मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीदत्तमाहात्म्य| अध्याय ३२ वा श्रीदत्तमाहात्म्य अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा श्रीदत्तमाहात्म्य - अध्याय ३२ वा श्रीमत्परमहंस वासुदेवानंदसरस्वतीस्वामीकृत श्रीदत्तमाहात्म्य Tags : dattagurudattavasudevanand saraswatiगुरूदत्तदत्तवासुदेवानंदसरस्वती अध्याय ३२ वा Translation - भाषांतर श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥दीपक म्हणे गुरुस । कृतार्थ केलें अलर्कास ।मग पुढें तयास । काय विशेष निरोपिलें ॥१॥गुरु म्हणे दीपका । श्रीदत्तानें एका ।प्रश्नें बोधिलें अलर्का । ज्ञानार्का उदित केलें ॥२॥अलर्क म्हणे भगवंता । पूर्ण प्रसाद केला आतां ।झाली खास कृतार्थता । उद्वेग चित्ता न येची ॥३॥स्वात्मरूपाहून । अहंकाराचें पृथक्करण ।करावया मुनिगण । तप आचरण करितात ॥४॥कल्पकोटी जातां । जो नये मूर्खाच्या हातां ।तया आत्मया आतां । अभिन्नपणें दाविलें ॥५॥जयजया जगन्नाथा । तुझ्या पायीं ठेवूं माथा ।प्रार्थना असे एक आतां । ती समर्थां ऐकावी ॥६॥जें हें जाहलें ज्ञान । तें राहावें स्थिर होऊन ।येथें पसरलें वासनावन । चित्तपवन आंत चाले ॥७॥याच्या जोरानें तत्वज्ञान । न जाणों जाईल कीं उडोन ।तरी उपाय सांगोन । स्थिर करून द्यावें हें ॥८॥घडल्याही दुर्जनाचा संग । याचा न व्हावा वियोग ।म्यां व्हावें नि:संग । असा योग सांगावा ॥९॥जन्म मिळतां मनुष्याचें । हेंच कर्तव्य तयाचें ।अन्यथा साफल्य न तयाचें । विषयांच्या सेवनानें ॥१०॥नाना योनी फिरोन । दैवयोगें करून ।मनुष्यजन्मा पावून । न करी पावन आपणा जो ॥११॥नरकीं जे भोगिले भोग । तेच येथें भोगितो भोग ।जो तयांचा करी वियोग । जो विराग न धरी ॥१२॥जो न होई नि:संग । त्याचें सर्व व्यंग ।त्याचा तो भवरोग । सदा अभंग जाणावा ॥१३॥हें सर्व समजून । बरवेपणीं उमजून ।म्यां केला हा प्रश्न । कृपावलोकन करा आतां ॥१४॥असा अलर्काचा प्रश्न । ऐकूनियां अत्रिनंदन ।म्हणे उत्तम केला प्रश्न । समाधान पावलों ॥१५॥( श्लोक ) श्रृणुष्वावहितोलर्क मुक्तये कारणत्रयं ।तत्वज्ञानं मनोभंगो वासनाक्षय एव च ॥१६॥अलर्का मुक्तीचें कारण । पहिलें तत्वज्ञान ।दुसरें मनाचें शमन । तिसरें जाण वासनाक्षय ॥१७॥स्ववर्णाश्रमोचित । फलाभिमानरहित ।कर्में करितां सतत । शुद्धचित्त होय नर ॥१८॥उपयोग काय कर्मांचा । असा कुतर्क मनाचा ।न करावा तयांचा । उपयोग साचा सांगतों ॥१९॥( श्लोक ) महापापवतां नृपां ज्ञानयज्ञो न रोचते ।प्रत्युत ज्ञानयज्ञस्तु प्रद्वेष्यो भासते स्वत: ॥२०॥( अर्थ ) पदरीं पुंज पापांचे । तया नरा ज्ञानयज्ञ न रुचे ।एवढेंच नोहे त्यांचें । ज्ञानयज्ञासी द्वेषी मन ॥२१॥स्ववर्णाश्रमोचित । करितां कर्में ईश्वरार्पित ।तेणें होय शुद्ध चित्त । मग हो सतत श्रवणरुची ॥२२॥( श्लोक ) रुचिद्वारोपकुर्वंति कर्माण्यत्मविमुक्तये ।अज्ञानस्याविरोधित्वान्न साक्षादात्मबोधवत् ॥२३॥अविद्याया न चोच्छित्तौ ज्ञानदन्यदपेक्षते ।ज्ञानोत्पत्तौ तु नैवान्यच्छमादिभ्यो ह्यपेक्षते ॥२४॥शमाद्युत्पत्तये नान्यच्चित्तशुद्धेरपेक्षते ।चित्तशुद्धौ च नित्यादिकमभ्यो नान्यदिष्यते ॥२५॥पारंपर्येण कर्मैवं ज्ञानायैवोपयुज्यते ।चित्ताशुद्धेरन्य्दयाच्छमादेर्न विमुच्यते ॥२६॥( ओवी ) रुचिद्वारें कर्में तीं । ज्ञानाला उपयुक्त होती ।अज्ञानासी विरुद्ध नसती । म्हणूनी साक्षाज्ज्ञानवत मुक्ती न देती ॥२७॥होतां अविद्येचा नाश । मुक्ती मिळे खास ।ज्ञानानें अविद्यानाश । होतो खास जाणावा ॥२८॥मिळतां शमादिक । ज्ञान मिळे सम्यक ।तेही शमादिक । चित्तशुद्धीनें मिळती ॥२९॥चित्तशुद्धी कर्में होते । असें परंपरेनें कर्म तें ।ज्ञानाला उपयुक्त होतें । म्हणूनी तें आदरावें ॥३०॥चित्तशुद्धी होतां । संन्यास करावा तत्वतां ।करूनी दृढ चित्ता । सद्गुरूला शरण जावें ॥३१॥गुरुशुश्रूषा करून । करावें वेदांतश्रवण ।अन्वय व्यतिरेक जाणून । करावें मनन श्रवणाचें ॥३२॥जें होय वाक्यज्ञान । तें हा अभ्यास करून ।स्थिर करितां भंगे मन । वासनानाश होईल ॥३३॥प्राकृतगुणासी वियोग । परब्रह्मासी योग ।इचें नांव मोक्ष चांग । होतां नि:संग मिळेल ॥३४॥वैराग्यानें संग तुटे । ज्ञानें वैराग्य भेटे ।विवेकें ज्ञान उमटे । सदसद्विचारें विवेक हे ॥३५॥देहेंद्रिय मन:प्राण । अहंकार अंत:करण ।हे भौतिक सगुण । हे सविकार निश्चित ॥३६॥पराक् असती असत । जरी होतां संयुक्त ।तरी ते संहत असत । ते परार्थ जाणावें ॥३७॥ते स्वत: जड असुनी । अन्योन्याध्यासें करूनी ।येती चेतनसे दिसूनी । अग्निसंयोगेम लोह जसें ॥३८॥देहादिक जड असूनी । आत्मसान्निध्येंकरूनी ।येती चेतनसे दिसूनी । हें अज्ञानी नेणती ॥३९॥प्रत्यगात्मा तयांहूनी । वेगळा साक्षी असूनी ।अध्यासे विपरीत भासूनी । ये अज्ञानी जनाला ॥४०॥मग उठे अहंकार । मग कर्में करिती सादर ।कर्मे बंध पडे घोर । तेणें वारंवार भ्रमण होय ॥४१॥अज्ञानें अविवेक गहन । अविवेकें अभिमान ।अभिमानें रागादिक उठोन । त्रिविध कर्म घडून ये ॥४२॥कर्में उपजे शरीर । कर्मे सुख दु:ख घोर ।एवं ही वारंवार । परंपरा चालेल ॥४३॥होतां अपरोक्षज्ञान । नष्ट होई अज्ञान ।नष्ट होतां अज्ञान । नष्ट होई अविवेक ॥४४॥होतां अभिमानाचा नाश । होतो अभिमानाचा नाश ।होतां अभिमानाचा नाश । रोगादिनाश होतसे ॥४५॥कर्मनाशें शरीर न होई । मग सुख दु:ख जाई ।असा बोध जेव्हां होई । मग येई मोक्षसुख ॥४६॥तेव्हां ज्ञानावांचून । नोहे कधीं समाधान ।मनोनाश होतां जाण । ज्ञान पूर्ण बाणें तें ॥४७॥मनोनाशाकरितां । योगाभ्यास करावा तत्वता ।मग वासनाभंग होतां । विदेहकैवल्य मिळेल ॥४८॥म्हणोनी सांगतों योगाभ्यास । सांगोपांग तूं परिस ।एकाग्र करोनी चित्तास । मग खास निवशील ॥४९॥होता मनाची समता । योग ये आपुल्या हाता ।मग ती मुक्तता । ये हाता अनायासें ॥५०॥अलर्क पुसे गुरूसी । चंचळत्व असे मनासी ।मग समता तयासी । येईल कसें सांगावें ॥५१॥( श्लोक ) ॥ युज्यते वेष्टनं वायोराज्काशस्य च खंडनं ।ग्रंथनं च तरंगाणां नास्था मनसि युज्यते ॥५२॥( ओवी ) ॥ असें अलर्काचें वचन । ऐकोनि बोले अत्रिनंदन ।म्हणे तुझें सत्यवचन । चपळ मन दुर्जय ॥५३॥वैराग्य किंवा अभ्यास । हे जयोपाय तयास ।वैराग्य होतां खास । ये मनास निश्चळता ॥५४॥दोषदृष्टी विषयांवरी । मग जिहासा तयावरी ।पुन्हा आठवतां वीट भारी । येतां बरी विरक्ती हो ॥५५॥किंवा अभ्यासावा योग । तो असे अष्टांग ।हा करी दु:खवियोग । दु:संग तोडुनी ॥५६॥यमनियमीं देह शोधून । आसनीं स्थैर्य पावून ।प्राणायामीं दोष शोषून । पिंडशोधन होतसे ॥५७॥प्रत्याहारें इंद्रियजय । धारणेनें पापक्षय ।ध्यानानें मन:स्थैर्य । एकत्व होय समाधीनें ॥५८॥जसें सुवर्ण मलीन होतां । अग्नीचा ताव देतां ।तया ये पूर्वरूपता । मळ मळतां निश्चयें ॥५९॥तैसें योगाभ्यासें । मनोमळ जळतसे ।पूर्वरूप येतसे । बोलतसे असें वेद ॥६०॥प्राणापाणनिरोधन । तोचि प्राणायाम जाण ।त्याचे त्रिविध लक्षण । लघुमध्योत्तमभेदें ॥६१॥घर्म ये लघुप्राणायामें । कंप उठे मध्यमप्राणायामें ।ब्रह्मरंध्रीं उत्तमप्राणायामें । प्राण जाई निश्चित ॥६२॥वामहातीं टाळीं देऊन । तया करावी प्रदक्षिण।हें मात्रेचें प्रमाण । किंवा श्वासोच्छवास निद्रिताचा ॥६३॥किंवा तर्जनी फिरवून । जानूसी करावी प्रदक्षिण ।एक चुटकी वाजवून । मात्रामान मानावें ॥६४॥बारा मात्रांसी सम । कनिष्ठ प्राणायाम ।चोविसांनीं मध्यम । उत्तम अठ्ठेचाळिसांनीं ॥६५॥श्वास घेणें तो पूरक । धरणें तो कुंभक ।सोडणें तो रेचक । मिळोनी एक प्राणायाम ॥६६॥तया पुरकाहून । कुंभक तो चतुर्गुण ।रेचक साधावा द्विगुण । उत्तरोत्तर जाण वाढवावा ॥६७॥जोरानें रेचक करितां । शीघ्र येई दुर्बळता ।सोईसोईनें सोडितां । ये अरोगता निश्चित ॥६८॥हळुहळू करितां अभ्यास । जिंकवेल प्राणास ।जसा सोईनें सिंहास । वश्य खास करवेल ॥६९॥बळें वश्य करितां । कधीं न ये हातां ।हळूहळू अभ्यासितां । होय वश्य निश्चयें ॥७०॥वश्य करितां जसा हरी । छू करितां मृगा धरी ।वश्य करितां तयापरी । प्राण मळातें ॥७१॥वश्य होतां सिंह । न तोडी धन्याचा देह ।वश्य प्राणेम देह । नोहे पीडित ॥७२॥चालतां अभ्यसक्रम । नासे शुभाशुभ कर्म ।ईचें ध्वस्ती नाम । योगी विश्वास पावती ॥७३॥जे लोभमोहात्मक । सर्वकाम ऐहिक ।तसेच पारलौकिक । हे सकळिक नष्ट होती ॥७४॥शांत होय चित्तवृत्ती । होई सुखाची प्राप्ती ।इला प्राप्ती म्हणती । योगी डुल्लती जियेनें ॥७५॥वाढे ज्ञानसंपत्ती । त्रैकालिक अर्थ कळती ।ही प्राणजयाची स्थिति । इचा म्हणती संवित्त ॥७६॥इंद्रियें होती प्रसन्न । मन पावे समाधान ।ही प्रसाद म्हणून । अवस्था जाण चवथी ॥७७॥ह्या अवस्था चार । साधी तो योगीश्वर ।त्याला ईश्वर नाहीं दूर । त्याच्या बरोबर प्रत्यक्ष वसे ॥७८॥असएं व्हावया साधन । अभ्यासक्रम सांगेन ।ऐक तूं मन देऊन । समाधान पावशी ॥७९॥पद्मासनीं बैसोन । शरीर करोनी समान ।दांतां दांत न लावून । दृष्टी ठेवून नासाग्रीं ॥८०॥हालवितां अंग । शीघ्र न साधे योग ।म्हणूनी ताठूनी अंग । धरितां योग साधेल ॥८१॥आळस निद्रा भ्रांती । ह्या तमोगुणाच्या वृत्ती ।त्या जिंकूनी पुढती । योगाभ्यास करावा ॥८२॥काम क्रोध लोभ यत्न । या रजोगुणवृत्ती जाण ।या विक्षेपें न घडे ध्यान । म्हणूनी ह्या सोडाव्या ॥८३॥वैराग्य शमदमादिक । या सत्ववृत्ती सम्यक ।ह्या धरितां साधक । पावे सुख अभ्यासीं ॥८४॥जो केवळ कुंभक । न साधे सम्यक ।तोंवरी पूरक रेचक । धरूनी कुंभक साधावा ॥८५॥न घेतां न सोडितां । उगी स्तब्ध राहतां ।प्राण न हो खालता । अथवा वरता योग्यां ॥८६॥योगी न हो घाबरा । वायू कोंडे बरा ।केवळ कुंभक तो खरा । तो साधावा यत्नानें ॥८७॥असा प्राण जिंकावा । मग प्रत्याहार करावा ।तेणें मग जीवा । समाधान वाटेल ॥८८॥जसा कूर्म अंगें आवरी । तसा जेव्हां इंद्रियां सांवरी ।तेव्हां प्रत्याहार होय तोंवरी । ना वारिजेल बाह्य भान ॥८९॥होता प्रत्याहार । शब्द नये कानावर ।स्पर्श नेणें शरीर । घडतें बाहेर काय तें ॥९०॥विषय ठावे न होती । इंद्रियें स्थिर राहती ।ही प्रत्याहाराची स्थिती । योगी जाणती आत्मनिष्ठ ॥९१॥प्रत्याहार झाल्यावरी । धारणा करावी बरी ।नाभ्यादि देशावरी । चित्तस्थिरीकरण व्हावें ॥९२॥ही धारणा साधतां । दोष जाती सर्वथा ।योगिया ये स्वस्थता । उद्विग्नता न येईल ॥९३॥मग करावें ध्यान । चित्तैकाग्र्य होऊन ।होई परम समाधान । हें साधन उत्तम ॥९४॥हें ध्यान विसरतां । जेव्हां ध्येयाकारता ।आपोआप ये चित्ता । हे समाधी जाणावी ॥९५॥न हाले न चाले मन । ध्येयाकार होऊन ।निश्चल राहे अनुदिन । हे जाण समाधी ॥९६॥आपण आपणा पाहून । राहे संतोषून ।हालावया तेथून । न होय भान सर्वथा ॥९७॥हेचि निरुपाधिक । जाणावें नित्य सुख ।याहूनी नसे अधिक । त्रिभुवनीं सुख सर्वथा ॥९८॥ह्या सुखाचें लक्षण । वर्णून सांगेल कोण ।हें आपुलें आपण । जाणावें पूर्णपणानें ॥९९॥हा सर्व रसांचा रस । याहून जे रस ।ते यापुढें विरस । तयां रस कोण म्हणेल ॥१००॥इतर जे रस । ते ठावें इंद्रियांस ।हा अतींद्रिय रस । बुद्धिवृत्तीस घेववेल ॥१०१॥विषयरस नश्वर । असती क्षणभंगुर ।तेणें विरहताप थोर । ते निरंतर न मिळती ॥१०२॥विषयरस सोपाधिक । हा रस निरुपाधिक ।हेंचि स्वरूपसुख । नसे अधिक याहून ॥१०३॥हें सुख स्वाधीन । इतर तें पराधीन ।येथें होता लीन । सर्व शीण उतरे ॥१०४॥अलर्का याहून । मोक्षाचें साधन ।सुगम नसे आन । म्हणूनी योग करी तूं ॥१०५॥अभ्यासाचे गुणदोष । जाणावे ते नि:शेष ।तरीच होय तोष । ना तरी त्रास होई ॥१०६॥गुण दोष न जाणून । करितां योगध्यान ।योगी पावे समाधान । नातरी विघ्न येईल ॥१०७॥इति श्रीदत्तमाहात्म्ये द्वात्रिंशतितमोsध्याय: ॥३२॥॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : May 02, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP