प्रसंग सतरावा - जाणतपण-नेणतपण
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
नेणतपण लोखंडाची बेडी । जाणतपण कानकाची तोडी । या दोहींवेगळी परवडी । होय तूं बापा ॥२०॥
नेणतपणें होय अविचारी । जाणतपणें करी भरउपरी । या दोहीगुणें श्रीहरि । अंतरला पां ॥२१॥
अंतरला जीवाचा सज्जन । करा भावभक्तीचें आराधन । मन सुमन वाहून । हरि वोळगावा ॥२२॥
जाणतपणें करी शब्द विवंचना । तों तों फांटा फुटतसे मना । द्वैतपणें मूढ पशू जाणा । हुंबरत असे ॥२३॥
नेणतपणें लांकुड जैसा । जाणतपणें होय कोळसा । निमग्न जालियाविण परियेसा । न मिळें क्षिरी ॥२४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP