प्रसंग सतरावा - संतापाचा पाडाव
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
आत्म्यानें घेतला इमान विडा । पुढें मन तेजी ढकलिला गाढा । द्विदळासी घालूनि वेढा । कटक बुडविलें ॥१९८॥
मग आत्मा म्हणे रे आळसा । बहुत करीन म्हणत होतासी वळसा । भांडण कैसें आणिलें कळसा । अहंकार मारूनियां ॥१९९॥
संताप वेढ्यांतून बाहेर पळाला । तेणें मदन हस्ती लोटला । आत्मा कासाविस केला । व्याकुळ चेतना हस्तिनी लोटली ॥२००॥
निद्रा शक्ति महा कुंटणी । डोळे घाली आत्म्यालागुनी । ते विंधिली करार बाणी । हस्ती हस्तिनीं देखिला ॥२०१॥
संताप पडिला मेदिनीं । आत्मा विंधों लागला बाणीं । काकुलती ये धाय मोकलुनी । मज राखा राखा म्हणतसे ॥२०२॥
मग संताप म्हणे जी आत्मनाथा । मन आलें ज्याच्या हातां । त्यासी आमचें कांहीं न चले तत्त्वतां । सद्गुरुपदीं बैसला तो ॥२०३॥
मग संताप बोले थोरी । ऐसा जो अहंकारातें मारी । तुम्ही आमची केली खोरी । शेख महंमद म्हणोनियां ॥२०४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP