मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १६ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १६ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १६ वा Translation - भाषांतर श्रीगणेशाय नम: ॥गुरु म्हणे रे दीपका । जो जगीं दावी कौतुका ।ज्याचे अनुग्रहें बोले मुका । सच्चित्सुखात्मक जो दत्त ॥१॥तेणें साक्षात् उपदेशितां । सिद्धी ये अर्जुनाचे हातां ।कोण मानी या अद्भुता । यन्नाम घेतां भयनाश ॥२॥अर्जुनाचें तें वचन । श्रीदत्तात्रेय ऐकून ।बोले आतां तुझें मन । काय इच्छी सांगावें ॥३॥अर्जुन म्हणे श्रीगुरूसी । आज्ञा होईल जशी ।वागणूक करीन तसी । नाहीं मानसीं अन्य भाव ॥४॥आज्ञा झालिया गुहेंत । जावूनी बैसेन समाहित ।अथवा हें स्वरूप पहात । बसतां चित सुखावेल ॥५॥श्रीदत्त म्हणे अर्जुना । आजी करी संध्यावंदना ।करूनियां भोजना । उद्या आसनावरी बैस ॥६॥तथास्तु म्हणूनी अर्जुन । करी संध्यावंदन ।गुरुप्रसाद सेवून । घालवी दिन सेवेंत ॥७॥दुसरे दिवसीं उठून । नित्यकर्म करून । श्रीदत्तातें वंदून । गुहेंत जावून बैसला ॥८॥करूनी मनाचें समाधान । सुषुम्णामार्ग धरून ।ब्रह्मरंध्रीं प्राण नेवून । लीन होवून राहिला ॥९॥तीन मास सतत । जाहला समाधिस्थ ।पुन: षण्मासपर्यंत । समाधिस्थ जाहला ॥१०॥पुन: एक वर्षपर्यंत । अर्जुन राहतां समाधिस्थ ।येवूनीयां श्रीदत्त । म्हणे हा उत्थित न होय ॥११॥राहिलें स्वत: उत्थान । म्हणूनी शिरीं कर ठेवून ।समाधी तयाची उघडून । उठविला बळें श्रीदत्तें ॥१२॥प्रयत्नें देहावरी । अर्जुन तो ये जरी ।तयाचीं इंद्रियें अंतरीं । ओढ घेती स्वरूपीं ॥१३॥अंत:करण न फिरे । तेव्हां मग योगिवरें ।स्वेच्छेनें फिरविलें सारें । प्राणेंद्रियांत:करणग्राम ॥१४॥हळू हळू अंगें हालवून । देहावरी आला अर्जुन ।हळूच नेत्र उघडून । करी दर्शन गुरुपदाचें ॥१५॥होतां पदाचें दर्शन । अर्जुन झाला तल्लीन ।समाधिसुख विसरून । नेत्र ताटून पाहतसे ॥१६॥माशी जगी गुळावरी । चिकटे तशी चरणावारी ।अर्जुनाची दृष्टी निर्धारीं । चिकटून राहिली निश्चळ ॥१७॥जसी कां पतिव्रता नारी । जरी पती निवारी तरी ।न होतसे दूरी । भावें धरी पतिचरणातें ॥१८॥तसा निवारितां अर्जुना । त्याची दृष्टी फिरेना ।मग हातीं धरूनी गुरुराणा । बैसवी अर्जुना स्वसंनिध ॥१९॥श्रीदत्त म्हणे तूं माझा भृत्य । तुझें राहिलें नाहीं कृत्य ।तूं झालासी कृतकृत्य । हें सत्य न संशय ॥२०॥आतां त्वां नगरा जावें । प्रजेचें पालन करावें ।अनासक्तीनें वागावें । भावें गावें माझें यश ॥२१॥असें ऐकतां अर्जुन म्हणे । आतां कैचें येणें जाणें ।खुंटलें अवघें बोलणें । धरणें घेतलें येथेंची ॥२२॥श्रीदत्त म्हणे अर्जुना । अंगिकारावें माझ्या वचना ।लावूनी स्वरूपीं मना । बाह्याचरणा करावें ॥२३॥जरी अवशिष्ट नसे कृत्य । तरी आचारा सेवी अगत्य ।स्वत:चें नसतांही कृत्य । होईल सत्य परोपकार ॥२४॥धर्म आहे सनातन । त्याला न द्यावा सोडून ।स्वयें धर्म आचरून । जना शिक्षण तें लावावें ॥२५॥येणें होय परोपकार । नातरी सिद्धा पाहूनी इतर ।वागतील जरी अनाचार । होईल संहार संकरानें ॥२६॥लोकबाधा न व्हावी म्हणून । लोक जातील भुलोन ।असें दखवावें बाहेरून । विपरीताचरण जनामाजी ॥२७॥तूं गृहस्थ अससी । न टाकी वर्णाश्रमासी ।करी त्रिविध कर्मासी । सक्ती मानसीं न धरितां ॥२८॥जे असती मुक्त । ते कोठेंही न होती सक्त ।त्याला करी अनुरक्त । असी वस्तु जगीं नाहीं ॥२९॥सूर्य होतां शीतल । उष्ण होतां चंद्रमंडळ ।अधोभागीं पसरतां अनल । न मानी नवल जीवन्मुक्त ॥३०॥जसी कुग्रामललना । नागरी कांताच्या मना ।न रमवी तसें मुक्तजना । न रमवी जनामाजी कोणी ॥३१॥माझा जो म्हणावा । तो मुळींच न होयीं ठावा ।ज्याचा हा मी म्हणावा । त्याचे गांवा नेणेची ॥३२॥असा मुक्तांचा सिद्धांत । मीतूंपणाची नसे मात ।तसा तूंही सतत । राहे यावत् प्रारब्ध ॥३३॥श्रेष्ठ करी जसा आचार । पाहुनी तसा वागे इतर ।जें प्रमाण मानी थोर । वागे इतर तदनुसारें ॥३४॥येणें न होय अतिप्रसंग । बालासमान व्हावें असंग ।गुणबुद्धीचा करूनी त्याग । वागतां व्यंग काय होय ॥३५॥जो आत्मरती आत्मतृप्त । आत्मरूपीं संतुष्ट ।त्याचें कार्य न अवशिष्ट । हें सर्व शिष्ट जाणती ॥३६॥करितां पुण्य त्याणें । नलगे स्वर्गाप्रती जाणें ।पापही करितां त्याणें । नरकीं जाणें न घडेल ॥३७॥तथापी हेंची बरवें । पुण्यमार्गा अनुसरावें ।चित्तीं लक्ष्य धरावें । लोकीं वागावें असंगत्वें ॥३८॥आतां तूं जा स्वनगरीं । प्रजेचें पालन करी ।यागीं देवां तृप्त करी । पितृतृप्ती करी श्राद्धान्नीं ॥३९॥गायी भूमी कन्या सुवर्ण । रथ वस्त्र भूषण ।देवूनी तोषवी विप्रगण । करी पालन दीनांधाचें ॥४०॥पुन: पुन: येवून । घेई माझें दर्शन ।राज्य करितां स्मरण । ठेवी अनुक्षण निजचित्तीं ॥४१॥तूं कधीं न भुलसी । माझ्या स्वरूपा न विसरसी ।अंतर्निष्ठ राहसी । बाहेर व्यवहार करितांही ॥४२॥प्रवाहपतित कर्म जरी । शुभाशुभ घडेल तरी ।त्याचें फळ तुझे शिरीं । काळांतरीं न येईल ॥४३॥यापरी तूं जीवन्मुक्त । प्रारब्ध भोगी अनासक्त ।तूं होसी विदेहमुक्त । हें मदुक्त सत्य सत्य ॥४४॥असें परिसुनी वचन । सानंद झाला अर्जुंन ।बोले करूनियां नमन । हें वचन शिरसां मानलें ॥४५॥म्हणूनी पायां दृध धरी । प्रेमाश्रुंनीं क्षालन करी ।हर्श न मावे अंतरीं । जरी आंवरी पुन: पुन: ॥४६॥प्रेमाश्रुधारा नावरती । स्थिती नये देहावरती ।म्हणे हे चरण अंतरती । हीच खंती वाटते ॥४७॥श्रीदत्त म्हणे अर्जुना । जा मानूनी माझ्या वचना ।चिंतितां ह्या चरणां । जाती न मनांतूनी तुझ्या ॥४८॥म्हणोनी देती आलिंगन । करिती त्याची बोळवण ।मनीं चिंतूनियां चरण । गेला अर्जुन नगरासी ॥४९॥नगरीं येतां अर्जुन । समोर येती सर्वजण ।नगर अलंकृत करोन । समारंभें नेती तया ॥५०॥चंदनोदकाचे सडे । मार्गीं घालिती चहूंकडे ।वाद्यें वाजविती पुढें । द्विजगण पढे आशिर्मंत्रां ॥५१॥वारांगना नृत्य करिती । भाट बंदी यश गाती ।जयजयकारें गर्जती । जनपंक्ती आनंदें ॥५२॥सुभूषित पौरकन्याजन । माडीवरी चढून ।लाह्या शिंपिती हर्षून । गुण गावून अर्जुनाचे ॥५३॥मोत्यांनीं तोरणें बांधिलीं । गुढियांची पंक्ती उभारिली ।शोभवूनी गल्लोगल्लीं । संतोषली सर्व प्रजा ॥५४॥सोन्याचे ताटीं रत्नदीप । घेवूनी सुंदरी आल्या समीप ।पाहुनी अर्जुनाचें स्वरूप । विरहताप घालविती ॥५५॥सोळा सहस्त्र अर्जुनाच्या नारी । आल्या रत्नें घेवूनी करीं ।ओवाळूनी अर्जुनावरी । रत्नें दूरी टाकिती ॥५६॥तीं रत्नें घेवून । धनिक झाले जे दीन ।अशा समारंभेंकरून । अंतरीं अर्जुन पातला ॥५७॥सर्वांसी बैसवून । वस्त्राभरणें देवून ।उत्तम गौरव करून । यथाधिकारें बोळवी ॥५८॥सप्तद्वीप पृथिवीचें । राज्य असे जयाचें ।एकटा पालन करी सर्वांचें । श्रीदत्ताचें वचन पाळी ॥५९॥अनेक रूपें घेवून । सर्वत्र करी संचरण ।कुठें काय करी कोण । हें दिसोन येत जया ॥६०॥स्वच्छंद असे ज्याची गती । कोठेंही कुंठित न होई ती । जसी वायुची गती । तसी गती तयासी ॥६१॥असूनी स्वयें ब्रह्मज्ञ । केले दहा हजार यज्ञ ।जेथें अत्रिप्रमुख कर्माभिज्ञ । ऋत्विज प्राज्ञ सर्वही ॥६२॥सोन्याच्या वेदी घालूनी । सुवर्ण मंडप उभारूनी ।देवाला बोलावूनी । समारंभें यज्ञ करी ॥६३॥दिव्याभरणें लेवूनी । देवस्त्रिया घेवूनी ।येती विमानीं बैसूनी । देव यजनीं अर्जुनाच्या ॥६४॥तेथें अप्सरा नाचती । गंधर्व सुस्वरें गाती ।विप्रही वेद पढती । पुरंध्री गाती तत्कीर्ती ॥६५॥असे भूप करी याग । देवां यथेच्छ दे हविर्भाग ।ब्राह्मणही वेदपारग । सांग करिती अनुष्ठान ॥६६॥भूमी सुवण धनान्न । विप्रां देई कन्यादान ।तृप्त होती द्विजजन । पक्वान्न परमान्न जेवूनी ॥६७॥दक्षिणेसी फोडी भांडार । यथेच्छ धन नेती द्विजवर ।रितें न होय कोशागार । सिद्धी सादर रहाती जेथें ॥६८॥रौप्यखुर स्वर्णश्रृंगी । सवत्स धेनू शोभनांगी ।पयस्विनी नानारंगी । देई सात्विक वृत्तीनें ॥६९॥धर्में राज्य करी अर्जुन । अकाळीं कोणा न ये मरण ।न होती उत्पात दारुण । नसे दुर्भिक्ष ज्याचे राष्टीं ॥७०॥यथाकाळीं पडे पर्जन्य । सर्वत्र उत्तम पिके धान्य ।लोक होती वदान्य । मान्य राजा राज्य करितां ॥७१॥कोणी नसती वंध्या नगरीं । फळें पुष्पें असती वृक्षांवरी ।विधवा न होई भूमीवरी । न करती चोरी कोणीही ॥७२॥मूषकादि उपद्रव न होती । कोणी अधर्म न करिती ।सकळ लोक धार्मिक होती । कार्तवीर्य राज्य करितां ॥७३॥खङ्ग चक्र धनुर्बाण । आपुल्या करीं घेवून ।अनेक रूपें धरून । फिरे अर्जुन सप्तद्वीपीं ॥७४॥ज्याचा रथ इच्छागमनी । हिंडे सकळ मेदिनी ।अर्जुन त्यावरी बसोनी । पाहे नयनीं सप्त द्वीपें ॥७५॥क्वचित् कोणी करितां चोरी । स्वयें जावूनी तया धरी ।तो दंड्य होई तरी । ठार मारी धर्मात्मा ॥७६॥दुष्टांचें करी शिक्षण । शिष्टांचें करी पालन ।सर्वांचें अंत:करण । ओळखी क्षण न लागतां ॥७७॥अदंड्या दंड न करी । दंड्या शास्त्रोक्त दंड करी ।क्रोधें लोभें कोणा न मारी । कामारी परी विरक्त जो ॥७८॥भलतें कोणी सांगतां । कानावरी न धरी सर्वथा ।भलती भीड घालितां । न मानी सर्वथा धर्मज्ञ तो ॥७९॥पूज्यांचे ठेवी सन्मान । ब्राह्मणाचा ठेवी बहुमान ।हे भूसुर असे मानून । देई वस्त्रधन तयांसी ॥८०॥असा राजा जीवन्मुक्त । होवूनियां अनासक्त ।कधीं न हो विषयासक्त । ठेवी दत्तपदीं मन ॥८१॥एके दिवसीं फिरतां । कर्कोटकाच्या सुतां ।देखिलें दुराचार करितां । जाता झाला तत्संनिध ॥८२॥त्यांशीं करूनियां युद्ध । तया केलें बाणविद्ध ।करोनियां तयां बद्ध । त्याचें समृद्ध राज्य घेई ॥८३॥तेथें पुरी वसवून । हजारों स्त्रिया घेवून ।नर्मदातीरीं येवून । क्रीडा करून राहिला ॥८४॥भुजसहस्त्रें करून । नर्मदेशीं पूल बांधून ।प्रवाह पूर्वेस फिरवून । क्रीडा करून राहिला ॥८५॥मनोहर वैजयंती माळा । घालूनियां आपुले गळां ।करूनी स्त्रियांचा गोळा । क्रीडा करूनी राहिला ॥८६॥देव विमानीं चकित पाहती । किन्नरींच्या निवी सुटती ।अप्सरा भुलोन जाती । क्रीडा पाहतां अर्जुनाची ॥८७॥त्या नर्मदेचा पती । पश्चिम समुद्र जया म्हणती ।पाहुनी अर्जुनाची क्रीडा ती । कोपें दुर्मती खवळला ॥८८॥राजाच्या अंगावर । एकाएकीं आला समुद्र ।तया पाहून राजेंद्र । हास्य करूनी राहिला ॥८९॥समुद्र होवूनी खळ । अंगावरी येतां चपळ ।तया करुनी निर्बळ । केला निश्चळ जागोजागीं ॥९०॥मग तो राजा अर्जुन । हजार बाहू उभारून । समुद्रीं उडी टाकून । करी ताडन जोरानें ॥९१॥ताडित होतां समुद्र । पलायन करी सत्वर ।मरोनी जाती जलचर । कांपे थरथरां पाताल ॥९२॥समुद्रदेवता येवून । करीं रत्नें घेवून ।अर्जुनातें पूजून । अभयदान मागतसे ॥९३॥शरणागतपालन । करावें हें ज्याचें व्रत पूर्ण ।तो धर्मात्मा अर्जुन । अभयदान दे तया ॥९४॥जया नाहीं विषयाची गोडी । मग कैंची स्त्रियांची आवडी ।प्रारब्धकर्म देहा ओढी । आसक्ती थोडी सुद्धां न त्याची ॥९५॥समुद्र जलें भरला असतां । इच्छा नसोनी नद्या येतां ।तयां मागें लोटूनी न देतां । घेई स्वांतरीं प्रारब्धयोगें ॥९६॥तसा मुक्तही निष्काम । दैवें येवून मिळतां काम ।तयां भोगितां इंद्रियग्राम । न क्षोभे उपशम पावला जो ॥९७॥दगडाप्रमाणें संतत । बसणें हे जीवन्मुक्तीव्रत ।म्हणती ते केवळ अज्ञात । श्रुतिसिद्धांत नेणती ते ॥९८॥शास्त्रप्रमाणें प्रबळ ज्ञान । साधका मिळे तें पूर्ण ।अज्ञानतत्कार्यनाशन । करी कर्म हेंची तयाचें ॥९९॥त्या ज्ञानाचा नाश करी असें । विशेष प्रबळ प्रमाण नसे ।म्हणूनी आत्मज्ञान न नासे । कसें तरी वागतांही ॥१००॥नाश करणें प्रारब्धाचा । हा धर्म नसे तयाचा । नाश करणें आवरणाचा । हा तयाचा धर्म होय ॥१०१॥म्हणूनियां तत्वज्ञानी । प्रारब्ध भोगूनी राहती जनीं ।भोगाचा शिण न घेती मनीं । ते जाणूनी प्रारब्धतत्व ॥१०२॥ज्ञानी अज्ञानी या दोघांसी । भोग जरी समानेंसि ।तरी काय विशेष तयांसी । म्हणसी तरी ऐक बा ॥१०३॥स्वानुसंधान ठेवूनी ज्ञानी । स्वप्नापरी प्रारब्ध भोग मानी ।म्हणूनी तो न शिणे मनीं । राहे जनीं उदासीन ॥१०४॥कदाचित् भोगकालीं । मी मर्त्य ही वृत्ती उदेली ।त्याणें ज्ञानाची हानी झाली । हें त्रिकालीं घडेना ॥१०५॥जे रागद्वेषादिक । तीं अज्ञानाचीं चिन्हें देख ।ज्ञानें समूळ रागादिक । नासतां शोक मग कोणा ॥१०६॥अज्ञानी हें तत्व नेणे । म्हणोनी दु:खादिकें शिणे ।रागद्वेषयुक्त घालवी जिणें । शोकदु:ख भेणें घे सतत ॥१०७॥हा तयांचा विशेष जाण । ज्ञान्याचें कर्म अशुक्लकृष्ण ।म्हणोनी प्रारब्धें भोगी अर्जुन । उदासीपणें भोग ॥१०८॥इति श्रीदत्तमाहात्म्ये षोडशोsध्याय: ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP