मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ५ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ५ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ५ वा Translation - भाषांतर ॥ श्रीदत्त समर्थ ॥गुरु म्हणे शिष्या परीस । गर्ग सांगे अर्जुनास ।जंभ नामें दैत्य खास । भूतळीं वास जयाचा ॥१॥जिंकोनी नृपमंडळ । स्वाधीन केलें भूमंडळ ।तो अजय झाला सबळ । महाखळ दारुण ॥२॥आतां जिंकावें देवांसी । हिसकून घ्यावें स्वर्गासी ।ह्मणोनि एका भृत्यासी । देवांपासी पाठवी ॥३॥देवीं न मानितां सत्वर । मिळवोनियां असुर ।स्वर्गीं आला जंभासुर । समरधीर शूर जो ॥४॥मग देव जावोन । इंद्रा सांगती वर्तमान ।इंद्रे देवसेना घेऊन । दैत्यकंदन आरंभिलें ॥५॥तो संग्राम दारुण । देव घेती दैत्यांचे प्राण ।दैत्या अंगीं नुरे त्राण । अंगी बाण झोंबतां ॥६॥दैत्य करती पलायन । जंभासुरें पाहून ।दैत्यां मागें वळवून । सरसावून ये पुढें ॥७॥पुढें होवोनी जंभासुर । देवां करी जर्जर ।नानाशस्त्रीं देतां मार । ते निर्जर घाबरले ॥८॥न हाटे तो दनुज । थकले सर्व दिविज ।पळतां वाटे लाज । देवराज तें पाहे ॥९॥ऐरावतारुढ होऊन । हातीं वज्र धरून ।इंद्र करी दैत्यमर्दन । दैत्य मरोनि जाती ते ॥१०॥दैत्यांचे देह तोडी । वज्रें मस्तकें फोडी ।वाहनावरोनी पाडी । मोडी हस्तपादादिक ॥११॥करोनी वज्रप्रहार । मूर्च्छित केला जंभासुर ।तथापि तो महाशूर । वेगें सत्वर ऊठला ॥१२॥केलें इंद्रा जर्जर । पळविले निर्जर ।करोनी शब्द थोर । झाला असुर तो विजयी ॥१३॥सर्व दैत्य घेऊन । अमरावतींत जाऊन ।इंद्रपदीं बसोन । इंद्र आपणा म्हणवी तो ॥१४॥देवां भूतळीं घालोन । दिक्पालांचे अधिकार घेऊन ।त्रैलोक्य आपुलेंसे करून । भोगी आपण यज्ञभाग ॥१५॥जेथें देव असती । तेथें दैत्य जावोनी भिडती ।देव मेरुगुहेंत लपती । अन्य गती नसे जयां ॥१६॥सर्व देव मिळोनी । गुरूपाशीं येवोनी ।दु:ख निवेदिती वंदूनी । दीन होवोनी दु:खातुर ॥१७॥गुरो आमुची ही स्थिती । पुढें आमुची काय गती ।शत्रु आम्हां नावरती । खचली मती आमुची ॥१८॥गुरु म्हणे वासवा । कोणी न टाळी दैवा ।जे जें होणार जेव्हां । तें तें तेव्हां होतसे ॥१९॥आतां तुम्हीं सत्वर । जावें सह्यगिरीवर ।तेथें वसे देववर । अत्रिकुमार श्रीदत्त ॥२०॥परमात्मा तपोधन । करी शरणागतरक्षण ।तो करील कृपेक्षण । दु:खहरण शरण तो ॥२१॥जो मनीं धरी धीर । त्याला देईल तो वर ।तुम्ही चला सत्वर । सेवातत्पर होवूनी ॥२२॥तें गुरुवाक्य मानून । गुरुचरण वंदून ।दत्ताश्रमीं देवगण । येऊन भावें वंदिती ॥२३॥दिसे मूर्ती आजानुकर । सर्वावयवीं सुंदर ।अप्रतर्क्य मनोहर । दिगंबर विशालाक्ष ॥२४॥प्रफुल्लकमलमुख । रूप दिसे सुरेख ।कंबुकंठ त्रिरेख । पाहतां सुख अपार ॥२५॥नग्नयुवती मांडीवर । घेवोनियां वारंवार ।चुंबन घेई धरोनि कर । प्रेमभर आणोनि ॥२६॥स्वयें अनघ असोनी । अनघा नामें स्त्रियेलागूनी ।पाचारी जो मद्यपानीं । आसक्त होवोनी मत्त दिसे ॥२७॥असें त्याचें रूप पाहोन । देव दूरी राहून । करिती साष्टांग नमन । न मन दे त्यांकडे श्रीदत्त ॥२८॥श्रीदत्त चालतां चालती । उभा होतां उभे राहती ।बैसतां बैसती । नमन करिती पुन: पुन: ॥२९॥असा बहुकाळ गेला । श्रीदत्तें प्रश्नही न केला ।खेद वाटे देवांला । धिक्कारिती आपणांतें ॥३०॥अहो आम्हां तपोबळ । नाहीं किंवा भावबळ ।म्हणोनी उपेक्षी केवळ । भक्तपाळ हा गोविंद ॥३१॥आतां हाचि निर्धार । येथें टाकूं कलेवर ।जंव न मिळे अभयवर । परमेश्वराचा आम्हांशीं ॥३२॥असें म्हणोनि ते देव । न सोडिती तो ठाव ।होतां त्यांचा दृढ भाव । दत्तदेव बोलतसे ॥३३॥सोडूनियां स्वर्गस्थान । येथें कां केलें आगमन ।कां वाळलें तुमचें वदन । कदन कोणी केलें कीं ॥३४॥ऐसें वचन ऐकून । श्रीदत्ता करूनी नमन ।बोलती होवोनि दीन । ते गीर्वाण दु:खित ॥३५॥जगत्प्रभो देव देव । सर्वज्ञ तूं जाणसी सर्व ।जंभनामा दानव । महावैभव मातला ॥३६॥तेणें आराधुनी भर्ग । घेतला आमुचा स्वर्ग ।तेथें वसवी दैत्यवर्ग । आमुचा मार्ग काय आतां ॥३७॥तेणें घेतले यज्ञभाग । तोच भोगी सर्व भोग ।ज्यावरी शस्त्रप्रयोग । न चाले भंग नसे ज्याचा ॥३८॥तूं तरी परमेश्वर । आम्ही तुझे किंकर ।शर्तूंचा करी संहार । आतां उशीर न लागावा ॥३९॥प्रळयीं हा ब्रह्मांडगोल । न लागतां एक पळ ।जाळिसी एकला सकळ । कायसा वेळ दैत्यदळणीं ॥४०॥आम्ही सर्व गताधिकार । करूं भूमीवर संचार ।होवोनी लाचार जसे नर । तूं कृपासागर तारक हो ॥४१॥ देवा आम्ही तुझे भक्त । तूंच आमुची गती व्यक्त ।आतां त्वत्पदीं झालों सक्त । दु:खमुक्त करी आतां ॥४२॥श्रीदत्त बोले हंसोन । स्त्रीचें उच्छिष्ट खाऊन ।भ्रष्ट झालों मी पीवून । पानशेष दूषित मी ॥४३॥मद्यासक्त मी न वशी । माझी स्थिती झाली अशी ।व्यर्थ तुम्ही मजपासीं । आलेत शीघ्र चला परत ॥४४॥स्त्रीसंयोगें ये पतन । स्त्रीसंभोगें दु:ख दारुण ।दैवें स्त्रीचें उच्छिष्टपान । करोनि भ्रष्ट झालों मी ॥४५॥आतां पुढें काय गती । हेंही येतसे चित्तीं ।धर्माधर्माची नसे खंती । पापपुण्यगणती मग कैंची ॥४६॥असें श्रीदत्ताचें वचन । ऐकोनियां देवगण ।गुरुवचन स्मरून । नमन करूनी बोलती ॥४७॥भगवन् हें तव यथार्थ । जे मायारचित पदार्थ ।ते व्यापिले हा उच्छिष्टाचा अर्थ । भ्रष्ट पदार्थ जीवत्व ॥४८॥मद्य हे मोह प्रमाद । ह्याचा जीव घे स्वाद ।तूं ईश्वर स्वच्छंद । भेदपरिच्छेद तुज नाहीं ॥४९॥तूं अनघ अससी । अनघा हे असे तसी ।तव शक्ती निश्चयेंसी । विद्या तुजसी अभिन्न हे ॥५०॥सूर्याची प्रभा जशी । विप्र आणि चांडाळ यांसी ।स्पर्शितां पुण्य पापाशीं । न घे तशी तव शक्ती ॥५१॥तुझा होतां अनुग्रह । कोण करील निग्रह ।अज्ञार्थ हा धर्मसंग्रह । सुज्ञ आग्रह धरील कीं ॥५२॥श्रीदत्त वदे हें जरी । निश्चित केलें अंतरीं ।दु:ख जाईल दुरी । मिळेल बरी गती सत्य ॥५३॥आतां तुम्ही शीघ्र चला । युद्ध करूनी शत्रूला ।येथें आणा तयाला । निर्वीर्य करीन क्षणार्धें ॥५४॥असें वचन ऐकून । देव करिती वंदन ।शत्रूसमोर जाऊन । धैर्यें रण आरंभिलें ॥५५॥दैत्य बळें मार देती । देव तेथून पळती ।दैत्य पाठीसी लागती । आश्रमा येती श्रीदत्ताच्या ॥५६॥मागें दैत्यही पातले । दत्ताश्रमीं प्रवेशले ।तेथें स्त्रीरत्न देखिलें । ते भुलले पाहून ॥५७॥कनक आणि कांता । भ्रम करिती अबलोकितां ।जे न भुलती तयां तत्त्वतां । पूर्ण मुक्तता जाणावी ॥५८॥जीचीं अंगें सुंदर । पद्मपत्रसम नेत्र ।प्रफुल्ल कमलसें दिसे वक्र । विचित्र गात्र मनोहर ॥५९॥ओंठ बिंबासमान । हिरे भासती रदन ।स्वर्णकलशापरी स्तन । रूपमंडन न वर्णवे ॥६०॥अशी ती सुंदरी नारी । श्रीदत्ताच्या अंकावरी ।बैसली ती त्या असुरीं । पाहिली नेत्रीं मनोज्ञ ॥६१॥दैत्य मोहित होऊन । तिचा अभिलाष धरून ।देवां देती सोडून । होवोनी ते कामातुर ॥६२॥न करितां प्रयत्न । आम्हां मिळालें स्त्रीरत्न ।निर्बळ हे सपत्न । यांचा यत्न कायसा ॥६३॥देव मागें येतील । तरी ते ठार मरतील ।असें बोलोनी दैत्य खल । शिबिका पुढें आणिती ॥६४॥दत्ताच्या मांडीवरूनी । त्या नारीतें उचलोनी ।शिबिकेंत बसवूनी । मस्तकीं घेऊनी चालले ॥६५॥देव तटस्थ पाहती । कांहीं बोलूं न शकती ।दत्त बोले तयांप्रती । नेली सती दैत्यांनीं ॥६६॥दोषांमाजी विशेष । परांगनास्पर्शदोष ।जाळील कुळ नि:शेष । एक निमेष न लागतां ॥६७॥यांहीं केलें महापातक । यांला लागला कलंक ।हतबळ हतश्रीक । उभयलोक भ्रष्ट झाले ॥६८॥साक्षात् लक्ष्मी हे मच्छक्ती । दैत्यमस्तकीं बैसली ती ।तोडोनि त्यांचीं शिरें सती । येईल मागुती सत्वर ॥६९॥ दैत्य झाले मृतोपम । करा यांसी संग्राम ।तुमचा हे एक रोम । न तोडितील निश्चयें ॥७०॥आतां तुम्ही निमित्त मात्र । उठा देव हो सत्वर ।कां लावतां उशिर । न धरा दर हृदयांत ॥७१॥ऐकोनियां असें वचन । देवीं विश्वास ठेऊन ।हातीं शस्त्रें घेऊन । जाऊनि दैत्यां मारिती ॥७२॥कोणी तोडिती पादाग्र । कोणी तोडिती शिर ।कोणी तोडिती कर । पाठीवर मार देती ॥७३॥क्रोधावेशें निर्जर । देती शस्त्रांचा मार ।दैत्यां पाडिती भूमीवर । पूर्व वैर स्मरोनी ॥७४॥केला परस्त्रीसंपर्क । तेंची थोर पातक ।तेणें झाले निस्तेजस्क । महामूर्ख दैत्य ते ॥७५॥जरी देव हाणिती । तरी वरी हात न करिती ।गेली तयांची शक्ती । नाठवीती मंत्रासी ॥७६॥श्रीच्या कृपेनें अमर । जय पावले सत्वर ।मेले ते सर्व असुर । श्रीदत्तवरप्रभावें ॥७७॥मग शक्ती येऊन । दत्ताअंकीं बैसून ।प्रेमें घेई चुंबन । तंव सुरगण पातले ॥७८॥येऊनी वंदिती चरण । दत्त वदे हो देवगण ।तुम्ही करोनियां रण । दैत्यगण मारिले ॥७९॥भयंकर जंभासुर । त्याशीं युद्ध केलें घोर ।मारिले सर्व असुर । विजय थोर घेतला ॥८०॥उभारिला विजयध्वज । धन्य हो तुम्ही दिविज । माझी ही रक्षिली लाज । स्त्रीही आज सोडविली ॥८१॥तुम्हीं केला उपकार । काय करूं प्रत्युपहार । माझे अंगींच तो निर्धार । जिरो अमर शूर हो ॥८२॥ऐसें ऐकोनि वचन । चकित झाले देवगण ।वंदूनी प्रभूचे चरण । गद्गद वचन बोलती ॥८३॥नमो नमस्ते जनार्दन । बोलोनियां कूट वचन ।मोहविसी आम्हां लागून । कार्य करूनी स्वयेंची ॥८४॥जे दैत्य आम्हां बांधिती । ज्यांला कोणी न जिंकिती ।ते मारविले आम्हां हातीं । आमची शक्ती हे नोहे ॥८५॥काष्ठाची बाहुली जेवी । सूत्रधार खेळवी ।जयश्री आम्हां करवीं । घेवविली तेवी दयाळा ॥८६॥आमुची कायसी मती । आमुची कायसी शक्ती ।स्वल्पही नसतां भक्ती । केली मुक्ती आमुची ॥८७॥तूं अससी स्वतंत्र । आम्ही खास परतंत्र ।बांधोनियां कर्मसूत्र । मायायंत्रीं भ्रमविसी ॥८८॥तुझा नेणों अंत पार । तुला जोडूं दोनी कर ।भूमीवर टाकूं शरीर । चरणीं शिर ठेवूं हें ॥८९॥( श्लोक ) जय जय भयहारिन् भक्तचित्तानुसारिन् ।सततविनततारिन् । मर्त्यंकृत्यानुकारिन् ।सायहृदयचारिन् देवदेवाब्जधारिन् ।अवितविनतहारिन् ते नमश्चित्तहारिन् ॥९०॥( ओवी ) । ऐसा स्तवितां श्रीदत्ता । होवोनियां प्रसन्नचित्त ।म्हणे देवहो अप्रमत्त । होवोनी स्वर्गभोग घ्या ॥९१॥मी तुम्हां झालों प्रसन्न । मागोनि घ्या वरदान ।माझ्या भक्तां काय न्यून । मी आसन्न नित्य ज्यांसीं ॥९२॥देव म्हणती विनयेंसी । जरी आम्हां वर देशी ।भक्ती द्यावी निश्चयेंसी । दिवा निशी प्रेमयुक्त ॥९३॥मग तथास्तु म्हणे आत्रेय । देव वंदूनिया पाय ।ज्यांचा टळला अपाय । कांहीं उपाय न करितां ॥९४॥चित्तीं दत्ता चिंतूनी । पुन: पुन: नमूनी ।देव जाती स्वर्गभुवनीं । घेती जाऊनी स्वाधिकार ॥९५॥अद्यापि देवांसह इंद्र । पावूनी आनंद सांद्र ।नित्य दर्शना येती वितंद्र । भावें योगींद्रपदाच्या ॥९६॥गर्ग म्हणे रे अर्जुना । बरवी तुझी वासना ।जाई दत्ताच्या दर्शना । तो कामना पुरवील ॥९७॥होवोनियां नि:संशय । भावें धरितां त्याचे पाय ।केवी घडेल अपाय । हा उपाय वेद सांगे ॥९८॥ऐकोनि गर्गाचें वचन । द्रवलें अर्जुनाचें मन ।भक्त्युत्कंठित होवून । बोले वचन गर्गाप्रती ॥९९॥धन्य धन्य तूं मुनी । अससी कीं महाज्ञानी ।भक्ती उपजविली माझे मनीं । दत्तचरणीं सादरें ॥१००॥मी करतों गमन । द्यावें मला वरदान ।दत्ताचें घडावें दर्शन । हेंची मन चिंतीतसे ॥१०१॥गर्गें तथास्तु म्हणतां । तो अर्जुन धरी पंथा ।एकला सह्याद्रीवरता । येता झाला सत्वर ॥१०२॥जेथें जळ वाहे मंजुळ । वाटे परम शीतळ ।वायु राहे निश्चळ । गाती कोकिळ कोमल स्वरें ॥१०३॥जेथें घनदाटी वृक्षांची । नित्य वस्ती पक्ष्यांची ।समृद्धी हो फलपुष्पांची । दु:खाची नच वार्ता ॥१०४॥जेथें वैर सोडूनी । व्याघ्र धेनु मिळोनि ।एकत्र खेळती त्या वनीं । आश्रम मुनीचा देखिला ॥१०५॥जेवी साजे नंदनवन । तेवीं तें आश्रमस्थान ।तेथें जाऊन अर्जुन । अत्रिनंदनपद देखे ॥१०६॥देखोनी पदचिन्हासी । उल्हास झालल रायासी ।गुरु म्हणे दीपकासी । वर्णितां त्यासी नवल वाटे ॥१०७॥इति श्रीदत्तमाहात्म्ये पंचमोsध्याय: ॥५॥॥ श्रीगुरुदतात्रेयर्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP