मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी| उपमा अक्षरांची लेणी डोहाळा गीत पाळणागीत अंगाई समाजजीवन खेळगाणी पिंगा गीते कौटुंबिक जीवन नैतिक शिक्षणाची लोकधारणा सामाजिक अनुभव देवाचे महत्त्व अहेव मरणाची गाणी कुंभाचे महत्त्व कृषिविषयक देव देवता मोटेची आणि नागाची गाणी फेरावरचे कथागीत चिलीयाचे गाणे गौराई शंकराचे गाणे गण व मंत्र बारी भजन सर्पविष पोळा महालक्ष्या गोंधळी जोगवा गीत नवरात्र उपासना इनाई गाणे होळी बहूळा गाय भाऊबीज आणि संक्रांत विविध संकेत फुगडी गाणे पिंगागीत उपमा राम ओवी आख्यान फुगडीचे गाणे निरोप देतांना भटजीची अद्भुत फजिती फेरावरील कथाकाव्य अक्षरांची लेणी - उपमा लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो. Tags : geetlokgeetगीतमराठीलोकगीत उपमा Translation - भाषांतर कृषिविषयक उपमासुखाची चांचणी मह्या बंधूची मेव्हणी ।हिच्या उजेडानं बैल चरती लवणी ॥कपाळीचं कुंकू फिरत रानामंधी ।जतन करा नारायणा बेलाच्या पानामंधी ॥किंवालगनाचा जोडा देवा-धर्मावाणी ।नको देवू गोरी हाव्या हाती पाणी ॥ एरंडं तोडूनी घातला गराडा ।पुरुष नाही धडा नित नारीचा पवाडा ॥ निसर्गविषयक उपमावळवाचा पाणी पडून वसरला ।दादाले झाल्या लेकी आम्ही बहिणी इसरला ॥झाडाझुडांच्या उपमाकोण्या गावी गेला मह्या बर्फीचा तुकडा ।भाग सर्जाचा वाकडा ॥दोघी बहिणी आम्ही चार गावच्या बारवा ।बंधू मंधी नांदतो जोंधळा हिरवा ॥किंवामी नाही एकलो मले शंभर गणगोतं ।वासनीच्या येलावनी बैया गेली मोकलतं ॥बहिण भावंडं एका झाडाची संतर ।आली परयाची नार इनं पाडले अंतर ॥खाद्यपदार्थाच्या उपमाबंधूचं बोलणं जसं मव्हळाच्या वानी ।उडून गेला बाई जसा शाळू दिवस वार्यावानी ॥जातं मी वढते जसं हरण पळते ।बैयाचं दुध मह्या मनगटी खेळते ॥किंवाघरची आस्तुरी जसं कपाशीचं बोंड ।परनारीसाठी करे घोडयावानी तोंड ॥आकासी मांडव धरतरी बव्हलं ।बाळाच्या माम्यानं सूर्य लगन लावलं ॥पाऊस नवरा आभाळाचा केला डफं ।इजबाई करवली कशी आली चमकतं ॥स्वर्गीचा देव आहे जातीता कुंभार ।नित करे घडामोड तव्हा चालतो येव्हारं ॥आत्मा गेला वरी कुडी झाली नवरी । देलासे जानोसा गाव नगराचे बाहेरी ॥हातात कडे तोडे डोक्याला लाल टोपी ।वडिलापुढे बाळ शोभे जणू गणपती ॥बहिण भावाची मया अंतरकाळजाची ।पिकलं सीताफळ याले गोडी साखरेची ॥संपत्तीची नार उतावळी बावळी ।हुळवला तीळ कोळं पडलं बाहेरी ॥समुद्र म्हणे नर्मदा महे बहिणी ।उथळ तुहं पाणी थीर चाल मह्यावाणी ॥नवरदेवापरता करवली आगजाळ ।जवाईराजस जसा पानसमिंदर ॥पेटला डोंगर जन गेल इझवाया ।पेटली मही देही कोण येईल इझवाया ॥जावईराजस सोन्याचा जायफळं ।नणंती मैना लवंग आगजाळं ॥सासरा भोळा राजा सासू शुक्राची चांदणी ।कपाळीचं कुंकू सूर्या डोलती अंगणी ॥देवाचं देऊळ फुलांनी शोभीवंत ।नार पुत्राची भाग्यवंता ॥घरं ग देता शोभा तान्ह्यागं बालकानं ॥नार पुत्रानी भाग्यवान ॥काय सांगु बाई माह्या माहेरची बढाई ।येशीच्या डांभ्याले वाघ खेळती लढाई ॥किंवाकाय सांगु बाई बाळाची नवलपरी ।वासरासंग वाघ नेले पाण्यावरी ॥किंवावाटच्या वाटसरा काय पाह्यतो खेडयाले ।सोन्याचे कुलूप मह्या बंधुच्या वाडयाले ॥पडतो पाऊस नका करु गाजावाजा ।बोलली धरतरी आला पतीराजा माझा ॥नाचीन नाचती खाली पाहून हासती ।बंधुच्या मह्या डोईचा रुमाल मागती ॥आपुन खातो पान रानीले देतो मेवा ।बैयाचा बाळराज शेजंले गेला नवा ॥आपून खातो पान राणीले देतो वाटी (खोबरे) ।एवढा कावा रानीच्या शेजंसाठी ॥बोलले भ्रतार आडमिती ।राणी महिने झाले किती ॥गर्भिन नारीले खावू वाटली पपई ।हौशा भ्रतारानं बागत धाडला शिपाई ॥गावाले गेला बाई मह्या कुंकाचा टिकला । पाचा पानाचा ईडा मह्या पदरी सुकला ॥गावा गेला बाई मले ईसावा देवून ।किती पाहू वाट वाडयाबाहेर जावून ॥गेला कोन्या गावी कोणा वाढू ताट ।सुना लागे चंदनाचा पाट ॥किंवाभ्रतार नाही बाई आहे पूर्वीचा गोतं ।उशाखाली हात नाही माहेर आठवतं ॥गावा गेला बाई मह्या आंब्याचा डगळा ।रिकामा पलंग जीव लागला सगळा ॥गेला कोण्या गावी मह्या जीवाचा पोपट ।सपनात आलं बाई याच घडयाळं जाकीटं ॥भ्रताराचं सुखं नार सांगती झोकात ।चक्रशेल्याची सावली केली शेतात ॥किंवाभ्रताराची खूण कशी डोळयाच्या आडून ।देणं राणी सुपारी फोडून ॥भ्रताराची खूण वाजे धंगाळाची कडी ।देणं राणी धोतराची घडी ॥माय बापाची लाडकी भ्रताराची थोडीबहू ।बोलले भ्रतार राणी माहेरा नको जावू ॥किंवातुहे पैंजन महे पैंजन झुम झुम करे ।दादा वहिनीले बांगडया भरे फु बाई फू ॥इहिणीच्या गालाला म्हस ।इव्हाई इहिणीले म्हणतो मांडीवर बस ॥मांडवाच्या दारी पेरला चुका ।इव्हाई भोळा घेती इहिणीचा मुका ॥अशा प्रकारची गंमत करीत असतात.अस्तोरी पुरुष दोहीचा अबोला ।फुलाची केली शेज राजा एकला निजला ॥गेली कोण्या गावी मह्या कपाळाची चिरी ।दरुज्यात उभी आली हासत सवारी ॥भ्रतार नाही घरी कोणाला टाकू बाजं ।केसाचा सोडीनं साजं ॥बोलले भ्रतार कुठं गेली घरवाली ।हाती पानचोळी दारी हासत आली ॥कपाळीचं कुंकू किती लावू ढबदार ।जावो जन्मभरी पित्या तुमचा कारभार ॥पहिल्या मासी आंब्याशी कैर्या येती ।याच वेळेशी पती परदेशी जाती ॥साजणेबाई माझं परदेशी गुज ।सावळे श्रीरंग टाकुन गेले परदेशी मज गा ॥धृ॥दुसर्या मासी आखाडी येती । पावसाची वात पाह्यती ।याच वेळेसी पती परदेशी जाती ॥साजणे बाई माझं परदेशी गुज ।सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥चवथ्या मासी कसा उन्हाचा भर ।मंदिरी पलंग त्यावर फुलाचा भार ।त्यावेळी पती परदेशी जाती ॥साजणे बाई माझं परदेशी गुज ।सावळे श्रीरंग टाकुन गेले मज वं ॥धृ॥पाचव्या मासी कशी हिवाची लहरी ।सावळे श्रीरंग आज येतील घरी ॥साजणे बाई माझं परदेशी गुज ।सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥धृ॥सहाव्या मासी हत्तीवरचा पाऊस ।न्हावून धुवून अंगी लेली कंचोळी ॥मोत्याने भरलं ताट साजने बाई ओवाळू कोणा?याचवेळी पती परदेशी जाती ॥साजणे बाई माझी परदेशी गुज ।सावळे श्रीरंग टाकुन गेले मज गं ॥धृ॥जात्या इसवरा तू जंगलाचा ऋषी ।माहेरी भाऊ भासे मुक्यानं दळू कशी ॥जात्याच्या तोंडावर पाय नको देवू तू गरती ।जात्याच्या तोंडावर महादेवाच्या पारबती ॥पहिल्या वहिचा नेम नाही केला ।मुखी राम आला ॥पहिल्या वहिचा नाही केला नेम ।पोथी वाचतो तुळशीखाली राम ॥मह्या अंगणात तुळसाबाईचा वटा ।विघ्नं जातील बारा वाटा ॥किंवातुळशी घालू वटा लावू रोप ।विघ्न जातील आपोआप ॥तुळशी घालू पाणी । झाली पातकाची धुनी ॥तुळशी लावू कुंकू । तिथं उभी व्हती सखू ॥तुळशी लावू गंध । तिथं उभा होता गोविंद ॥तुळशी लावू बुक्का । तिथं उभा व्हता तुका ॥तुळशी लावू दिवा । उजेड पडला सर्व देवा ॥किंवापाह्यटं उठूनी तोंड पहा गाईचं ।दारी दर्शन तुळसबाई ॥पाह्यटंच्या पारी कशाचं भेव ।तुळशीच्या पायावरी इना वाजवती देवा ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP