अक्षरांची लेणी - भटजीची अद्भुत फजिती
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
पूर्ण-ब्रह्म अवतरले आनंद झाला सकलाला ।
भर्ग ऋषीने भविष्य कथीले पुढे वृत्तांत जाणवला ।
वृत्तांत पाठवूनी गोकुळाशी धाक पडला कंसाशी ।
बरेच प्रयत्न करुनी वृत्तांत पाठवा वामन भटाशी ।
वामन भट उलटे चालून गोकुळा गेले ।
ज्याले त्याले दाड साड सांगु लागले ।
गवळणी नाडू लागले यशोदा आली बाहेरी ।
हाक मारे भटजीला या या हो भटजी ।
म्हणून पाट टाकीले दारी भटजीबुवा बसले ।
पंचाग वाचू लागले । ऐक यशोदे तुला सांगतो ।
काळा झाला हा मामाला ।
बत्तीस लक्षणी चोर हा करील घराचं तीन वाटा ।
चोरी चपाटी करल । चोरच होईल हा मोठा ।
भटजी याले काय करावे तुम्ही सांगा आता ।
जीतंच मातीत गाडावे नाहीतर तुला सांगतो ।
यमुना काठी बुडवावे । भटजी म्हणे जातो ।
‘पाठ’ उठले बसले पाठीला । असं काय झालं म्हणे बाई ।
हळूहळू तो दारात गेला, धोतर अडकलं ।
दरुज्यानं कपाळ फोडलं । मुसळानं दात पाडले ।
लोटाळनं (लाटन) जावून बसलं घशात ।
देवू लागला हुल्या, चकर्या खुटलं अवघं बोलणं ।
दारी व्हता वरवंटा छाती कुटू लागला ।
कणकी सारखा नरम केला । रुधिर ओकू लागला ।
भितीला होत्या भेगा त्यानं लावला तडाखा ।
खुंटा म्हणे आलो गडयांनो खुप बेटयाला सडका ।
कोनटयात होतं मुसळ ते डोईवर बसलं ।
गरीब विचारी केरसुनी पोटपाठ झाडी ।
मेलो मेलो म्हणून गल्लीनं पळाला ।
गवरीनं केला हल्ला धावा रे धावा म्हणे बापा ।
फिरून येईना मी गोकुळाला । दरुजात होती बाज ।
जाऊन पल्डी गळयात अडकून गरगर फिरे धरुन आपटे भटजीला ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP