प्रसंग सतरावा - दीपाचा पाडाव
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
पाडी पाडी म्हणऊन आला दीप । म्हणे मी अहंकाराचा बाप । चारी वेद करितील जप । मजपासूनियां ॥१४२॥
दीप म्हणे रे आत्मसुता । तूं उतर तेजियाखालता । नाहीं तरी गिळीन क्षण न लागतां । मी दीपराव ॥१४३॥
आत्म्यानें खडग् ओढूनियां भावो । घातला दीपाचे शिरीं घावो । सकळ तोडिले उपावो । आत्म्याराउतें ॥१४४॥
अहं सोऽहं स्वार्थ तर्क धोका । हे तंव पायदळाची टीका । अजात करूनी सोडिले ऐका डावे उजवे घेऊनियां ॥१४५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP