प्रसंग सतरावा - योगसंग्राम
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
ऐका या ग्रंथाचें नाम । जाणिजे योगसंग्राम । वक्त्यां श्रोत्यां ठाऊक पडें वर्म । अंतर्गृह्यांचें ॥४१॥
प्रथम निर्गुण साकारिलें । सहजांत सहज विस्तारिलें । बावन्नाचे दळवाडे । मेळविले । स्थूळ धरूनियां ॥४२॥
आतां येथून योगसंग्राम । शूरत्वें सांगेन ऐका तमाम । श्रोतेजनीं होऊनियां सम । ऐक्यें परिसावें ॥४३॥
एक सांडूनियां संसार । होतील योगी दिगंबर । परतोनि धोवया अंतर । तें सांगतां जालों ऐका ॥४४॥
सांगेन ऐका बयाजवार । ज्यांनीं व्यापिलें हें शरीर । आत्महितास पडलें अंतर । ज्याचेनि गुणें ॥४५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP