मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
संताप आळस

प्रसंग सतरावा - संताप आळस

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


संताप तेव्हां भोंवते पाहे । म्‍हणे मज पाठीराखा कोण आहे । आळस म्‍हणे आलों पुढें पाहे । जांभई आरोळी दिधली ॥१५४॥
संताप म्‍हणे आळसराया । तुजसारिखा असतां मज साह्या । आत्‍मा येऊं न शके आमुच्या घाया । आतां पाडाव करीन ॥१५५॥
मग आळसें तुबक घेतली शिंक । भीतरी दारू भरली भूक । रंजक चेतविली ते गोळा दुःख । भडिमार केला ॥१५६॥
मग अविचाराचा धूर । अविवेक कुटुंब दाटला चौफेर । पडला गुर्मीचा अंधःकार । उमज नाहीं कटकासी ॥१५७॥
संताप म्‍हणे रे आळसा । आतां आत्‍म्‍यास करूं वळसा । मग भांडण येऊं दिधल्‍या कळसा । मग आत्‍म्‍यास ठाव नाहीं ॥१५८॥
मग पातले गुण अवगुण । म्‍हणती आत्‍म्‍यास करूं भांडण । तुम्‍ही पाठ राखावी संपूर्ण । आळसा संतापा ॥१५९॥
गुण अवगुण पुरुषार्थें । बोलती आपुलाली मतें । सांवरूनि भांडण मागुतें । देऊं म्‍हणताती ॥१६०॥
आपुल्‍या पुरुषार्थाची वाणी । सांगती एकमेकांलागुनी । ते ऐकावें श्रोतेजनीं । प्रश्र्निकपणें ॥१६१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP