मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - फेरावरील कथाकाव्य लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत फेरावरील कथाकाव्य Translation - भाषांतर अवं तू फुकाचे बटकोरी । अवघं धूनं का धूवावं ।पाण्याले लावू नको दगडावर ठेवू नको ।धुनं धून बगळयाचे पंखं ।विजूरा रडती फडती । केस कुरळे तोडती ।साती बगळे जमा झाले काहून रडता बिजूराबाई ।खाडाड सुनेचे गाणेखाऊन पिऊन झाली तंबूर । जीव देते मी सासूवरगेली बारनीच्या घरी हे पैशाचे आणले शंभर पान ।पतीसमोर जीव देते मी सासुवर ।गेली वाण्याच्या दुकाना आणलं सव्वाशेर खोबरं ।एका शेराचे केले बोंडं । तीन शेराच्या केल्या पोळया ।ताट केलं सासुदेखत । जेवत बसली सासूसमोर ।खाऊन पिऊन झाली तंबूर । जीव मी देते सासूवर ।खाऊन पिऊन राधाबाई फुगल्या आणि फुसकन गेल्या ।फुगडीगाणेआपरी खाली टिपरु, टिपर्या खाली गळा । बायका केल्या सोळा ।केल्यात् केल्या पळू पळू गेल्या फू फूपळता पळता मोडला काटा । शंभर रुपये आला तोटा ॥बीभत्सरसाची गाणीगावखोरी पांढरीत पेरला आंबट चुका बाई चुका ।मांडवाचे दारी ईव्हाई घेतो ईहिणीचा मुका ।किंवाअवेह ईहिनबाई तुम्ही येवायले चला ।हत्ती एवढ उंदिर तुमच्या काष्टयातून गेला ॥किंवाशालूच्या पडदण्या देणं होतं आमच्या मनी ।तुम्ही आणल्या भाडयाच्या वर्हाडणी ।मांडवाच्या दारी इहिन बसली मुताया ।ईव्हाई म्हणतो इहिनीले काय वाजतं ।गाव जेवणाचे वरण शिजतं ॥किंवानणंदबाई नणंदबाई तुमच्या परकोराले जाई ।रातीचं भांडण तुमच्या शिगोरीच्या पायी ॥किंवानणंदबाई नणंदबाई तुमच्या परकराले कसे ।राती भांडण झाले तुम्हाले मुसलमान पुसे ॥किंवासगळे उखाणे मह्या मुखात ।सगळे मुंगळे ईहिनीच्या मुखात ।किंवावान्याच्या घरावर गुळाचा भेला ।मेला पण ल्योक नाही झाला ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP