मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - गोंधळी

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


लालां लो ‘माय लाला’ लो ।
गाव शिव मायवानी ब्राह्मण लो ।
माहुरचे रेणूके गोंधळा यावे ।
तुळजापुरचे तुळजाई गोंधळा यावे ।
मुंबईचे मुंबादेवी गोंधळा यावे ।
कोल्हापूरचे लक्ष्मीबाई गोंधळा यावे ।
चिखलीचे रेणूके गोंधळा यावे ।
अमडापूरचे बल्लाबाई गोंधळा यावे ।
भरचे लोढाई गोंधळा यावे ।
रिसोडची पिंगळाई गोंधळा यावे ।
साती समिंदरा गोंधळा यावे ।
साती आसरा गोंधळा यावे ।
चांद सूर्या गोंधळा यावे ।
आठव्या महिशासुरा गोंधळा यावे ।
नवव्या नवरात्री गोंधळा यावे ।
दहाव्या नवरात्री गोंधळा यावे ।
अकरा रुद्र मारोती गोंधळा यावे ।
आग्या वेताळा गोंधळा यावे ।
हाकारा केला मेळ मिळविला । चौकट योगिनींचा ।
घट भरला अंबाबाई वाट तुझी पाही ।
सुवर्ण शेला कटी कसला । फुलांचा शेला हाती केला ।
परसराम बाळ कडी घेतला । गोंधळ ऐकून शृंगार केला ।
पायाचे मेळी घटेल गोंधळी । सूर संबळ घाल गोंधळ ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP