मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
स्‍वाधिष्‍ठान चक्रीं निवास

प्रसंग सतरावा - स्‍वाधिष्‍ठान चक्रीं निवास

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तेथे राहिलों अधिष्‍ठांनीं । पांचहि प्राण एकवट करुनी । दहा पवनांसी बंद देउनी । गंभीर जालों ॥७२॥
जालों गिळून ज्‍यालेपणास । ठाव नाहीं जिवशिवास । याति नांवाचा जाला र्‍हास । श्रद्धा बाणली अंगीं ॥७३॥
नाभीहूनि चढविला पवन । हृदयीं ओळखिलें मन । त्‍या मनाचें सांगेन चिन्ह । श्रोत्‍यांप्रती ॥७४॥
श्रोते प्रश्र्निक संतजन । महा कुशल ज्ञानी संपूर्ण । त्‍यापुढें शेख महंमद दीन । अज्ञान सलगी बोले ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP