मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय १८ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय १८ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय १८ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ।गुरु म्हणे दीपकासी । जमदग्नी कोण ऋषी ।रेणुका माता झाली कशी । हृषीकेशाची सांग ॥१॥विष्णु स्वयें अवतारून । अर्जुनासी कां संग्राम करून ।कसा जिंकी जनार्दन । हें विस्तरून सांगावें ॥२॥द्विजरूप कां धरी । निजभक्तासी कां मारी ।हें सर्व सविस्तरीं । प्रश्नोत्तरीं निरोपावें ॥३॥ऐकून शिष्याचें वचन । वेदधर्मा हर्षोन ।म्हणे ऐक शिष्या सावधान । साद्यंत निरोपितों ॥४॥जन्मांत देव नेणून । संकटें येतां मी तुझा म्हणोन ।जो एकदांच ये शरण । त्यालाही अभयदान दे देव ॥५॥हा तरी नित्ययुक्त । असे अर्जुन एक भक्त ।केवी टाकील त्याला दत्त । तच्चित्तानुसार वागे जो ॥६॥जीवन्मुक्त अर्जुन । श्रीदत्तापासीं येवून ।विनवी हात जोडून । माझें हनन तुम्ही करा ॥७॥क्षत्रियाचा देह बरवा । तो धारातीर्थीं पडावा ।तरी हें कार्य न करवेल देवा । मानवाचा काय पाड ॥८॥हा तो योगी श्रेष्ठ । असे महाबलिष्ठ ।याला मारील असा वरिष्ठ । न दिसे ब्रह्मांड शोधितां ॥९॥देव म्हणे तयासी । म्यां प्रतिपाळिलें तुजसी ।या हातीं मारावयासी । मती कसी होईल ॥१०॥अर्जुन म्हणे हें जरी । तुला न रुचे तरी ।मृत्यु न यावा हीनाच्या करीं । रोगादिकें तरी न द्यावा ॥११॥तुम्हां सम वरिष्ठ असेल । त्या करीं यावा अंतकाल ।असा वर मागे भूपाल । देव तो बोल अंगिकारी ॥१२॥हें वरदान ठेवूनी अंतरीं । देवांनीं प्रार्थितां मधुवैरी ।स्वयें हा अवतार धरी । ब्राह्मणाघरीं ख्यात्याधिक ॥१३॥यांत ईश्वरा काय दोष । काय तया असे रोष ।भक्ताच्या इच्छेनें धरी वेष । प्रळयीं नि:शेष मारी जो ॥१४॥जो ईश्वर निजकरीं । उत्पत्ती स्थिती लय करी ।तो लेप न घे आपल्यावरी । उदासीनापरी वागे ॥१५॥तो असे जनार्दन । बाळापरी क्रीडन ।तया केवी ये बंधन । नित्यमुक्त असे जो ॥१६॥जो उपजे भूमीवर । तया मृत्यु बरोबर ।केवळ पडतां शरीर । जीवां विकार काय होय ॥१७॥मुक्ताचें शरीर पडलें । तेणें त याचें काय गेलें ।पूर्वींच विज्ञानबळें । बाधित केलें शरीर ज्याणें ॥१८॥जशा जळीं लाटा येती । परस्परांवरी आदळती ।जरी त्या फुटोनी जाती । जळाचा नाश होईल कीं ॥१९॥तसे देह विकारी । हे नष्ट होती जरी । स्वरुपा हानी तिळभरे । न पडे हें अंतरीं जाणावें ॥२०॥एवं विचारें पाहतां अंतरीं । दोष नये कोणावरी ।असो आतां बोल भारी । अवधारी पूर्वकथा ॥२१॥गाधी राजा कान्यकुब्जदेशीं । धर्मात्मा सोमवंशी ।होतां तयाचे कुशीं । दैवें संतान न जाहलें ॥२२॥तो राजा उदासीन होवूनी । भार्येसह बसे वनीं ।श्रीशंकरा आराधोनी । कन्यारत्न लाधला ॥२३॥तिचें नाम ठेविलें सत्यवती । रूपलावण्यसंपत्ती ।चातुर्यखाणी महामती । वाढे सुदती ती कन्या ॥२४॥एके दिवशीं ऋचीक ऋषी । गेला पितृदर्शनासी ।भृगुनामें पितयासी । प्रेमें वंदी सद्भावें ॥२५॥भृगु म्हणे ऋचीकासी । आजपावेंतो केलें तपासी ।आतां माझी आज्ञा धरी शिरसीं । ग्रुहस्थाश्रमासी स्वीकारी ॥२६॥गृहस्थाश्रम करून । यज्ञें देवा तोषवून ।पुत्रमुख देखून । मग वन सेवी तूं ॥२७॥असें भृगूचें वचन । शिरसा मान्य करून ।ध्यानें पाहे कन्यारत्न । सत्यवतीसम अन्य न देखे ॥२८॥मग गाधीपाशीं येवून । ऋचीक मागे कन्यादान ।गाधी राजा गडबडून । मनीं म्हणे काय करावें ॥२९॥हा तों तपस्वी मुनी । दरिद्री वास करी वनीं ।याला कन्या देवूनी । काय उपयोग होईल ॥३०॥माझी एकुलती कन्या हे । नाजूक अति सुकुमारी हे ।वनीं कष्ट केवीं साहे । नोहे योग्य ही तापसासी ॥३१॥फिरवावा जरी मुनी । तरी कोपेल तत्क्षणीं ।शाप देवूनी आम्हां जाळूनी । टाकील हा क्षणार्धें ॥३२॥तरी याला नाहीं न म्हणावें । युक्तीनें मागें फिरवावें ।यापाशीं भलतेंच मागावें । असें योजी मनीं नृप ॥३३॥ऋचीका सत्कारूनी । राजा म्हणे ऐक मुनी ।माझी कन्या पाहूनी । भीड घालूनि मागती राजे ॥३४॥मग म्यां एक पण केला । जो सहस्त्र श्यामकर्ण अश्वाला ।भाग्यवंत देईल तयाला । हे कन्या देईन मी ॥३५॥म्यां प्रतिज्ञा केली असी । तुम्हां ती साधेल कशी ।असें ऐकतां वचनासी । ऋचीक नृपासी बोलत ॥३६॥सहस्त्र श्यामकर्ण । मी आणून देईन ।मला द्यावें कन्यादान । हें वचन न फिरवी ॥३७॥असें म्हणूनि करी ध्यान । वरुणापाशीं अश्व पाहून ।आकाशमार्गें गमन करून । येऊन वरुणा भेटला ॥३८॥म्हणे वरुणा मी ऋचीक ऋषी । पाळुनि पितृवचनासी ।साधावया गृहस्थाश्रमासी । उद्युक्त झालों ॥३९॥गाधीची कन्या योजिली । परी एक गोष्ट अडली ।जरी ती त्वां ऐकिली । तरी झाली कार्यसिद्धी ॥४०॥रायें केला एक पण । जो दे सहस्त्र श्यामकर्ण ।तया देईन कन्यादान । तुझे स्वाधीन हें आहे ॥४१॥स्वस्त्यस्तु ते वरुणा । मला देईं श्यामकर्णा ।ऐकोनी ऋषीच्या वचना । वरुणा भीति वाटली ॥४२॥मनीं चिंती वरुण । हा असे तप:पूर्ण ।याला न देतां शामकर्ण । कोपें पूर्ण शापील हा ॥४३॥तरी अश्वां पाजावी मदिरा । मग ते न जाती मुनीश्वरा ।योजूनि अशा विचारा । ऋषीश्वरा म्हणे वरुण ॥४४॥माझे उन्मत श्यामकर्ण । यांला वळवी असा कोण ।आवडे तरी दाखवून । देतों तुम्हां अश्व ते ॥४५॥ज्यांची वायूप्रमाणें गती । भूमीला पाय न लाविती ।पाहां मनुष्यां खावूं येती । असे असतेअए उन्मत्त ॥४६॥ऋषी म्हणे दावी मला । मी नेईन तयांला ।मग वरुण ऋषीला । दावी उन्मत्त श्यामकर्ण ॥४७॥योगसिद्धी जयापाशीं । तो ऋषी देखे अश्वांसी ।चापल्य सोडूनी तत्क्षणेंसी । शांत झाले ते सर्व ॥४८॥योगसामर्थ्य अचाट । खंखाळ अश्व चालती नीट ।कांहीं न करितां खटपट । अश्वां घेवून चालिला ॥४९॥वरुणा देवूनी आशीर्वचन । सहस्त्र अश्व घेवून ।ऋषी निघाला जलांतून । पूर्व देशीं पातला ॥५०॥अश्वा बाहेर काढी जेथून । तें अश्वतीर्थ म्हणून ।लोकीं झालें प्रख्यात पावन । गंगेमध्यें असे ते ॥५१॥असें ते अश्व घेवून । ऋषी राजाप्रती येवून ।म्हणे आणिले हे श्यामकर्ण । तुझें वचन पाळ तूं ॥५२॥ स्वस्त्यस्तु ते भूपाळा । सत्य करीं स्ववाक्याला ।कन्यादान देई मला । आतां कशाला अवकाश ॥५३॥अद्भुत माहात्म्य तें त्याचें । पाहतां मन गाधीचें ।प्रसन्न झालें योगाचें । सामर्थ्य अचाट न वर्णवे ॥५४॥हा दरिद्री म्हणून । मी करीत होतों अनुमान ।आतां याचें सामर्थ्य पाहून । कन्यादान द्यावे वाटे ॥५५॥ज्यापाशीं सिद्धी रांगती । त्याला होईल काय खंती ।देवही अनुकूल होती । उत्तमगती पावेल जो ॥५६॥हा जांवई झाल्यावरी । कृतार्थ होईल हे कुमारी ।हा माझ्याही वंशा उद्धरी । तेव्हां कुमारी द्यावी याला ॥५७॥असा निर्धार करूनी । सुमुहूर्त पाहुनी ।ब्राह्मविवाहविधी करूनी । मुनीला दे कन्यादान ॥५८॥महात्सवें विवाह झाला । आनंद झाला सत्यवतीला ।मुनीही आनंद पावला । राजकन्येला करीं धरितां ॥५९॥देवकन्येची उपमा द्यावी । असी सत्यवती बरवी ।जिला पाहुनी भुले रवी । तिला तपस्वी ऋचीक वरी ॥६०॥पाहूनी हें इंद्रादिदेव । म्हणती नवल हें अभिनव ।योगाचें हें वैभव । अपूर्व असे वाटतें ॥६१॥असा तो ऋचीक मुनी । गाधिकन्या वरूनि ।तेथेंचि राहिला संतोषूनी । पावूनी मनीं परमानंद ॥६२॥एके दिनीं गाधिराजा । लागे ऋषीच्या पदांबुजा ।म्हणे पुढें वंशीं माझ्या । नाहीं प्रजा योगींद्रा ॥६३॥लुप्तपिंडोदक पितर । खालीं पडतील निर्धार ।तुम्हीं समर्थ ऋषीश्वर । करा प्रतिकार प्रयत्नें ॥६४॥मला व्हावा सुत । तपस्वी उदार पुण्यवंत ।त्याची कीर्ती त्रिभुवनांत । आचंद्रार्क पसरावी ॥६५॥ज्यायोगें होवूनी ऋणमुक्ती । मला मिळेल सद्गती ।असें म्हणूनी नृपती । ऋषीप्रती नमन करी ॥६६॥दयाळू तो ऋचीक । म्हणे आतां राया ऐक ।तुला होईल एक लेंक । परम सुखदायक जो ॥६७॥आतां घेवूनी पत्नीसी । जातों पितृदर्शनासी ।ऐकूनी राजा तयांसी । बोळवी प्रीती करूनी ॥६८॥सत्यवतीसी घेवून । ऋचीक मुनी येवून ।भृगूचें घेवूनी दर्शन । तया निवेदन सर्व करी ॥६९॥ऐकून पुत्राची ख्याती । देवीसमान स्नुषा ती ।पाहूनी ऋषीची मती । अति संतुष्ट जाहली ॥७०॥तया आशीर्वचन देवून । राहवी आपुले संनिधान ।सत्यवती पातिव्रत्य करून । वागे अनुदिन शांतपणें ॥७१॥ती राजाची नंदिनी । सत्यवती मनस्विनी ।भृगूची शुश्रुषा करूनी । हृष्ट करी अनुदिन ॥७२॥तिचा पाहूनी स्वभाव । प्रसन्न झाला मुनिपुंगव ।म्हणे पाहतां तुझा भाव । आनंदा वाव नसेची ॥७३॥मी झालों प्रसन्न । देतों इष्ट वरदान ।मग सत्यवती कर जोडून । नम्र होवून बोलतसे ॥७४॥धर्मीं मती स्थिर व्हावी । वडिलांची सेवा घडावी ।हीच जोड मिळावी । काय करावी इतर जोड ॥७५॥भृगु म्हणे हे सत्य असे । तुझी निष्ठा तसीच असे ।जें कांहीं मनीं वसे । तसें देईन माग आतां ॥७६॥सून म्हणे आहो मामाजी । अपुत्रा दु:खी आई माझी ।तशीच स्थिती असे माझी । तुम्हीं राजी व्हावें आतां ॥७७॥होतां तुमची कृपादृष्टी । दु:ख कसें राहील गांठीं ।सुपुत्र येईल पोटीं । ही मोठी गोष्ट नसे ॥७८॥आपुला होतां प्रसाद । चारी मुक्ती धरिती पाद ।मग तेथें तुच्छ खेद । केवी कसा राहील ॥७९॥भृगु म्हणे सुनेसी । पुत्र होतील तुम्हांसीं ।सांगतों उपाय तयासी । एका भावेंसी आचरा ॥८०॥ऋतुस्नान होवूनी । परब्रह्म चिंतूनी ।तुवां अश्वत्थापाशीं जावूनी । तया पूजोनी आलिंगावें ॥८१॥तुझ्या मातेनें तेणें परी । आलिंगन द्यावें उदुंबरीं ।पुत्रकामेष्टी ज्यापरी । कथिली तशी करावी ॥८२॥संस्कृत चरू करून । ब्राह्ममंत्रें मंत्रवून ।विप्र देतील तो प्राशन । निर्धार ठेवूनी करी तूं ॥८३॥ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण । तुला होईल पुत्र जाण ।वेदशास्त्रसंपन्न । घेईल सन्मान तीन लोकीं ॥८४॥क्षात्रमंत्रें मंत्रवून । देतील जो चरू ब्राह्मण ।तो करितां भक्षण । तुझ्या मतेला पुत्र होईल ॥८५॥तो क्षत्रिय महाशूर । होईल अति उदार ।ज्याचा दरारा धरणीवर । होईल थोर निश्चयें ॥८६॥असें म्हणूनी भृगु सुता । म्हणे ऋचीका तुवां आतां ।पत्नीसी घेवूनी तत्वतां । श्वशुरगृहाप्रती जावें ॥८७॥तुवां ऐकिलें माझें वचन । तसी पुत्रकामेष्टी करून ।करवी चरु प्राशन । वाढेल संतान उभयतांचें ॥८८॥ऐकूनी असें वचन । मुनी स्त्रियेसी घेवून ।श्वशुरगृही येवून । पितृवचन सांगे तयां ॥८९॥गाधी आणि ऋचीक । पुत्रकामेष्टी करिती सम्यक ।परी व्यंग झालें एक । चरुप्राशनसमयांसी ॥९०॥कन्येचा चरु माता भक्षी । मातेचा चरु कन्या भक्षी ।ज्ञानचक्षूनें हें निरीक्षी । विश्वसाक्षी भ्रुगु तो ॥९१॥मग तेथें भृगु येवून । म्हणे काय केलें हें भुलोन ।व्यत्ययें झालें चरुप्राशन । संतानव्यत्यय होईल ॥९२॥ऐक सुने तुझा सुत । होईल क्षत्रिय बलवंत ।होईल तुझ्या मातेला सुत । तो विख्यात ब्रह्मर्षी ॥९३॥ऐकोनी सत्यवती नारी । मनीं अत्यंत दु:ख करी ।म्हणे मी झालें विप्रनारी । माझे उदरीं क्षत्रिय न हो ॥९४॥व्हावा ऋषी वेदनिपुण । तुम्हांसारिखा सर्वाभिज्ञ ।ज्याला मानिती प्राज्ञ । असा सुज्ञ पुत्र व्हावा ॥९५॥भृगु म्हणे आतां हें न घडे । पुन: सून पायां पडे ।म्हणे करा येवढें । पुत्र व्हावा ब्राह्मण ॥९६॥भृगु म्हणे सुनेसी । आतां फिरवितां मंत्रासी ।जरी ब्राह्मणत्व ये पुत्रासी । तरी येईल पौत्रासी क्षत्रियत्व ॥९७॥सत्यवती म्हणे श्वशुरा । येवो क्षत्रियत्व पौत्रा ।ब्राह्मणत्व यावें पुत्रा । तुमच्या गोत्रा साजेल हें ॥९८॥तथास्तु म्हणूनी जाई ऋषी । गाधी म्हणे मानसीं ।येईना कां ब्राह्मण कुशीं । माझे ख्यातीसी वाढवील ॥९९॥ मग दोघी झाल्या गर्भिणी । उत्तम डोहाळे लागूनी ।बोलती ब्रह्मज्ञान अनुदिनीं । गाधी मनीं तोषला ॥१००॥पुंसवनादी संस्कार । यथाकाळीं करिती सादर ।जातां नवमास बरोबर । प्रसवल्या दोघीही पुत्ररत्नें ॥१०१॥मग जातकर्में करिती । ब्राह्मणा धन वस्त्रें देती ।ब्राह्मण जातक पाहती । म्हणती होतील हे ऋषी ॥१०२॥सत्यवतीचा सुत । नामें जगदग्नी प्रख्यात ।जाहला परम बुद्धिवंत । ज्याला समस्त मानिती ॥१०३॥हा साक्षात् शिवशंकर । धरी असा हा अवतार ।धर्म स्थापावया भूमीवर । गौरीवर प्रगटला ॥१०४॥पतिव्रता सत्यवती । तिची पाहूनी अति भक्ती ।प्रसन्न होवूनी उमापती । अवतार धरी ऋषीरूपें ॥१०५॥गाधीचा तो पुत्र । नामें जाहला विश्वामित्र ।वाढे परम पवित्र । गायत्रीमंत्रद्रष्टा जो ॥१०६॥क्षत्रियाचे कुशीं आला तरी । चरुसंस्कारें अंतरी ।ब्राह्मणत्व ठसोनी सुविचारी । करी प्रयत्न विप्र व्हावया ॥१०७॥सर्व ऋषींसी विनवून । म्हणे मला करा ब्राह्मण ।ऋषी म्हणती वसिष्ठवचन । आम्ही मानूं सर्वथा ॥१०८॥मग वसिष्ठासी विनवून । साठ सहस्त्र वर्षें तप करून ।विश्वामित्र तो ब्रह्मऋषी म्हणून । प्रख्यात होवुन राहिला ॥१०९॥इति श्रीदत्तमाहात्म्ये अष्टादशोsध्याय: ॥१८॥ N/A References : N/A Last Updated : April 28, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP