मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - फेरावरचे कथागीत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


सोनु-बिजुरा नंद-भावजया, धूया गेल्या नदीवर सैयनाजी ।
तिकडूना अला गं लभानतांडा सैयनाजी ।
बिजुरा भावी चला जी लभानात सैयनाजी ।
कसं जावं लभानात जी, डाग लागलं कुळाले सैयनाजी ।
सोनू काही एकेनाजी, सोनू गेली का लभानात सैयनाजी ।
बिजुरा सुन घरी आली, बोलती झाली सासुले सैयनाजी ।
बिजुरा रडती पडती, केस कुरळे तोडती, सैयनाजी ।
एक वन दोन वन जी, तीन चार वन तव्हा पाचव्या वनाले सैयनाजी ।
आलं बिजुराचं माहेर, बिजुरा रडती पडती सैयनाजी ।
बिजुरा आली बारवंवरी, बजाई गुजाई भावजया सैयनाजी ।
यांच्या मोत्याच्या चुंबळी, तांबाच्या घागरी सैयनाजी ।
बारवंच्या पाण्या आल्या सैयनाजी ।
तू कोणाची कोणबाई. रामराजा मपला पिता ।
सीता-जानकी मही माता सैयनाजी ।
राम-लक्ष्मण महे बंधू, गुजाई, बजाई भावजया सैयनाजी ।
मले येवू द्या तुमच्या संग, रडती हात भावजया जोडसी सैयनाजी ।
अवं तू बटकुरे अवघं धूनं का धुवावं, सैयनाजी ।
पाण्याले लावू, नको दगडावर ठेवू नको ।
धुनं धू वं जसे बगळयाचे पखं सैयनाजी ।
बिजुरा रडती पडती, साती बगळे जमा झाले, सैयनाजी ।
काहून रडता बिजुराबाई, इतकं धूनं कसं धुवू? सैयनाजी ।
अवघ्या धुन्यावर बगळे लोळले, अवे तू फुकाचे बटकुरी ।
फुटका राजण भर सैयनाजी, बिजुरा रडती पडती सैयनाजी ।
काहून रडता बिजुराबाई, साती बेंडकोळ्या जमा झाल्या ।
जावून राजनी बसल्या, बिजुरा घराशी आली सैयनाजी ।
अवं, तू फुकाचे बटकोरी, इतके तांदुळ कांडायचे सैयनाजी ।
ऊखळाले दावू नको, मुसळाले लावू नको सैयनाजी ।
बिजुरा रडती पडती, साती चिमण्या गोळा झाल्या सैयनाजी ।
अवघे तांदूळ फोलते, एक चिमणी गर्भिणजी ।
तिनं एक दाना गिळली सैयनाजी ।
बिजुराले मारती झोडती सैयनाजी ।
बिजुरा रडती पडती, चिमणीनं दाणा उगळला सैयनाजी ।
आली वरसाची पंचमी अवघ्या न्हायल्या धुयल्या सैयनाजी ।
बिजुराले फाटकं नेसूयाले, साता सांदीचे कुटके खायाले, सैयनाजी ।
रडत पडत आली गाईल्या कोठयात, गाय राहिले बोलती झाली सैयनाजी ।
दावी पोटरी कापावी. पिवळा पितांबर नेसावा सैयनाजी ।
बिजुरा पितांबर नेसली, जेवली खावली सैयनाजी ।
दिनमान मालवले सैयनाजी ।
अवघे जेवले खावले, निद्रागती झाले सैयनाजी ।
भाऊ हिले काय बोलता झाला जो ।
फुकाचे बटकोरी येनं म्हंतो गादीवर सैयनाजी ।
बिजुरा रडती पडती हात बंधुले जोडती ।
गाय ह्याले बोलती झाली सैयनाजी ।
कसा जमाना आला बाई, भाऊ बहिणीले वळखेना ।
भाऊ हिले बोलता झाला, अवं तू कोणाची कोण?
रामराजा महा पिता जानकी मही माता,
राम लक्ष्मण महे भाऊ सैयनाजी ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP