मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अहंकाराशी भांडण

प्रसंग सतरावा - अहंकाराशी भांडण

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


तेथूनि काढावा काढिला मागें । ईश्र्वरापें आलों लागवेगें । अहंकार पातला मागें । पाडी पाडी म्‍हणउनी ॥९८॥
रेचक कुंभक पूरक त्राहाटिले । तंत वितंत घन सुस्‍वर वाजविले । पांचहि प्राण नामजाद केले । दहा पवन हशम देऊनियां ॥९९॥
मग अहंकार मागें मुरडलां । येऊनि हृदयस्‍थानी उतरला । महा अविचारें खांद बांधला । आत्‍मनाथासी ॥१००॥
विचार हृदयीं रणखांब रोविला । धैर्ये सेंदुरें स्‍थावरिला । ये झुंजो म्‍हणऊनि मूळ पाठविला । विकल्‍प हूल-स्‍वार ॥१०१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP