मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - पोळा

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


पोळीयाच्या दिसी गाई झाल्या वरमायां ।
याहिच्यापोटचे नंदी गेले मिरवाया ॥
पोळीयाच्या दिसी येसी बांधले तोरणं ।
मानाचे बैल जातील तोरणाखालून ॥
जमिनाचा भार उचलला कोनं?
गाईच्या पुतानं जुआले देली मानं ॥
गहू मी दळते एका मांडी मण-मणं ।
मह्या गं घरी वसुराजाचं लगनं ॥
पोळीयाचे दिसी पाच येढे मारोतीले ।
सावळया बंधूचे नंदी मानाचे पुढे ॥
सोन्याचं पिंपळपान पायात पैंजणं ।
मिरवाया नेले बाई नंदी नेणंत्या राघोनं ॥

किंवा
बैल नंदिण्याचे मोठे मोठे शिंग ।
दारकेच्या दिशी बांधले बाशिंग ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP