मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक

प्रसंग सतरावा - संतापदमनार्थ मुक्ती रिद्धिसिद्धीचीं कुमक

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ऐसा तो तिळातांदळा अहंकार । कोणासी घेऊ उपसार । तो मारिला कवण विचार । अवगुण बोले ॥१९२॥
अग्‍निचक्र दिव्य दळ । तेथें हा फितवा जाला प्रबळ । आत्‍म्‍यानें ऐकिलें केवळ । श्रवणेंविण ॥१९३॥
मग आत्‍म्‍यास पडिला विचार । म्‍हणे सायासें मारिला अहंकार । संतापे फितवा केला थोर । कैसे करावें पां आतां ॥१९४॥
हे वाजेविण बोलिला आत्‍माराम । मग मदत करी मेघःशाम । धाडी खाशांचें हशम । ते परियेसा पां ॥१९५॥
ऐका क्षमा दया निज शांति । यावेगळ्या चारी मुक्ती । सवें आत्‍म्‍यास वोळंगती । विपरीत बुद्धि ॥१९६॥
आणीक आल्‍या न वहि रिद्धि । ओळखा अष्‍टमा शीघ्र सिद्धी । तोंडावरी देऊन आराबा ज्ञानविधि । केला इमान आत्‍मनाथें ॥१९७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP