अक्षरांची लेणी - अंगाई
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
दंडीडंडवल्या नार हिनवती मले ।
चाल महया वाडया हिर दाखविते तुले ।
महादेवापुढं नंदी घागरमाळाचा माचा ।
धन संपत्तीचा राजा याले नितांत बाळाचा ।
येगं येगं गाई, तान्ह्या बाळा झोपी जाई ।
येगं येगं गाई, गाईचं दुधू गोड
तान्ह्यागं बाळाले झालं थोडं ।
हाडं-हाडं गं गाई, तान्ह्या गं बाळानं ।
काहून मांडुली कांगई ।
हाडं हाडं रे कुतरं कुतर्या मोठं लंड (निलाजरे)
बाळ निजे गं राजबिंडं ।
अंगी अंगरखा डोई टोपरं जरीचं ।
उचलून घ्यावं बाळ नेणत्या हरीचं ।
लाडक्याचे महया बोबडे हे बोलं ।
नेणंत्या हरी पुन्हा बोलं ।
दरुज्यात उगी बाळ मव्ह गोरंपानं ।
मनि महया उगवते नारायण ।
अपीतर बाळ शेज्या म्हणती कुपीतर ।
नेणंता राधी कृष्ण देवाचा अवतार ।
अंगाईतील सामाजिक रुढी
लहान बाळास वेगवेगळे दागिने घालीत असत आणि त्याला दृष्ट लागली म्हणजे यात्वात्मक उपाय करीत. नवस करण्याची प्रथाही इतर रुढींबरोबर दिसते.
हास बिंदल्याचा बाळ मले आवरेना ।
पाण्या गेली बाई गवळण सून ।
लाडकी मैना खेळायला गेली दुर ।
चाँद सुर्याची फडकी अंगावर ।
ताडकी मैना खेळायला गेली राती ।
पैंजणाची माती मामा काढे दिव्यजोती ।
अंगडं टोपडं भिरी भिरी वारा घेतं ।
गोर्या तोंडावर पिंपळपान शोभा देतं ।
गल्लीनं खेळत बाळ मपलं पपया ।
गळयात साखळी रुपया ।
गल्लीनं खेळतं बाळ कोणाचं चांगलं ।
नेणत्या राधीच्या कानी सोन्याचं तोंगलं ।
सांगून धाडते मैनाच्या मावशीले ।
काळया खणाची कुच्ची घेवू नाही मले ।
बाळासाठी नवस करण्याची समाजरुढी
मपल्या नवसाचं हरीले महया तान्हं ।
खेळू केलं बाई काटयावर लोटांगण ।
वारकाच्या पोरा-तुही सोन्याची कातर ।
खाली रुमाल आथर मंग जावळं उतर ।
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP