मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
द्वैताद्वैत

प्रसंग सतरावा - द्वैताद्वैत

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


बहुसाल जिवंत ते योगेश्र्वर । त्‍यांचा वर्णिता न ये पार । जड मूढ तारावया उपकार । तिही ग्रंथ केला ॥९॥
जैसा वनस्‍थळीभीतरीं । साव जन्मला परउपकारी । जहाज होऊनि सिंधुभीतरीं । जन तारियलें ॥१०॥
उपमा जहाजाची न साहे । जहाज करितांचि होये । मागुती तें भंगूनि जाये । म्‍हणऊनि तुकीं हीन ॥११॥
साधूची उपमा साधुलागुनी । जैसी रवीची उपमा रवि किरणीं । दोहींत अभिन्नत्‍व मांडणीं । अद्वैतपणें ॥१२॥
अद्वैतापासून द्वैत भास । जैसें रविपासूनि बिंब प्रकाश । वेगळीक नाहीं दोहींस । मूळ एकपणें ॥१३॥
पाहातां परतलिये दृष्‍टी । द्वैत अद्वैताचें पोटीं । भिन्नत्‍व दिसे सृष्‍टीं । करूपनेसंगें ॥१४॥
काजळी धरिलिया दीपें । तरळले दृष्‍टीस लोपे । दोन दिसती दीप रूपें । परि तें एकचि असें ॥१५॥
कल्‍पना निज दीपाची काजळी । वासना ते आहे बेंबाळी । अविद्या तंव मैस काळी । उमटत असे ॥१६॥
वरी धरिलिया भ्रांतीचें खापर । पडती विषय-मैसीचे डोंगर । लिहिजे चैत्‍न्‍याचा विचार । अभिलाषलेखणीनें ॥१७॥
परमार्थ विवेकाची काडी । विश्र्वासें करी धरूनि आवडी । सद्‌गुरुवचनें काजळी तोडी । सद्भाव धरूनियां ॥१८॥
प्रकाशें प्रकाश होईल गाढा । भासेल निज परब्रह्म उघडा । लोपून जाणिवेच्या चरफडा । द्वैत अद्वैतेल ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP