अक्षरांची लेणी - बहूळा गाय
लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.
माझी बहुळा सैवारी । सरती ढवळा सखा गिर्हीन राखे गोईदा ।
माझ्या बहुळाचे शिंगं । तसे महादेवाचे लिंग
माझ्या बहुळाचे डोळे । तसे लोणीयाचे गोळे
माझी बहुळा सैवारी.
शिवंवर होती गणाची झोपडी । त्याच्या हाती रंगीत काठी ।
त्यानं मारलं गाईच्या पाठी । गाईनं देले चेंडे गोंडे ।
त्याचे गुफू चवरे गोंडे । चवर्या गोंडयाची लावली ।
तिफन कुणब्याची मावली । तिफन तिफनी तीन नळया ।
मोंगडया मोंगडया दोन नळया । गाई म्हशीनं भरला वाडा
झेंडूल्या हो. झेंडूल्या हो.
किंवा
गिरण्याच्या नदीवर बाभूळ पाह्यली नादर (चांगली) ।
तिच्यात टाकून सरकांडं । आणली कामठयावरं ।
कामठा पुंजूनीया सुतार । धन्यच कारागीरं ।
तिफन कोरली नादर । दांदीत आली बरोबर ।
रुमणं भिडवलं पाटी । तिफन कुणब्याच्या नेटी ।
गाई म्हशीनं भरला वाडा, झेंडूल्या हो.
किंवा
गाईमंधी गाय एक गाय मोठी ग्यानुबा
मोरीच्या पाठी, गोर्हा ग्यानुबा ।
गोर्ह्याला मोडला काटा ग्यानुबा । काटया कुटयाचे वेळू ।
गाईमांग लागले खेळू । खेळता, खेळता मोडला काटा ।
ग्यानबा मोडला काटा.
खेळ फुटतो, नांध बैल डरतो । नांधा बैलाची येसन ।
निळया घोडीवर बसनं । निळया घोडीचा खरारा ग्यानबा
वाघ्या मारतो फरा । वाघ्या पिल्याची जाळी ।
त्यात अटकला माळी ।
माळीनं शिवली चोळी । माळी शिवतो कोट ग्यानबा कोट
गाई म्हशीनं भरला वाडा, झेंडूल्या हो.
किंवा
दिनदिन दिवाळी, गाई-म्हशी ववाळी ।
गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या ।
लक्ष्मण कोणाचा? माय-बापाचा ।
गाय जनली गोर्हा दिला । घरच्या धन्याले हरिक झाला
हरकं हरकं दळते गहू । पाच बामण घालते जेवू । झेंडूल्या हो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP