मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १० वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १० वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १० वा Translation - भाषांतर श्रीदत्तात्रेयाय नम: ॥गुरु म्हने परमपवित्र । विष्णुदत्ताची गाथा विचित्र ।जो दत्तभगवान् स्वतंत्र । होतो परतंत्र भावभुकेनें ॥१॥अद्यापि यज्ञ ज्याला । तृप्ती न करिती तयाला ।तृप्तीचा ढेंकर आला । श्राद्धान्न जेवितां हर्षानें ॥२॥धन्य ती सुशीला सती । दत्ता जेवूं वाढी जी स्वहस्तीं ।आग्रह करूनी निगुती । दीक्षिता गती न ये ही ॥३॥धन्य तो विष्णुदत्त । ज्याचें परम शुद्ध चित्त ।आराधोनियां श्रीदत्त । उद्धरिलें समस्त कुळ ज्याणें ॥४॥धन्य तोही राक्षस । आपणासह विप्रास ।उद्धरी ऐशा परम हितास । दावी तो खास परम गुरु ॥५॥श्रीदत्तें विष्णुदत्तावर । अनुग्रह केला हा थोर ।करावया परोपकार । दयेनें वर विद्या दिधल्या ॥६॥ज्या ज्यावरी अनुग्रह करी । तो तरे या संसारीं ।विष्णुदत्तासम उपकारी । ब्रह्मांडोदरी विरळ ॥७॥ग्रहभूत डचकती । विष्णुदत्ता देव भीति ।नुरवी लोकांची खंती । महामती दत्तवरें ॥८॥आतां ऐक देवनाथा । पांचवी असे हे गाथा ।कर्मविपाकाची कथा । मोक्षपंथा मिळेल ॥९॥हरिशर्मा विप्र गोदावासी । एक पुत्र झाला त्यासी ।अल्पवय असतां तयासी । मातापितयासी मृत्यु आला ॥१०॥धनी होता म्हणून । तयाचें जाहलें लग्न ।परि व्याधिग्रस्त दु:खमग्न । सदा उद्विग्न मन ज्याचें ॥११॥उपजतांचि बरोबर गुल्मरोग । तेरावे वर्षीं क्षयरोग ।अठरावे वर्षीं जलोदर रोग । सर्वांग निस्तेजस्क झालें ॥१२॥एकुणीस वर्षें होतां अतिसार । कासश्वास बरोबर ।पुढें झाला भगंदर । मग त्रिदोषें जोर केला ॥१३॥करितां औषधदान । मृत्युंजयजप हवन ।ग्रहदेवांचें अर्चन । करितां रोगांचें शमन न झालें ॥१४॥त्याची भार्या सोला वर्षांची । ऐकूनि कीर्ति विष्णुदत्ताची ।येऊनि पाउलें धरी त्याचीं । सौभाग्यदान द्या म्हणे ॥१५॥माझा पती वीस वर्षांचा । त्याला गुल्मरोग जन्माचा ।क्षयरोग आठ वर्षांचा । तीन वर्षांचा जलोदर ॥१६॥एक वर्षाचा जीर्णज्वर । षण्मासांचा अतिसार । चौमासांचा भगंदर । त्रिदोष थोर वाढला आतां ॥१७॥केले अनेक उपाय । तरी न झालें आरोग्य ।मला द्यावें सौभाग्य । तुम्ही सभाग्य दत्तभक्त ॥१८॥असी प्रार्थना ऐकून । तिचे सदनीं येऊन ।तया विप्रा पाहून । बोले वचन विष्णुदत्त ॥१९॥पूर्वपापें सर्व रोग होती । प्रायश्चित्तें पापें शमती ।कर्मविपाकीं हे ख्याती । ऋशिसंमती अशीच असे ॥२०॥ब्रह्मवधदोषें क्षय झाला । द्वादशाब्द प्रायश्चित कीजे तयाला ।देवद्रोहें गुल्म झाला । षडब्द तयाला प्रायश्चित ॥२१॥जलोदरा द्वादशाब्द । जीर्णज्वरा एकाब्द ।भगंदरा एकाब्द । योजी अब्द अतिसारा ॥२२॥पत्नीकरवीं विष्णुदत्त । करवी असें प्रायश्चित्त ।ज्या ज्या रोगांचें जें जें प्रायश्चित्त । तें तें करितां तो तो रोग जाई ॥२३॥त्रिदोषावरी रसायन । देतां त्याचें निरसन ।जाहलें तेव्हां तो ब्राह्मण । बैसला उठोन सुखानें ॥२४॥त्याचें हृदय स्पर्शोन । विष्णुदत्त मंत्र म्हणोन ।तया देई आशीर्वचन । मनीं स्मरोनी श्रीदत्ता ॥२५॥मग त्या द्विजा आरोग्य । आयुष्य प्रजा ऐश्वर्य ।यश दिव्यगती वीर्य । मिळालें औदार्य विप्रवरें ॥२६॥दत्तपदीं दृढ भक्ती । मिळाली उत्तम मुक्ती ।निर्मळ जाहली मती । मंत्रशक्ती अशी हे ॥२७॥विप्रस्त्री म्हणे विष्णुदत्ता । त्वां सौभाग्यदान दिलें आतां ।यथेच्छ घेई वित्ता । विष्णुदत्त नको म्हणे ॥२८॥तूं केवळ माझी कन्या । होसी निश्चयें विश्वमान्या ।पतीसेवनें हो धन्या । तुम्हा अन्या गती नाहीं ॥२९॥स्वप्नींही परपुरुषा न देखे ती । जाण ते उत्तम सती ।बंधुसमान नरां देखे ती । मध्यम सती जाणावी ॥३०॥परपुरुषा पाहुनी । उपजे काम जरी मनीं ।राहे प्रयत्नें आवरूनी । कनिष्ठ सती ती जाण ॥३१॥परपुरुषा भोगी नारी । ती जारिणी निर्धारी ।ती विधवा होई जन्मांतरीं । पुन: पुन: निश्चित ॥३२॥जी जारकर्म करी । ती कुलत्रय घाली रौरव घोरीं ।स्वयेंही नरकीं कष्ट भारी । भोगी ती नारी दुर्भगा ॥३३॥यास्तव साध्वी तूं आतां । धरीं पतीच्या चित्ता ।स्वप्नींही न सोडीं सद्वृत्ता । मिळेल सुभगता अखंडित ॥३४॥असा उपदेश करूनी । निस्पृह तो ये स्वभवनीं ।विप्रा कर्मविपाक शास्त्रेंकरूनी । रोग जाऊनी ये सद्गती ॥३५॥प्रायश्चित्तें रोगनाश । मग आरोग्य दे रस ।तसा शास्त्रें होतां अविद्यानाश । प्रबोध ब्रह्मरस देतसे ॥३६॥जरी फळाची लालुची । शास्त्रीं दाविली साची ।ती मना वळवावयाची । युक्ती शास्त्राची जाणावी ॥३७॥एक पुत्र बहु गोड खातां । रोगी झाला त्याची माता ।त्या निंब पाजी तो तत्वता । न पिये माता तया बोले ॥३८॥बाळा निंब जरी कडू । हा पितां तुला देईन लाडू ।हें ऐकतां निंबरसाचा गडू । पिये तो लाडू मिळेल म्हणूनी ॥३९॥हातीं लाडू देउनी । अपथ्य होईल म्हणूनी ।युक्तीनें घे काढूनी । त्यापासूनी दयाळु माय ॥४०॥लड्डूकासारिखें गौण फळ । आरोग्य हें मुख्य फळ ।भवार्त हा जेवी रोगी बाळ । श्रुती कनवाळ मातेपरी ॥४१॥शास्त्र नव्हे हें स्वर्गार्थ । नव्हे हें वशीकरणार्थ ।नव्हे कामभोगार्थ । शत्रुघातार्थ नव्हे हें ॥४२॥शस्त्र बुद्धिशुद्धी करी । युक्तीनें भ्रम निवारी ।एतदर्थ अवधारी । साहावी गाता बरी असे ॥४३॥सह्याद्रीचे उत्तरेस । विप्र एक करी वास ।एके दिनीं मित्रानें त्यास । आपल्या गांवास पांचारिलें ॥४४॥त्याची भार्या सुरूपा असे । तियेसी तो सांगतसे ।मला मित्रानें पाचारिलें असे । एक मास रहावया ॥४५॥त्वां सुखें राहावें घरीं । मी येईन मास लोटल्यावरी ।तें ऐकूनियां नारी । पाथेय त्याकरीं देतसे ॥४६॥तें घेऊनी तो निघाला । ती स्त्री स्नाना आली नदीला ।मार्गी अश्वत्थीं झोटिंग बैसला । तेणें ती अबला देखिली ॥४७॥ब्रह्मचारीदशेंत । जो मरे कामार्त ।तो होय झोटिंग भूत । कामलंपट दुर्धर्श ॥४८॥भूतवर्तमानज्ञान । भूतांला येतें स्पष्ट कळून ।तिचा पती गेला हें जाणून । पतिसा होऊन ये घरीं ॥४९॥त्याची भार्या पतिव्रता । नेणें तयाचिया कपटा ।पती आला जाणूनि त्वरिता । हास्यवदनें पुढें आली ॥५०॥तया आसन देऊण । पादप्रक्षालन करून ।तें तीर्थ शिरसा वंदून । वायू घालूनी श्रम वारी ॥५१॥मंद मंद वाक्यें बोले । त्वरित कां आगमन झालें ।किंवा अपशकुन पाहूनी फिरविलें । काढिलेलें प्रस्थान माघारा ॥५२॥किंवा माझ्या स्नेहामुळें । प्रवासीं मन न वळे ।सतीचें मन विरहें वाळे । तुम्हां कळे हे यथार्थ ॥५३॥मग तो कपटी काय बोले । ज्याकरितां मीं गमन केलें ।ते मार्गीं जवळचि भेटले । त्यांणीं फिरविलें माघारां ॥५४॥अशी ऐकूनी त्याची उक्ती । म्यां मागें फिरविली गती ।पुन: जाऊं मासांती । व्यर्थ तुला वियोगार्ति कां द्यावी ॥५५॥असें हें कपट्याचें वचन । तिणें सर्व ऐकून ।तें यथार्थ मानून । करी तत्सेवन निष्कपटें ॥५६॥अशी तीशी वश करून । तो झोटिंग दुर्जन ।तीशीं रमे अनुदिन । पतीसमान होवोनी ॥५७॥वय अवस्था रूप शीळ । शब्द वर्ण आकार सरळ ।चाल चालणूक सकळ । दावी खळ पतीसमान ॥५८॥रात्रौ करितां संग । तिचें चुरलें सर्वांग ।परी त्याचा पुरा न हो भोग । ज्या नये भंग सुरतयुद्धीं ॥५९॥त्याचें बळ दांडगेपण । भोगशक्ती दारुण ।विकारही विलक्षण । जाणूनि शीण पावे नारी ॥६०॥ती नारी खिन्न होउनी । विचार करी आपुले मनीं ।भोग न देतां धर्महानी । देतां ग्लानी येतसे ॥६१॥असें चिंतूनी हो दु:खित । त्याविषयीं संदेह वाटत ।परी सांगावया लाजत । हा अनर्थ इतरांप्रती ॥६२॥प्रत्यहीं सर्वरात्र तिला भोगितां । तया नये तृप्तता ।तिये आली कृशता । तंव मास लोटतां पती आला ॥६३॥तो द्वारीं पातला । तंव स्वसमान एक दारीं बैसला ।तो त्याणें पाहिला । संदेह झाला तयासी ॥६४॥विप्र म्हणे तूं कोण । माझें रूप घेऊन ।माझे घरीं राहून । कापट्य करून साचा होशी ॥६५॥झोटिंग बोले तया लागूनि । मी प्रख्यात घरधनी ।तूं कोण आलासी कोठुनी । माझें रूप घेऊनी कपटिया ॥६६॥तूं कपटी तूं कपटी म्हणती । असे परस्पर भांडती ।तेथें ग्रामस्थ लोक येती । तेही भुलती तयां पाहतां ॥६७॥दोनी दिसती समान । खरा खोटा निवडी कोण ।त्यांचें भांडण दारुण । निवारील कोण कसें ॥६८॥विप्र म्हणे सर्वांसी । घरांतूनी दवडा यासी ।तो म्हणे दारांतून यासी । घालावा तुम्ही ग्रामलोक ॥६९॥माझी नारी सुंदर । भोगीन म्हणतो हा पामर ।करुनी आला रूपांतर । परी मी घर न सोडीन ॥७०॥जरी करील हा बलात्कार । तरी मारीन मी ठार ।हें ऐकूनी ते नर । कांहींच उत्तर न देती ॥७१॥सासूसासरे विप्राचे । येऊनी पाहती रूप त्याचें ।ते म्हणती विष्णुदत्ताचे । घरीं न्यावें या दोघां ॥७२॥जेणें आराधिला दत्त । सर्वज्ञ तो विष्णुदत्त ।सर्वांचें ओळखी चित्त । तो निश्चय करील ॥७३॥मानलें हें वचन सर्वांस । सर्व म्हणती त्या दोघांस ।घेऊनियां स्त्रियेस । विष्णुदत्ता भेटूं चला ॥७४॥तेंही बरें म्हणून । स्त्रियेसी पुढें करून ।तेही दोघे निघोन । विष्णुदत्ता येऊनी भेटले ॥७५॥सर्व वर्तमान ऐकून । सत्कारें सर्वां बैसवून ।झोटिंगालाही ओळखून । बोले वचन विष्णुदत्त ॥७६॥अवस्था वय रूप शील । स्वर वर्ण आकार सकळ ।नाम गोत्र आणि कुल । सांगा आपुलें दोघेही ॥७७॥दोघेही एकच बोलत । तयां म्हणे विष्णुदत्त ।यांत काय करावें निश्चित । आतां उपाय करितों मी ॥७८॥जें करीन प्रमाणेंसी । तें मान्य होईल लोकांसी ।क्षमा मागतों तुम्हासी । सभ्य म्हणती बहु बरें ॥७९॥असें बोलूनी विप्रमस्तकीं । श्वेतमुद्रा तो रेखी ।लाल मुद्रा भूत मस्तकीं । मंत्रें रेखी सुव्यक्त ॥८०॥लोकां म्हणे मुद्रेवरून । चित्तीं धरा तुम्ही खूण ।मंत्रित मुद्रा बदलून । न टाकवेल भूताला ॥८१॥असें बोलूनी विष्णुदत्त । विप्रा बोलावूनी पुसे व्यक्त ।भांडीं वस्त्रें धन घरांत । काय आहेत सर्व सांग ॥८२॥स्त्रियेच्या गुप्त खुणा । सर्व सांग तूं ब्राह्मणा ।ब्राह्मण ह्मणे यथार्थ जाणा । न सांगवेल पात्रादिक ॥८३॥स्त्रियेच्या बाह्य खुणा । ठाऊक असती आपणा ।याहूनि गुप्त खुणा । नेणे म्हणे सभेंत ॥८४॥भूत सांगे पात्र वस्त्र धन । पात्रांचेंही वजन ।म्हणे घराच्या इटाही जाण । सांगेन जरी पुसाल ॥८५॥बाह्यांतर खुणा स्त्रियेच्या । सांगतां मनीं सभ्यांच्या ।शंका आली बोलती वाचा । हा न साचा यथार्थ ॥८६॥विष्णुदत्त म्हणे तयांसी । ह्या पंचक्रोशी क्षेत्रासी ।प्रदक्षिना करूनी आम्हापाशीं । पूर्वीं येईल त्यासी सत्य मानूं ॥८७॥बरें म्हणोनी दोघे जाती । घटिकेनें पिशाच ये मागुती ।म्हणे प्रदक्षिणा करूनी क्षेत्राप्रती । तुम्हांप्रती प्रथम आलों ॥८८॥सभ्य पुसती खुणा तया । तो यथार्थ सांगे तयां ।ते म्हणती हें तों मनुष्या । घटिकेमध्यें न घडेल ॥८९॥तेव्हां वाटतो हा भूत । दोन प्रहरांनीं विप्र येत ।कांहीं कांहीं खुणा सांगत । तें यथार्थ सभ्य म्हणती ॥९०॥विष्णुदत्त म्हणे ह्या पर्वतीं । सिद्ध किती वसती ।पुसोनी त्यांच्या नामगोत्राप्रती । पर्वता प्रदक्षिणा करावी ॥९१॥प्रदक्षिना करून । जो भेटेल पूर्वीं येऊन ।सत्यपणा त्यावरून । आम्हां कळोन येईल ॥९२॥असें ऐकूनी वचन । दोघे जाती निघोन ।लोटितां घटिका दोन । प्रदक्षिणा करूनी भूत आला ॥९३॥यथास्थित सर्व सांगे । विप्र पांच प्रहरांनीं ये मागें ।विष्णुदत्ताप्रती सांगे । न भेटले सिद्ध कोणी ॥९४॥हें ऐकतां विप्राचा विश्वास । झाला सर्व सभासदांस । विष्णुदत्त म्हणे तयास । परीक्षा एक शेष राहिली ॥९५॥असें म्हणूनी लोखंडाची झारी । विष्णुदत्त तयापुढें करी ।म्हणे इच्या मुखानें जाऊनी अंतरीं । तोटीनें बाहेर निघावें ॥९६॥असें म्हणूनी स्वांगरक्षा करी । भूत मुखानें प्रवेश करी । विष्णुदत्त मंत्र उच्चारी । आच्छादित करी दोनी तोंडें ॥९७॥तोटी मुख बंद होतां । मार्ग न मिळे भूता ।हें कृत्य पाहतां । सर्वांला आनंद झाला ॥९८॥उचलतां जड झाली झारी । तो गाडिली पर्वतावरी ।तो आनंद सर्वांतरी । न माये त्यावरी भक्त बोले ॥९९॥येतांच ओळखिला भूत । एकाएकीं करितां निगृहीत ।माझ्यावरी समस्त । दोष निश्चित ठेवितील ॥१००॥म्हणोनी हा यत्न केला । सर्वांचा संशय फिटला ।झोटिंगही बद्ध झाला । सोडविली अबला ब्राह्मणी ॥१०१॥शास्त्रकर्में करून । अज्ञानाचें करिती निरसन ।तेणें संशय जाऊन । आत्मज्ञान जेंवी होतें ॥१०२॥तसा करितां हा उपाय । प्रथम झाला संशय । दुसरे वेळीं गेला संशय । झाला निश्चय तिसरे वेळीं ॥१०३॥आतां कोणी शब्द न ठेविल । आतां भूतही न सुटेल ।साध्वीलाही दोष न लागेल । माझा बोल निश्चित ॥१०४॥ऐकूनी असें वचन । साधु साधू ह्मणोन । लोक जाती निघोन । सस्त्रीक ब्राह्मण वंदन करी ॥१०५॥म्हणे माझें अरिष्ट घालविलें । झोटिंगाचें बंधन केलें ।माझें गह्र मला दिधलें । यश गाजविलें हें जगीं ॥१०६॥तुम्ही भगवद्भक्त समर्थ । तुम्हां मुळींच नाहीं स्वार्थ ।तुमचें जिणें परार्थ । सार्थकता हीच तयाची ॥१०७॥असें म्हणूनी दंपती वंदिती । निरोप घेऊनी घरीं जाती ।गुरू म्हणे इंद्राप्रती । शास्त्रें जाती संशय ॥१०८॥तंत्रशास्त्रें करून । होतां भ्रमनिरसन ।सत्य कळलें हें तसेंचि जाण । ब्रम्हज्ञान होतसे ॥१०९॥इति श्रीमत्परमहंसवासुदेवानंदसरस्वतीकृते श्रीदत्तमाहात्म्ये दशमोsध्याय: ॥१०॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : April 26, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP