मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग सतरावा|
अहंकाराचा पाडाव

प्रसंग सतरावा - अहंकाराचा पाडाव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


सन्मुख देखोनि आत्‍मा राउत । अहंकार खाऊं लागता दांत । म्‍हणे कैसा करीन चोपट घात । सामोरा येई पां ॥१२४॥
आत्‍म्‍यानें हांकिलें अहंकारा । आतां सांभाळी रे कुटितो चोरा । मज आत्‍म्‍यापुढें गव्हारा । कैसा जाशील आतां पां ॥१२५॥
अभिमंत्रून सद्‌गुरु उत्तर । तोचि कासिस काढून तीर । छेदिलें अहंकाराचें शीर । पहिल्‍या मजुर्‍यानें ॥१२६॥
समस्‍तांचा राजा अहंकार । ते पाडिली मुदल धूर । मग येरांचा जाला केर । ठायींच्या ठायीं रगडोनियां ॥१२७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP