अक्षरांची लेणी - सर्पविष
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
गुरुले (शंकर) पान लागलं चेल्याला बातमी गेली ।
चेले वाटमार्गी लागले तिठं नारद भेटले काय झाले ।
शिष्य सांगू लागले गुरुले पान लागलं ।
तव्हा नारद म्हणे गुरु तर जाळूनही टाकला ।
मेला असला तरी आम्ही जागी करू असे घेले म्हणू लागले ।
तव्हा राख नदीत टाकली जाळून ।
तव्हा नारद प्रचिती पाहू लागले ।
गुरवाचे पोर वडाचे पान तोडत व्हते ।
तव्हा नारद म्हणे तो वड सजिवंत कराल काय?
शिष्य हो म्हणाले तव्हा नारदाने मंत्राने वड जाळला ।
चेल्यांनी मंग गंगेवर आले ।
आंघोळी गेल्या ओल्या पडदणीत पद्मीणीनं झार्या पाण्याच्या भरल्या ।
वाट मारगी लागले गेले वडाच्या जवळ ।
भार (मंत्र) बोलू लागले पाच वेढे घातले ।
पाण्याच्या झार्या सोडल्या वडावर ।
आतून कोंमच निंघला वडाचा ।
वड सजीवंत केला । गुरवाचे पोर सजीवंत झाले ।
तिथून निंघले गुरवा हंडा धारेत सोडून देला ।
हंडा धारेत वाहत चालला । खाली वठ्ठी धूनं धूत व्हता ।
विद्या वठ्ठयाले परसन्न झाली ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP