मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अहंकाराचा प्रभाव

प्रसंग सतरावा - अहंकाराचा प्रभाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


ज्‍याचें मनीं कल्‍पना मुराली । लिंग देह वासना विराली । तो प्राप्त पुरुष ऐसी बोली । शेख महंमद निबंध साक्ष ॥१८७॥
निबंध आडकथा सांगेन । मग तें लाविलें अनुसंधान । एकाग्र होऊनि श्रोतेजन । रहस्‍य घ्‍यावें भावें ॥१८८॥
ठायीं ठायीं श्रोते हटकिले । झोपीं जाणार ते सावध केलें । सावध होते ते नमस्‍कारिले । सन्मुख वचनें ॥१८९॥
मग रामासी चढला अहंकार । तेणें मारविला तो दशशीर । ऐसें अहंकारें बुडविलें घर । बहुतेकांचें ॥१९०॥
मागुतें वालीचें उसनें । द्वापारीं दिधलें रामचंद्रानें । वाली कोळी झाला वोळखा खुणें । भालुका तीर्थी सूड घेतला ॥१९१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP