अक्षरांची लेणी - चिलीयाचे गाणे
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
कांती नगरी राजा शिराळ ।
राणी चांगुणा येल्हाळ । पोटी चिलीयाचा बाळ ।
धनधान्य परबळ करे । अन्नदान राजा सिराळं ।
एक दिवस आले गोसाई । अल्लख ठोकून वाढ भिक्षा माई ।
जेवण, सुपभर मोती पवळे ठेवले गोसायापुढे ।
रानात राहणार निंब खाणार । अन्न चालत नाही माई ।
तुझ्या पोटचे चिलीयाचे दयावे । मासांचे इच्छाभोजन ।
राजाराणी म्हणे घ्या आमुचेच । मांसभोजन बुआ ।
तुम्हा दोघा भक्षिल्यानं कोण करल दान । जाईल सत्व घेऊन ।
बोलली चांगुणा बुआ । जावे बाळाती घेऊन ।
मी काय मांस कसं खाईन कच्चं । द्यावं तुम्ही शिजवून ।
बाहेर जावून हाका मारे चिलीयाशी । धावत आले । बाळ आनंदाने ।
माता सांगे वर्तमान होईल । पित्याचं तुझ्या सत्व हरनं ।
तुझ्यासाठी भगवान केला देह अर्पन पुढे उदरी येईन ।
तुमचे उपकार फेडीन । बाळ चिलीया बोले आनंदानं ।
मन घट्ट करुन माता कापे मान । शिर शिक्यावर ठेवून ।
येता जाता मी पाहिन । आणले मांस शिजवून ।
शिर शिक्यावर ठेवून । कैसे आणले भोजन ।
रागे आलेले भगवान । जाईल सत्व घेवून ।
अपराध झाला भगवान । जाईल सत्व घेवून ।
माझ्या देखत ओव्या गात । शिर उखळात कांड ।
नेत्री आणशील पाणी । जाईल सत्व घेवूनी ।
मुसळा लागे माथा धन्यबाळ गुणवंता । ओव्या गाते चांगुना ।
तुझी देवाला रे चिंता । गाणे गात कंठ सुकला ।
शिर शिजवून ताटे विस्तारी । चांगुना बोले यावे भोजना भगवंता ।
देव बोलले राजा यावे तुम्ही पंगतीले ।
राजा मनी दचकला । रानी बोले राजाला ।
नऊ महिने वागवला । भार नाही झाला ।
दोन प्रहार तुम्हाले । येऊन बसा पंगतीले ।
देव बोलले राणीले । तुम्ही यावे राणी पंगतीले ।
शब्द देवाचा ऐकला । राणी बसली पंगतीला ।
बोले चांगुना आता बसा देवा जेवायले ।
बोले भगवान निपुत्रिकाच्या । घरचे घेईना मी अन्न ।
दिवा नाही माडीले । अंधार पडला कुडीले ।
तुम्हा नाही पुत्र । अन्नदान पुत्राविना चालेना ।
राणी चांगुना बोलली एक होता पुत्र । तुम्हा केला आरपण ।
आता कुठून आणावा? राणी बोले भगवंता ।
देव बोले राणीला । मार हाका चिलीया बाळाला ।
बाहेर जावून मारे हाका । खरेच बाळ आला धावून ।
माता धरे कवटाळून । सत्व पाहिले देवाने ।
आनंदला राजा आनंदली प्रजा । प्रगटले शिवशंकर ।
बाळ करी आनंदे राज । श्रीयाळ चांगुना गेली कैलासा ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP