मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री माधवनाथ दीपप्रकाश| तृतीय किरण श्री माधवनाथ दीपप्रकाश अनुक्रमणिका आभार प्रथम किरण द्वितीय किरण तृतीय किरण चतुर्थ किरण पंचम किरण षष्टम किरण सप्तम किरण अष्टम किरण नवम किरण दशम किरण एकादश किरण द्वादश किरण त्रयोदश किरण चतुर्दश किरण पंचदश किरण षोडश किरण सप्तदश किरण अष्टादश किरण एकोनविंशति किरण विंशतितम किरणः एकविंशतितमः किरण दीपप्रकाश -द्वाविंशतितम किरण त्रयोविंशतितम किरण चतुर्विंशतितम किरण पंचविंशतितम किरण षड्विंशतितम किरण सप्तविंशतितम किरण अष्टविंशतितम किरण नवविंशतितम किरण त्रिंशत्तम किरण एकत्रिंशत्तम किरण द्वात्रिंशत्तम किरण त्रिस्त्रींशतितम किरण चतुस्त्रिंशतितम किरण पंचत्रिंशतितम किरण दीपप्रकाश - तृतीय किरण Shri Madhavnath Maharaj (1857–1936) was a Hindu saint, of Karvi, Chitrakoot, Madhya Pradesh, who continued the Nath Sampradaya of the famous Navnaths in India. Tags : granthamadhavanathmarathiग्रंथमराठीमाधवनाथ बाललीलाख्यान Translation - भाषांतर श्रीसद्गुरूनाथायनमः : --धन्य धन्य हे सद्गुरू माधवा ! । तव अगाध चरित्र गावया । तुझीच वाणी पाहिजे देवा । इतर ते दुर्बल ॥१॥घेवोनी दिव्य अवतार । भारतभूमीस करिसी पार । दाखवोनी परमार्थ व्यवहार । करिसी पार्था कर्मयोगी ॥२॥होसी सुकुमार रूपधारी । येसी देवकीच्या उदकीं । खेळसी यशोदेच्या घरीं । तारीसी पांडुतनया ॥३॥कोठें जन्म कोठें खेळ । कोठें तुझी वस्ती अचल । कोठें तुझी ज्ञानगंगा विमल । रथावरी ॥४॥कधीं दिससी फकीर । कधीं होसी राजकुमार । कधीं विषयलंपट चोर । कधीं ब्रह्मचारी ॥५॥कधीं होसी तान्हें बाळ । कधीं यौवनसंपन्न वेल्हाळ । गोपींसवें खेळसी खेळ । नानापरी ॥६॥तुझा जन्म हेंचि आश्चर्य । तव कृतीहि नवलतर होय । तुज ऐसें अवतार कार्य । नाहीं आणीकांचें ॥७॥परस्पर विरोधी चरित्र । तुवां दाविलें जगतांत । अंतीं एकचि सूत्रांत । गोविलें रे गोविंदा ॥८॥तूं मायेच्या उदरीं जन्मून । सोऽहं पाळण्यांत निजसी आपण । घेसी चिन्मय निद्रा जाण । जनार्दना ॥९॥तुज झोंके देई माया । म्हणें नीज रे सांवळिया । पाही चिमण्यांचा खेळ नवा । तव शिरीं शोभेल ॥१०॥तुवां गुंफिली बाळलीला माला । ती अपूरीच राहिली वेल्हाळा । म्हणोनी पुन्हां अवतार घेतला । सांग काय ? ॥११॥मज वाते तुझी ही माळ । कल्पांतींहि अपूर्ण राहील । नित्य नवी सुमनें ओंवील । विश्वसूत्रांत ॥१२॥गत किरणीं श्रीमाधव जन्म । आतां ऐका बालपण । वाढे शुक्लेंदु समान । माधव कुमर ॥१३॥दोन मास होतां पूर्ण । येती पांगरीस परतून । करी लीला दैनंदिन । जी पाहतां मन चकित ॥१४॥एक वर्षाचा होता कुमर । न घेई मातेची दुग्धधार । माता पितर चिंतातुर । म्हणती काय करावें आतां ॥१५॥गृहीं धेनू एक होती । तिचें दुग्ध बाळास देती । परीं तेंहि वमन करी शेवटीं । विश्वरूप बालक ॥१६॥करिती अनेक उपचार । गंडे, दोर्यांचा झाला भार । माता करी रुदन फार । म्हणे बालका काय झालें ॥१७॥असतां ऐसे सचिंत । मल्हारदादास झाला दृष्टांत । देतां कपिला धेनूचें दुग्ध नित्य । पचेल तें बालकासी ॥१८॥महत्प्रयासें आणिली कपिला । तिचें दुग्ध देतां बाळा । हंसुनी गटागटां प्याला । लीलाधारी ॥१९॥झालीं पांच वर्षें पूर्ण । माधव बोले मधुर वचन । बाळ - बोल ते ऐकून । सानंद नगरवासी ॥२०॥आधींच सोन्याचे पदक । त्यावरी जडावाचें कौतुक । दिसे सुंदर अधिकाधिक । लोचनासीं ॥२१॥तैसा माधव स्वयेंच सुंदर होता । त्यावरी मधुर वक्ता । मग तो परिजनांचा आवडता । कां न व्हावा ॥२२॥माधवाच्या बांधवगणां । शिकविती पितामह जाणा । पढविती संध्या पूजना । रामरक्षा स्तोत्र ॥२३॥सहजीं लीलेनें माधव । एके दिनीं ऐके सर्व । दुसरे दिनी तेंचि काव्य । म्हणोनी दावी ॥२४॥जाहलीं केवळ वर्षें पांच । अतुल बुद्धिप्रकाश तोंच । पाहुनी चकित झाले साच । परिजन सर्वही ॥२५॥भाऊसी झाला आनंद थोर । म्हणती हा शिशु ईश्वरी अवतार । त्याविण ऐसा दिव्य प्रकार । कोण करील ॥२६॥मग पाचारूनी माधवास । म्हणती धन्य तव मातेची कूस । बसवुनी अंकी त्यास । शिरीं चापटी मारिती ॥२७॥पितामहें ठेवितां कर । बालें केला नमस्कार । म्हणे नका मारूं शिरावर । होईल सर्व विस्मृती ॥२८॥ऐकतां हें वचन । परिजना म्हणती भाऊ हंसून । ब्रह्मरंध्र सर्वांसी कारण । हेंहि तत्त्व कळलें यासी ॥२९॥ब्रह्मरंध्रा करितां ताडण । तें होईल भ्रमित जाण । म्हणोनी न शिक्षा करणें । सांगें माधव ॥३०॥हें तत्व कळलें जया । तो अज्ञ कैसा म्हणावा । परी दृष्ट होईल म्हणोनियां । इतरां न सांगतीं ॥३१॥जो सर्वांच्या दृष्टींत राहे । तयास दृष्ट करी काय । प्रेम हें वेडे करी हृदय । सत्य वचन ॥३२॥परी जेवी तळहस्तीं रवि झांकेना । तेवीं माधवाच्या सद्गुणा । कोणी थांबवूं शकतीना । मायिक सोयरे ॥३३॥पांगरी गांवी शालागृहीं । स्वेच्छेनें माधव जाई । देखोनी एकपाठी मूर्ती ही । गुरुजी होती विस्मित ॥३४॥आठवें वर्ष लागतां बाळा । करिती व्रतबंध सोहळा । गायत्रीचा मंत्र सगळा । माधवें म्हणोनी दाविला ॥३५॥ज्या प्रभूची मूळ गायत्री त्रिपदा । त्यास मंत्राची मर्यादा । वैराग्य ज्याचा लंगोट सदा । त्याच्या कटीं लंगोटी ॥३६॥जो घेई लोकाद्धार - दंडा । तयाच्या करीं देती त्रिदंडा । ज्या कंठी तीनपदरी त्रिवेणी सदा । त्यास यज्ञोपवीत ॥३७॥षडरींच्या करी जो खडावा । तयाच्या पायीं काष्ठ - खडावा । शिरीं ब्रह्मरंध्र टोप नवा । त्यास टोपी उंच घालिती ॥३८॥जो सदा स्वस्वरूपी निमग्न । त्यास सांगती संध्यास्नान । भिक्षा ज्याची अल्लख निरंजन । तो लाडवाची भिक्षा मागें ॥३९॥असो ऐसा संस्कार झाला । माधव बटु वेषें सजला । करी प्रेमें नित्य नियमाला । जणूं वामन अवतरे ॥४०॥पांगरीस श्रीमहादेव मंदिर । तेथें जाई बटु सुंदर । करोनी तेथ समाधि स्थिर । राही आनंद सेवित ॥४१॥कोणा न कळे माधवाची लीला । म्हणती बाळ जातसे खेळाला । जैसें माय यशोदेला । श्रीकृष्णें भुलविलें ॥४२॥माधवाचा खेळ एक । मिळोनी बालकें असंख्य । होई महादेव पूजक । प्रेमभावें ॥४३॥घेवोनी गोपालांचा मेळा । हरहर महादेव या बोला । बोलुनी प्रदक्षिणा घाली सांवळा । आनंदाने ॥४४॥हाच शिवाशिवीचा खेळ । खेळतसे माधवबाळ । मग शिक्षकाची भूमिका चपळ । घेई नटनाथ ॥४५॥नमः शिवाय हा देई धडा । वाजवी सहज चौघडा । करी पूजा बोला बोबड्य़ा । बोलुनियां ॥४६॥चिपळूणकर नामे माधवाचे गुरु । होता तो भाविक नरू । प्रेमें शिकवी माधव कुमरू । गणित विषय ॥४७॥बघोनी माधवाचे गणित । गुरू होती मनीं विस्मित । म्हणती हा जगाचें गणित । सोडवील ॥४८॥एके दिनीं म्हणे माधव । मज शिकवा त्रैराशिक विषय । जयाच्या योगें सुटेल नव । गणित पंथ ॥४९॥सत्रावीचें उदाहरण । मज द्यावें जी सोडवून । मग चौर्यांशी चुकवून । जाईन झणी ॥५०॥ऐकोनी या स्वानुभवी बोला । शिक्षक अंतरी दचकला । म्हणे जो जाणे ब्रह्मांडकला । त्यास काय शिकवूं ॥५१॥मग उत्तर देती माधवास । बाळा ! तूंच सोडवी या तत्त्वास । मी नेणें तुझ्या गणितास । माझें गणित वेगळें ॥५२॥बालयोगी म्हणे शिकवीन । परी पाहिजे एकास एक गुण्य । तें अवगत होतां उदाहरण । सहज शिकवीन ॥५३॥ऐकोनी शिशूचे उद्गार । गुरूचा आनंद उचंबळे थोर । हृदयीं धरिला सुकुमार । माधवबाळ ॥५४॥एकदां गुरुजी चिपळूणकर । शीतज्वरें पीडिलें फार । केले उपाय थोर थोर । परी ते विफल होती ॥५५॥आज्ञापिती शिष्य अण्णासी । तुम्ही जावें भाऊपाशीं । आणावी औषधी बरीशी । जेणे रोगमुक्त होईन ॥५६॥अण्णा होता सुशील शिशु । आणिल्या गोळ्या ज्वरांकुशु । निघाला द्यावया उदासु । तो इतर बालक भेटले ॥५७॥तेंहोती कलियुगीचे शिष्य । म्हणती बरें झालें आम्हास । चुकली शिक्षा चार दिवस । तेवीं अभ्यास कष्टद ॥५८॥नको नको हा गुरुजींचा फेरा । आम्हांस फिरूं नेदी सैरावैरा । घोकंपट्टीचा दिननिशी मारा । आतां सोसवेना ॥५९॥आणवी पुस्तकांचे गठ्ठे । म्हणे पाठ करावे येथें । न ऐकतां मारीन सर्वातें । कोणा खुर्ची, घोडी मिळे ॥६०॥एक म्हणे खंडूच्या मळ्यांत । लागल्या होत्या बोरी बहुत। एकच तोडोनी नकळत । खादले बोर म्यांची ॥६१॥हें वृत्त कळतां गुरुजीला । त्याच बोरी खालीं नेई मजला । पाठीवरी छड्या मारिल्या । म्हणे त्वां चोरी केली ॥६२॥म्हणोनि त्यास देवें दिधला मार । आतां खेळूं चला हो स्वैर । न करावा औषधोपचार । सांगती अण्णास ॥६३॥ऐकतां बाळांचा संकेत । कळवळला माधव सत्पुत्र । मनीं म्हणे हा अनर्थ । ओढवला हो ॥६४॥सर्पास दुग्ध पाजितां । तो गरळ वमन करी तत्वतां । तेवीं हे शिशु अपकारता । उपकार्यासी करिती ॥६५॥शिक्षक हा माळी केवळ । लावी फुलांचा बाग विशाळ । जैसें बीज तैसीं येतील । फलें फुलें ॥६६॥शिक्षक ऐसा उपकारी । नाहीं दुजा भूवरी । जो पशुवृत्तीतें विचारी करी । स्वयें कष्टुनी ॥६७॥माधव विनवी सवंगड्यास । नका ठेवूं ऐशा कुविचारास । गुरु हाची आपणास । सन्मार्ग दावी ॥६८॥करी नानापरी विद्यादान । आपणास देई मनुष्यत्व आणून । हे उपकार विस्मरून । जातसां आडरानीं ॥६९॥तुम्ही न करितां विद्यार्जन । खेळतां आडमार्गीं जाऊन । म्हणोनी देती अंजन । शिक्षारूपें गुरुराज ॥७०॥परी न ऐकती कोणीहि । म्हणती हा पोकळ ज्ञानी पाही । उगीच करी लंपडावी । पट्टशिष्य म्हणवी ॥७१॥अहो शालागृहरूपी कारागारीं । गुरुजी हा असे अधिकारी । माधवा त्वां केलीस चोरे । जा बैस तेथेंच ॥७२॥आम्ही न देऊं तया औषध । होवो तो खुशाल बेशुद्ध । देखोनी शिशूस कर्तव्यमूढ । माधव योजी उपाय ॥७३॥म्हणे मी करितों मृत्तिकेच्या गोळ्य़ा । त्या तरी द्याव्या गुरुजीला । हा विचार पसंत झाला । सर्व बाल मंडळा ॥७४॥गेला तुलसी वृंदावनीं । काढिली मृत्तिका हंसुनी । पाही कृपा दृष्टी करोनी । करी गुटिका चार ॥७५॥गुटिकांस तुलसीचें अनुपान । घेतां एक एक रात्रंदिन । उद्याच जाईल ज्वर पळून । सांगा संदेश भाऊंचा ॥७६॥बालें म्हणती हा शुद्ध वेडा । मृत्तिकेनें केवीं जाईल ताप एवढा । परी अनायासें मिटतां लढा । कां न तोडावा ॥७७॥दिल्या मृण्मय गोळ्या नेऊन । केल्या गुरुजींनीं सेवन । गेला ज्वर - राक्षस भिऊन । नवल वाटलें तयासी ॥७८॥जयाच्या दृष्टींत खेळे अमृत । ती मृत्तिकाही अमृत । हा अनुभव यथार्थ । नाथरायें दीधला ॥७९॥दुसरे दिनीं चिपळूणकर । जाती स्वयेंच भाऊचें मंदिरीं । म्हणती नव्हे वटिका संजीवनी खरी । आपण दिधली ॥८०॥भाऊ औषधीचा प्रभाव । तैसाच आहे अभिनव । परी जिव्हां करी रव रव । रसनेवरी ठेवितां ॥८१॥येरू म्हणे न लागली रव रव ठेवितां मुखीं विघुरली सर्व । हें ऐकता बहु आश्चर्य । वाटलें भाऊसही ॥८२॥म्हणती दाखवावें औषध । पाहतां दिसली माती शुद्ध । करी मग पूर्ण शोध । तो अण्णाने कथिलें ॥८३॥ऐकोनी माधवकृति नवलापरी । गुरुजी लोळती चरणावरी । परी तो बाळ - लीला करी । जाई गृहीं पळून ॥८४॥नाना लाघव नित्य करावें । पुन्हां मायेचे पटल घ्यावें । सर्वांस रूपी विसरवावें । हीच लीला प्रभूची ॥८५॥माधव होता सर्वांसी प्यारा । आबालवृद्धांस वाटे सोयरा । उचलोनी कडिये नेती घरां । पांगरीकर जन ॥८६॥कोणी म्हणती आमुचा प्रश्न समज । प्रभु उत्तर देई सहज । कोणा सांगे तव कार्य आज । होणार नाहीं ॥८७॥माधव वदे सत्य वचन । झाला जनांचा भाव पूर्ण । म्हणोनी आज्ञा घेऊन । करिती कार्य ॥८८॥माधवाचा एक मित्र । राणोजी नामे सत्पात्र । पाहोनी दिवस शिवरात्र । त्यास पाचारी मंदिरीं ॥८९॥सांगितला शिव पंचाक्षरी मंत्र । म्हणे हा जपतां सतत । तूंची शिव होऊनी समस्त । जन उद्धरशील ॥९०॥त्या दिवसा पासोन । राणोजी करी जप - पारायण । झाला शिवभक्तोत्तम जाण । भूत भविष्य वर्तवी ॥९१॥महाशिवरात्री दिनीं । भरवी यात्रा राणोजी मुनि । अनेकांचीं दुःखे दारुण । करीं निवृत्त तो ॥९२॥देखोनी हा मायेचा बाजार । माधव म्हणें त्या कुमरा । हा नको रे जोजार । तुज नरकीं नेईल ॥९३॥सर्व नोर्धन हेंची साधन । आधीं करी रे साध्य जाण । ऐकोनी सद्गुरूचें वचन । राणोजी स्तब्ध जाहला ॥९४॥पांगरी गांगीं यात्रेचा क्रम । अद्यापीहि चाले उत्तम । प्रचीत पहावी जाऊन । सर्व श्रोतयांनीं ॥९५॥धन्य माझा सद्गुरूनाथ । जो बालपणींच सत्य । करी सवंगड्यासी कृतार्थ । आश्चर्य हें बहुत ॥९६॥अथवा येथ आश्चर्य काय । जो सर्वाभूतीं स्वयमेव । स्थिरचर हें जयाचें अवयव । तया अशक्य काय ॥९७॥जो आहे अवस्थातीत । त्यात बालथोरपण हें व्यर्थ । नाम देउनी अज्ञान प्रगट । करणें योग्य नव्हे ॥९८॥हे प्रभूच्या मायेचे खेळ । तीच सर्व कृत्यांचें मूळ । परमात्मा स्वयें अचल । राहातसे ॥९९॥याच मायेची भ्रांती । निरसावया जगजेठी । अवतरे आर्य - भूवरती । मानवरूपें ॥१००॥त्या रूपासी नमस्कार । साष्टांगें करी नाथकुमर । भवाब्धीचें पैलतीर । तोच दावील आमुतें ॥१॥झाला प्रकाशाचा तृतीय किरण । आतां होईल चतुर्थ निरूपण । बाललीलेचा रंग नूतन । दिसेल सकल श्रोतयां ॥२॥श्रीनाथलीला सागरास । आतां भरती येईल खास । तावत्काल तीरास । स्वस्थ राहूं ॥३॥मग पाहूं तयाचे विहार । क्षणांत सान क्षणांत थोर । क्षणांत काढील सुस्वर । लाटांचेहि ॥४॥ती लाट घेऊं अंगावरी । आणू ओलावा सर्व शरीरीं । विकल्पमलाच्या धूरी । धुवून टाकू ॥५॥चला चला हो संतजन । साधूं या पर्वणीचा दिन । नका करूं अनुमान । म्हणे नाथसुत ॥१०६॥इति श्रीमाधवनाथदीपप्रकाशे नाथसुतविरचिते बाललीलावर्णनं नाम तृतीय किरण समाप्तः ॥ N/A References : N/A Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP