अक्षरांची लेणी - समाजजीवन
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
अक्कण माती चिक्कण माती । जातं ते रोवावं ॥
असा रवा सुरेखबाई । करंज्या कराव्या ॥
अशा करंज्या सुरेखबाई । तबकात भराव्या ॥
असं तबक छानबाई । माहेरी पाठवावं ॥
असं माहेर सुरेखबाई । खेळायला मिळते ॥
असं सासर द्वाड मेलं । कोंडू कोंडू मारते ॥
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे । माहेरच्या वाटे हळदकुंकू दाटे ॥
सासुबाई सासुबाई मला मुळ आलं ।
मला काय पुसते बरीच दिसते । पुस आपल्या सासर्याला ।
मामंजी मामंजी मला मुळ आलं ।
मला काय पुसते बरीच दिसते । पुस आपल्या नणंदेला ।
कारल्याची बी लाव गं सूनं ।
मग जा आपल्या माहेरा ।
सासूरवाशी तू घरात येईना कैसी ।
सासरा गेला समजावयाला ।
चलाचला सुनबाई आपल्या घराला ।
मी नाही यायची आपूल्या घराला ।
किल्ल्याचा जोड देतो तुम्हाला ।
शिक्यावरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी ।
आता माझा दादा येईल गं येईल गं ।
त्याला तुझं नाव सांगीन गं सांगीन गं ।
घे काठी लाग पाठी घरादाराची लक्ष्मी मोठी ।
भाद्रपदाचा महिना आला । पार्वती म्हणे शंकराला ।
चला हो माझ्या माहेराला । रंगीत पाट बसायला ।
सोन्याचं घंगाळ आंघोळीला । चांदीचं ताट जेवायला ।
आपे दुध तापे त्यावर पिवळी साय ।
लेकी भुलाबाई तोडे लेवून जाय ।
कशी लेवूदादा घरी नंदा जावा ।
करतील माझा हेवा । हेवा परोपरी नंदा घरोघरी ।
नंदचा बैल डुलत येईल । सोन्याचं कारलं फेकत जाईल ।
भुलाबाई राणीचे डोहाळे । तिचे डोहाळे तिला भारी ।
नेऊन टाका पलंगावरी । शंकर बसले भुयारी ।
पहिल्या मासीचा गरभा । सरता सरता नजर गेली ।
चिक्कू बनावारी चिक्कू बनजी पिकले ।
अशा प्रकारे सगळया फळांची नावे घेतली जातात व डोहाळे संपतात.
मग भुलाबाईचे बाळंतपण ।
भुलाबाई बाळंतीण पहिला दिवस ।
पहिल्या दिवशी बाळाला टोपी ।
खारकाची गोणी लोटली अंगणी ।
भुलाबाई बाळांतीण दुसरा दिवस ।
अशा प्रकारे काजू, किसमिस, बदाम अशा पदार्थाची नावे घेतात. मग शेवटचे गाणे म्हणजे पाळणा असतो.
एक लिंबु झेलू बाई. दोन लिंबू झेलू ।
तीन लिंबू झेलू बाई, चार लिंबू झेलू ।
पाचाचा पाळना नाव ठेवा हनुमंता ।
हनुमंताची निळी घोडी येता जाता कंबळ मोडी ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP