अक्षरांची लेणी - बारी भजन
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
गुरवांचे मुलानं भोपळा चिरला त्यात अळी कां निघाली हो रामा
अळीचा भुजंग झाला । भुजंग बाळाले चावला हो रामा
बाळानं किरकाळी (किंकाळी) ठोकली हो रामा
माता धावत हो आली । पान बाळाले लागलं हो रामा
वाट मारगाची धरली हो रामा
आरसू मरसू दोन गावं हो रामा
गंगा वाहे मधातून हो रामा
तिथं वडाचं बन हो रामा
तिथं शेंदराचं (भैरवाचं) ठानं हो रामा
बाळ ठाण्यावर नेलं हो रामा
धनात्रि गुरुनं पाह्यलं हो रामा, इथून बारीचं खंडन हो रामा
एका सोमवार्या दिली । महादेव पारबती उपाशी रामा हो
हाती विस्तवाची गौरी । गेले कुणब्याच्या वावरी हो रामा
देव पाच कणसे घेता ।
कुणब्याने अंबाडया उपटल्या देवाच्या पाठी सडकल्या रामा हो
देवानं पाच लहूचा नाग केला । शेतकर्याच्या वावरी घातला
नाग कुणब्याला चावला । कुणबी धरतरी पडला हो रामा
खबर कुणाला कळली । खबर धनात्री बाबाला हो रामा
पुढे गुरु मागे घेता । गेले येशीच्या दरबारी हो रामा
पुजा हनुमंताची केली ।
पाहिला शिडकावा केला कुणबी सावसुद झाला हो रामा
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP