मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ३४ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३४ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ३४ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥गुरु म्हणे शिष्यासी । सद्गुरु गुणराशी ।हातीं धरितां शिष्यासी । यत्नें तयासी तारितसे ॥१॥स्वार्थी कळकळे माता । ती नोहे पुत्राकरितां ।शिष्याच्या हिताकरितां । गुरुदेवता कळकळे ॥२॥कितीकही करितां प्रश्न । गुरु नोहे उदासीन ।म्हणे कोणत्याही प्रकारें करून । होवो समाधान शिष्याचें ॥३॥असा कृपाळु दत्त । सांगे अलर्का हित ।पुन: जोडोनी हात । मदालसासुत पुसतसे ॥४॥म्हणे जी सद्गुरुनाथा । सिद्धी ज्या उद्देशिल्या आतां ।ज्यांहीं ये योगभ्रंशता । त्या किती कशा असती ॥५॥त्यांचीं लक्षणें कळतां । त्या ओळखूनी तत्वता ।मी सोडीन तत्वता । म्हणोनी माथा ठेवी पदीं ॥६॥ऐकूनी शिष्याचें वचन । होऊनियां प्रसन्न ।बोले अत्रिनंदन । म्हणे सावधान ऐक तूं ॥७॥पहिली अणिमा दुसरी महिमा । तिसरी होय गरिमा ।चवथी सिद्धी लघिमा । देहसिद्धी ह्या चार ॥८॥प्राप्ती पांचवी प्राकाम्य सहावी । ईशता सिद्धी सातवी ।वशिता जाण आठवी । बरवी विघ्नसंपत्ती आठवी हे ॥९॥आपुल्या देहाहून । जे सूक्ष्म सूक्ष्म म्हणून ।अणुपर्यंत जाण । शरीर आपुलें तसें करवें ॥१०॥जेवढें रूप पाहिजे । तेवढें सूक्ष्म चिंतिजे ।आपुलें शरीर जें । तेणेंच होय तेव्हढा ॥११॥आणिमा सिद्धी हे जाण । शरीर होय लहान ।जसें लंकेंत हनुमान । करी लहान स्वशरीर ॥१२॥तसेंच महत्पदार्थाचें । चिंतन करी तयाचें ।मोठें शरीर होई त्याचें । महिमा सिद्धीचें फळ हें ॥१३॥तसें जड पदार्थाचें । चिंतन करी तयाचें । पर्वतवत् जड त्याचें । हो शरीर्गरिमेचें फळ हें ॥१४॥किंवा इच्छी जें थोरपण । पूज्याचें करितां चिंतन ।तत्समान ये पूज्यपण । हेही महिमासिद्धिफळ ॥१५॥सर्वांचा जो गुरु । जाणावा परमेश्वरु ।तच्चिंतनीं होई सर्वगुरु । गरिमेचें फल हेंही ॥१६॥जें लघु कापसासारखें । तच्चिंतनें शरीर हो हलकें ।लघिमाफल हें ऐके । ह्या चार देहसिद्धि ॥१७॥थोडा पदार्थ असून । पाहिजे तितुक्याला वांटून ।न व्हावा सर्वथा न्यून । प्राकाम्यसिद्धीचें फल हें ॥१८॥दूरच्या पदार्था स्पर्श करणें । किंवा दूरचा पदार्थ आणणें ।हें प्राप्तिसिद्धीनें घडणें । चंद्रा शिवे अंगुलीनें कीं ॥१९॥भूतभौतिकाचें ईशन । घडे इच्छामात्रें करून ।ईशत्वसिद्धीचें लक्षण । ईश्वरपणा येतसे ॥२०॥ भूत म्हणजे भूम्यादिक । मनुष्यादिक भौतिक ।वश्य होती हे सकळिक । ही वशिता सिद्धी ॥२१॥वाघा सिंहाचें वाहन । करी सर्पाचें भूषण ।अग्नीचा तुरा खोवून । दाखवी जाण वशितेनें ॥२२॥चाले उदकावरून । खेळे अग्निप्रवेश करून ।राहे जडा चालवून । वशितेचे जाण खेळ हे ॥२३॥ह्या अष्ट महासिद्धी । दहा असती उपसिद्धी ।ह्या वायांच उपाधी । येथे बुद्धी न ठेवावी ॥२४॥आकाशांतून गमन । परकायाप्रवेशन ।इत्यादि उपसिद्धी जाण । येथें मन न लावी तूं ॥२५॥पक्षी उडती गगनांतून । मासे पळती जळांतून ।ही जन्मत: सिद्धी जाण । तीही मिळे योगानें ॥२६॥अंगीं औषधी लावून । अग्नीनें न जळे जाण ।हेही ये योगें घडून । औषधीसिद्धी म्हणती जिला ॥२७॥तप करोनि व्यासादिक । जे दाविती कौतुक ।तेंही योगें साधे ऐक । अशी शक्ती योगाची ॥२८॥जे विश्वामित्रादिक । मंत्रें दाविती कौतुक ।तेही सकळिक । योगसिद्धी देतसे ॥२९॥वाटे जसें जसें स्वयें व्हावें । किंवा वाटे जसें जसें करावें ।योगें तें तें साधावें । परि जाणावें विघ्न तें ॥३०॥धारणा झाल्यावरी । ध्यान करावें अंतरीं ।जें सर्व दोष वारी । तारीं भवाब्धींतून ॥३१॥प्रथम करावें सगुण । इष्टदेवाचें चिंतन ।तें स्थिर करून । मग निर्गुण चिंतावें ॥३२॥म्हणे मदालसानंदन । मला सांगा सगुणध्यान ।जेथें माझें मन । स्थिर होऊन राहील ॥३३॥श्रीदत्त म्हणे राया । ध्यानीं सगुण रूपा या ।तूं धरी माझिया । अभया देईल हें ॥३४॥मी अज अविकार । मी निर्गुण परात्पर ।मी विभू सर्वाधार । परी झालों कुमार ऋषीचा ॥३५॥साधू रक्षावयासी । दुष्टा दंडावयासी ।धर्मा स्थापायासी । या देहासी धरिलें म्यां ॥३६॥भक्तांचें घडावें भजन । म्हणून आलों अवतरून ।स्वप्रकृती घेऊन । अवतरलों मायेनें ॥३७॥षोडश कला नसून । कलावत् ये भासून ।तें हें माझें रूप जाण । सच्चिदानंदघन एकरस ॥३८॥जो कोणी स्नेहानें । अथवा द्वेषानें ।किंवा चिंती भयानें । भावानें माझें रूप ॥३९॥त्याला मिळे सद्गती । हे तो वस्तुशक्ती ।ती न पाहे मती । हें चित्तीं तूं जाण ॥४०॥जरी कां नेणून । अग्नीवरी पडे चरण ।तो न करी दहन । कालत्रयीं न घडे असें ॥४१॥जलबुद्धीनें जरी । अमृतप्राशन करी ।तरी तो न मरे निर्धारी । त्यापरी हें जाण ॥४२॥पतिपुत्रादिक जरी । ब्रह्मरूप असती तरी ।अज्ञानावरण तयावरी । असें निर्धारीं जाणावें ॥४३॥त्याचें होतां ध्यान । न तुटे भवबंधन ।मी असें निरावरण । निर्विकार म्हणून मज ध्यावें ॥४४॥ह्या पायांपासून । करावें चिंतन ।अनुक्रमें करून । स्वरूपध्यान करावें ॥४५॥ध्यान स्थिर झाल्यावरी । चित्त ठेवावें मुखावरी ।मग केवळ हास्यावरी । वृत्ती बरी धरावी ॥४६॥ध्यानें तन्मय होतां । इतर चिंता न उठतां ।ये परमानंदता । ध्येयाकारता होवोनी ॥४७॥हें ध्यान पूर्वीं जरी । सगुण वाटलें तरी ।स्थिर होतां अंतरीं । निर्गुण करी हेंचि अंतीं ॥४८॥ध्येय ध्याता ध्यान । ह्या त्रिपुटीचें भान ।जोंवरी असे जाण । तोंवरी ध्यान म्हणती ॥४९॥मी ध्याता हें ध्यान । हें न राहे भान ।ध्येयाकार होऊन । राहे मन निश्चळ ॥५०॥न उठे अन्य वृत्ती । जेंवी दीप निवांतीं ।तेंवी ध्येयाकारवृत्ती । स्थिर राहे ती समाधी ॥५१॥साधिता ही समाधी । चेष्टा सोडी बुद्धी ।मनासह इंद्रियें तधीं । स्वरूपामधीं लपती ॥५२॥होतां ही समाधी । जाती सर्वोपाधी ।तयान बाधिती कधीं । आधिव्याधी निश्चयें ॥५३॥येणें मनोभंग होई । वासनाक्षयही होई ।संशयसमूह जाई । हातां येई जीवन्मुक्ती ॥५४॥मग नोहे जनन । किंवा वर्धन ।तया न ये मरण । पुनर्जनन मग कैसें ॥५५॥ह्याचा परिणाम नोहे । भूतभौतिकसंबंध नोहे ।तो संसारीं न राहे । न मोहें व्यापिजे तो ॥५६॥तो न भिजे जलानें । न जळे तो अनलानें ।न शोषिजे अनिळानें । शस्त्रानें न तोडिजे ॥५७॥कल्पाचे कल्प मोडिती । किंवा नवे घडती ।असे कितीही होतां पुढती । ह्याची उत्पत्ती मृती न होई ॥५८॥तयांचा सुटे बंध । शब्दादिक जे विविध ।तयांचा नोहे संबंध । राहे सुद्ध स्वरूपीं तो ॥५९॥ह्याला कोणी न भक्षी । ह्याला कोणी न लक्षी ।कोणाला नोहे पक्षी । सर्वसाक्षी निर्विकार ॥६०॥तयाचा एकपणा । न मोडवे कवणा ।अशी ही धारणा । जन्ममरणा निवारी ॥६१॥पेटतां योगानल । रागद्वेषादिक मल ।दग्ध होती तात्काळ । होईं विमल पूर्ववत ॥६२॥जे मळ जळती । ते पुन: न मिळती ।सर्व कर्में टळती । दूर पळती शोक मोह ॥६३॥ब्रह्मस्वरूपीं मिळे । तो पुन: न ढळे ।ऐक्य पावे निश्चयें । बेचाळीस उद्धरूनी ॥६४॥नदीजळ समुद्रीं मिळे । कीं घटाकाश आकाशीं मिळे ।तसा ऐक्यें ब्रह्मीं मिळे । तयाचा वेगळेपणा न होई ॥६५॥ज्ञानी तपस्वी यांहून । योगी हा श्रेष्ठ जाण ।तो केवळ ब्रह्म पूर्ण । तत्समान कोण असे ॥६६॥संसारारण्यदाव । असे योगप्रभाव ।करी द्वैताचा अभाव । म्हणूनी भाव ठेवी तूं ॥६७॥आतां तूं भूपवर्या । सोडूनी इतर कार्या ।जाणूनी योगचर्या । योगाभ्यास करी तूं ॥६८॥अलर्क म्हणे गुरुवर्या । योगवित्तमाचार्या ।मला सांगे योगचर्या । जी आर्या मानिली ॥६९॥ऐकोनी अलर्काचें वचन । म्हणे अत्रिनंदन ।लावूनियां मन । योगचर्यालक्षण ऐक तूं ॥७०॥योगचर्या जाणतां । चित्ता नये खिन्नता ।येऊनी स्वस्थता । सिद्धी मिळे अनायासें ॥७१॥प्रीति वाढवी मान । उद्वेग करी अपमान ।असें मूर्खजन । पाहती अज्ञानवेष्टित ॥७२॥योगी जरी विपरीत । हें घेई मनांत ।सिद्धी तयाचे हातांत । ये निश्चित जाणावें ॥७३॥अमृतदृष्टीनें मान । विषदृष्टीनें अपमान ।मानी जयाचें मन । तया बंधन येईल ॥७४॥म्हणोनी योगीजन । विषयदृष्टीनें मान ।अमृतदृष्टीनें अपमान । मानिती जाण सर्वथा ॥७५॥योगियानें सन्मान । मानावा विषासमान ।होतां अपमान । अमृतासमान मानावा ॥७६॥योगसिद्धी तरीच होय । उलट घेतां बंध होय ।म्हणूनी तुझें हृदय । धरो ही सोय उत्तम ॥७७॥( श्लोक ) ॥ दृक्पूतं विन्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलं ।शास्त्रपूतं वदेद्वाक्यं चित्तपूतं च चिंतयेत् ॥७८॥नेत्रें पवित्र पाहून । मग ठेवावा चरण ।वस्त्रें उदक गाळून । मग पान करावें ॥७९॥शास्त्रशुद्ध जाणून । मग बोलावें वचन ।जेणें शुद्ध होय मन । त्याचें ध्यान करावें ॥८०॥विषयाचें चिंतन । सदा देई बंधन ।करितां ईश्वराचें ध्यान । चित्त पांवन होतसे ॥८१॥आवडी ठेविती तेथें न जावें । श्राद्धगृह वर्जावें ।रजस्वलागृहीं न जावें । भिक्षेसाठीं योग्यानें ॥८२॥होतां यज्ञोत्सव । किंवा देवयात्रोत्सव ।जेथें बहु जमाव । तेथें भिक्षेसी न जावें ॥८३॥स्त्री प्रसूत होतां । किंवा सूतक येतां ।किंवा संस्कार होतां । तेथें भिक्षेसी न जावें ॥८४॥पुत्र होतां एक मास । कन्या होतां चाळीस दिवस । रजस्वला होतां चार दिवस । तेथें भिक्षेस न जावें ॥८५॥पिता मरता एक वर्ष । माता मरतां साहा मास ।त्रिपुरुषा तीन मास । एक मस गोत्रज मरतां ॥८६॥मौंजी विवाह गर्भाधान । झालिया सोळा दिन ।नांदीश्राद्ध होतां एक दिन । तेथें भिक्षेसी न जावें ॥८७॥बाहेर धूम न दिसतां । अग्नी शांत होतां ।लोकही जेवितां । मग भिक्षेसी निघावें ॥८८॥ह्या घरीं अधिक मिळे । ह्या घरीं उणें मिळे ।ह्या घरीं सत्कार मिळे । ह्या घरीं मिळे असत्कारें ॥८९॥असें मनीं न आणावें । सव्यापसव्य न फिरावें ।फिरतां घर न टाकावें । रागद्वेषें करूनी ॥९०॥मोठ्यानें ओरडूं नये । कवाड लोटूं नये ।छिद्रानें पाहूं नये । थोडें म्हणूं नये कदापि ॥९१॥न सांगावे आपुले गुण । न दाखवावी खुण ।एकदा जातां फिरून । मग परतून न यावें ॥९२॥सात दिवस ज्या घरीं । भिक्षा न मिळे त्या घरीं ।न जावें चांडाळापरी । तें घर वर्जावें ॥९३॥निर्वाहापुरती तीन घरीं । मिळतां माधुकरी ।तेवढी पुरी करी । अधिक घेतां चोरी होय ॥९४॥तीन पांच सात घरीं । करावी माधुकरी ।नित्य नित्य त्याच घरीं । न जावें बहु घरें असतां ॥९५॥स्वधर्म न सांडावा । अपमान घडावा ।असा देह वागवावा । न करावा पुष्ट तो ॥९६॥भिक्षा मागोनी अग्निहोत्र । करिती त्याची भिक्षा पवित्र ।पंचयज्ञ न होतां अपवित्र । हें सर्वत्र जाणावें ॥९७॥जो यायावर दांत । ती भिक्षा प्रशस्त ।जे वैदिक शांत । त्यांची भिक्षा मध्यम ॥९८॥अधम यानंतर । करावे माधूकर ।एका घरीं भरपूर । भिक्षा ती न घ्यावी ॥९९॥यवागूभैक्ष्य कण । सत्तु यावक अन्न ।कंद मूल फळ पक्क जाण । दूध ताक आणावें ॥१००॥दिवसा एक वार आणून । देवा नैवेद्य करून । गोडी रुची न पाहून । औषधसमान जेवावें ॥१०१॥अर्ध पोट भरून । जेवावें पथ्य अन्न ।त्याचे निम्में जळ पिऊन । चौथा भाग खुला ठेवावा ॥१०२॥प्राणधारणार्थ आहार । त्याची रुची स्वाद बरोबर ।न पाहतां सत्वर । करावा आहार विचक्षणें ॥१०३॥रात्रीं किंवा उद्यासाठीं । न ठेवावें बांधोनी गांठीं ।न आणावें परासाठीं न कराव्या गोष्टी भिक्षेच्या ॥१०४॥अहिंसा त्याग ब्रह्मचर्य । गुरुसेवा शांति अस्तेय ।लघ्वाहार शौच विनय । स्वाध्याय हे सिद्धि देती ॥१०५॥सारभूत तें घ्यावें । बहु शास्त्र न पढावें ।संग्रहीं मन न लावावें । जनीं असावें उदासीन ॥१०६॥लोटतांही कल्पांत । सर्व विद्या हस्तगत ।न होती म्हणूनी सारभूत । घेऊनी चित्त शमवावें ॥१०७॥योगचर्या ही जाण । येथें ठेवी तूं मन ।येणें साधे ध्यान । होसी पावन राया तूं ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये चतुस्त्रिशोsध्याय: ॥३४॥॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP