प्रसंग सतरावा - गारेचा दृष्टांत
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
वोळखा क्षीरन्यायें श्रीपति । निमग्न व्हावें सद्गुरुभक्ती । तरीच मिळणी होय निरुती । जळगार जळीं जैसी ॥२५॥
गोठोनि जळगार जळीं पडे । प्रयत्नें पाहातां न सांपडे । तैसा निजभक्त नातुडे । निजीं निर्विकार जाला ॥२६॥
जळ विकारोनि साकारलें । नांव गार ऐसें पावलें । समुद्रीं पडतां समुद्र होऊनि ठेलें । सागरीं सागरपणें ॥२७॥
ऐसा लिंग देह होय चूर्ण । तरीच जाणा मरणासी ये मरण । पाहतां यातिकुळाचें लक्षण । असेंच ना ब्रह्मीं साक्ष ॥२८॥
जाणतपण नेणतपण मुरालें । मींतूंपण गुरुत्वी विरालें शेख महंमदपण लोपलें । तदाकार विश्र्वंभरी ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP