । गंडस्थलीं बैस नाथा मारी अंकुश वा भाता । मार्गीं न्यावया ॥६॥मार्गाचा देई धडा । शिकवी त्यास आज्ञेचा पाढा । मग स्वामिभक्ति बाराखड्या । सहज गिरवील ॥७॥ऐसा तयार होता कुंजर । जीव - अंबारी ठेवी वर । त्यांत सोहं कुमर । बसवी आनंदें ॥८॥मग चिद्रूप - नगरांत । नेई नाथा मिरवीत । ज्ञानरूप प्रासादांत । देई विश्रांती तया ॥९॥तुझ्याविणें संसार - हत्ती । न होई निर्बल श्रीपती । धांव धांव गा गजपती । योगीनाथा ॥१०॥भवाचें भयें झालों हिंपुटीं । मज राहिली नाहीं शक्ती । तुजवर भार टाकिला अंतीं । मायबापा ॥११॥तूं जरी न ऐकसी हे बोल । तरी मग सर्वस्व जाईल । तुझ्या ब्रीदासी लागेल । काळीमा रे ॥१२॥नाथ भासला समोर । दिसली प्रकाशाची कोर । किरणांचे पुंज थोर । मज दाविलें ॥१३॥नाथें दिधली कर्तव्यजागृती । दावीन नवम किरणाप्रती । देवगांवाहून नाथ येती । लासूर ग्रामीं ॥१४॥तेथें वसे लाक्षायनी देवी । जी भक्तांची कामना पुरवी । यात्रा तेथें भरवी । चैत्र कृष्ण पक्षांत ॥१५॥बघाया यात्रेचा सोहळा । जाई हा योगी आगळा । वंदितां देवीला जाहला । शून्याकार ॥१६॥तेथें क्रमून कांहीं काळ । यात्रेंत आले योगपाल । तों ऐकिलें मधुर टाळ । वाटे होई भजन ॥१७॥तेथें गेले योगेश्वर । दिसला एक चमत्कार । बुचड्याचे बोवा सुस्वर । गाती अभिनय करूनी ॥१८॥सजविला वैरणाचा गाडा । त्यांस बैलांचा चौघडा । ‘ जी - जी ’ चा फोडती हंबरडा । चौघेजण ॥१९॥पुरुषासी दिधला स्त्रीवेष । वमन करी विषय - विष । प्रेक्षक वदती भले शाबास । मौज जाहली ॥२०॥त्यास म्हणती तकतराव । हेचि देवाचे उत्सव । शिवदेवी खंडेराव । नाचविती जन ॥२१॥ही यात्रा नोहे देवाची । परी असे विषयसुखाची । परजन ही करिती छी छी । परि लाज न वाटे आम्हा ॥२२॥या विषाचा संसर्ग । करी क्षतयुक्त सर्वांग । बालें अथवा स्त्रीवर्ग । भोगिती दुःख हे ॥२३॥ही नव्हे हो भक्ती । केवळ गमे चैनीची युक्ती । देवासही भ्रष्टविती । ऐशा युक्तीनें ॥२४॥तरी सावध व्हावें बंधूजन । सोडा सोडा हें अधः पतन । कराया कृतीचें खंडण । परहस्तें करवावें ॥२५॥देखोनी यात्रेचें दृश्य । नाथा वाटली देवी प्रत्यक्ष । जाई नमन करायास । तों हांसती इतर ॥२६॥त्या हास्याचें तत्व कळेना । म्हणोनी भ्रमला योगीराणा । धर्मराजासी धर्म जाणा । दुर्योधना अधर्म ॥२७॥पुनरपि जाई मंदिरीं । तों दिसले माळकरी । हातीं विणा टाळ करीं । कांहींच्या ॥२८॥करिती भक्तीचा एक गोल । राहती उभे ते भक्त सकळ । करिती नामाचा कल्लोळ । गाउनी नाचुनी ॥२९॥नाम हेंचि ज्याचें काम । नाम हें जयाचें धाम । नाम हीच विश्रांती परम । त्या महाभागाची ॥३०॥ऐकोनी ही नामगर्जना । नाथ हृदयीं आनंद मावेना । धांवत आला मनमोहन । भजनरंगीं ॥३१॥तेथें देखिलें साधू गंगागीर । चाखिलें ज्यांनीं योगसार । बाह्यांतरीं नामाचा गजर । करिती साधुवर्य ॥३२॥बोवांनीं पाहिला नाथ दृष्टीनें । नाथेंही पाहिलें आपुलेपणें । तारायंत्राचे खुणेनें । ओळखती एकमेकां ॥३३॥भजन सोडोने गंगागीर । नमविती नाथपदीं शिर । म्हणती यावें योगीवर । भजनी रंगावें ॥३४॥नाथें मृदंग घेतला । बोवांच्या कंठी विणा शोभला । ‘ आम्ही आळीकर ’ या अभंगाला । गाई माधवनाथ ॥३५॥अभंग आम्ही अळीकर । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥१॥पायिं गोंविली वासना । तुच्छ केलें ब्रह्मज्ञाना ॥२॥येतां देखें मूळा । वाटे पंढरीचा डोळा ॥३॥तुका म्हणे स्थळ । मग मी पाहीन सकळ ॥४॥ते गगनभेदी सूर ऐकोन । येती तकतरावा सोडून । विसरती देहभान । श्रोतृवृंद ॥३६॥या भजनें अज्ञानरात्र । दवडिली कुणाही नकळत । आनंदाची प्रभात । प्रगटविली ॥३७॥सांगती बोवा भक्तास । हा आहे दिव्य पुरुष । तों धरोनी मनगट साधूस । नेलें नाथें एकीकडे ॥३८॥विनवी मम अज्ञात दिन । आतां थोडे राहिले जाण । तावत्काल प्रगटीकरण । न करीं बंधुराया ॥३९॥तूं माझा जिवलग सोयरा । ऐक एवढा बोल खरा । नको करूं व्रताचा चुरा । साधुवर्या ॥४०॥हंसुनी म्हणती गंगागीरबोवा । सोडीं आतां नाटका या । दावी सत्पथ योगीराया । माधवनाथा ॥४१॥तेथून वणीस पळाला । जेथें वसे सप्तश्रृंगी विमला । म्हणे आतां येथें राहिला । काळ काढूं ॥४२॥या आदिदेवींचीं स्थानें । साडेतीन असती विद्यमान । करिती आर्य - भूपालन । नाना प्रकारें ॥४३॥श्रीमहाकाली देवता । मातापुरीं वसे तत्वता । पुरवी भक्तांच्या आर्ता । कृपाळूपणें ॥४४॥तुळजापूर परम पवित्र । शोभें महासरस्वती तेंथ । करवीरी अंबाबाई प्रत्यक्ष । महालक्ष्मी ॥४५॥सप्तशृंग निवासिनी । बैसे गडावरी जाउनी । देई सर्व सिद्धी लागुनी । साधकासी ॥४६॥या सप्तशृंगगडावरी । नाथ सेवी कल्ककुमारी । न सेवी दुग्धाच्या धारी । कदापीही ॥४७॥आधींच गड बिकट । त्यावरी असती कंटक । वनपशु देती हांक । भयंकर ॥४८॥परी आमुचा योगेश्वर । तेथेंच करी स्वैर संचार । ओढे खोरी वृक्ष थोर । न मानी ॥४९॥कैं भासे झोपडींत । कैं शिरे वृक्षराजींत । कैं भगवतीशीं संयुक्त । दिसे योगीनाथ ॥५०॥देखोनि वृत्ति अफाट । गडवासी जन विस्मित । रोधिती प्रभूची वाट । दर्शनास्तव ॥५१॥परि केव्हां जाई केव्हां येई । सर्वांचे तर्क विफल दावी । प्रिय भक्तांची आस पुरवी । कोठें तरी ॥५२॥एक भक्त होता सुभट । मन करी आपुलें बळकट । साधुरायाची घ्यावी भेट । ऐसी आशा ॥५३॥उभा राहिला दिवसभर । नाहीं जल वा पोटा भाकर । केला पूर्ण निर्धार । प्रभुदर्शनाचा ॥५४॥आली मध्यरात्री निशाचरी । या भक्तश्रेष्ठा भिववी भारी । परी तो निर्भय अंतरी । ध्यास योगीश्वराचा ॥५५॥ऐसा निश्चयी भक्त देखून । नाथें केलें व्याघ्रारोहण । जणूं देवी आली अवतरून । पुरुषवेषें ॥५६॥देखतां ऐसी उज्वलमूर्ती । भक्ता वाटली पूर्ण तृप्ती । ऐसी करी चमत्कृती । माधवनाथ ॥५७॥जरी दुग्धाचा लेश नसे । तरी नाथ तेज उणे नसे । लोक म्हणती साधु ऐसे । न पाहिले ॥५८॥पूर्ण होतां दोन मास । वंदिले श्रीभगवतीस । नाथ येई श्रीनाशिकास । ध्वजारोपणीं ॥५९॥परि वृत्ति नाहीं सोडिली । कोठें स्नान कोठें वस्ती केली । स्वैरपणें तेथेंही संचली । नाथमाता ॥६०॥भूमितल केलें शय्यास्थान । नेसला दिशेचें वसन । ज्ञानामृताचें अन्न । घेई नाथराणा ॥६१॥रविचंद्राचे दीप लावी । नद्यांचें जल सांठवी । वायूचा पंखा हालवी । योगेश्वर ॥६२॥ऐसा देखोनी दिगंबर । लोक येती थोर थोर । कोणा वाटे विभूती थोर । कोणी वेडा ठरविती ॥६३॥वृत्त कळतां चिघ्दनास । तेवी गंगागीर बोवांस । येती धांवत हे परमेश । परमेशाकारणें ॥६४॥विनविती श्रीयोगीराजा । आपुलें वचन पाळा महाराजा । सोडा ऐसी वृत्तिर्भाजा । घ्यावा वेष साजिरा ॥६५॥परि नाथ नसे देहावर । म्हणे न कळे वचन साचार । कोण देता कोण घेता नर । मीच सर्वस्व ॥६६॥मग हांसले ते संत । धरोनी प्रभूचा हात । नेती सत्वर मंदिरांत । लक्ष्मीनारायणाच्या ॥६७॥सांगितले गूज प्रेमें । दाविलीं तयांनीं वर्मे । मग नाथें मंगलधामें । मान्य केली विनवणी ॥६८॥आतां माझा नाथ सद्गुरु । अवतारांत घेईल अवतारू । लीलेंत लीलेचा भास्करू । दावील निश्चयें ॥६९॥प्रगट झालें माझें बीज । आतां घेईल चिन्मय - नीज । जागवील तो ज्ञानराज । जागेपणें ॥७०॥सावध असावें संतजन । पुढील किरणापासून । नाथ कार्याचें अधिवेशन । होईल नाना प्रकारें ॥७१॥नाथ होईल आपुल्यासम । नाथ करील आपुल्यासम । नाथ आपणांतच आश्रम । करील हांसोनियां ॥७२॥इति श्रीमधवनाथदीपप्रकाशे नाथसुविरचिते अज्ञातवासत्यागवर्णनंनाम नवम किरण समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP