मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|अक्षरांची लेणी|

अक्षरांची लेणी - पिंगागीत

लोकगीते म्हणजे लोकांच्या मानसिकतेची निर्मिती. ती कधीच जुनी होत नाही, उलट त्यातील गोडवा वाढतच जातो.


दोन पिंपळ शेजारी शेजारी । एक पिंपळ तलवारी तलवारी ॥
तलवार्‍याले सांगुन द्या । आमचा खेळ मांडून द्या मांडून द्या ॥
आमच्या खेळाले साखळया साखळया । साखळया देवू वान्याले वान्याले ॥
वान्या वान्या कुंकु दे कुंकु दे । कुंकू देवू गायीले गायीले ॥
गाय गाय दुध दे दुध दे । दुध देवू चांदाले चांदाले ॥
चांदा चांदा घोडे दे घोडे दे । घोडे देवू बापाले बापाले ॥
बापा बापा लुगडे दे लुगडे दे । लुगडे देवू मायले मायले ॥
माय माय चोळया दे चोळया दे । चोळया देवू बहिणीले बहिणीले ॥
बहिणी बहिणी पिवश्या दे पिवश्या दे । पिवश्या देवू नणंदेले नंदंले ॥
नणंदबाई एकली । पान खाया शिकली शिकली ॥
तांबूळ दादाला ईकली ईकली । तांबूळदादा नकटा नकटा ॥
शेंडीला धरुण उपटा उपटा । शेंडीले आळया शेंगा शेंगा ।
घाल गं पोरी पिंगा पिंगा । एकीचा की दोघीचा, दोघीचा ।
मामाजीच्या लेकीचा लेकीचा । मामची लेक गौरी गौरी ॥
हळद लावा थोडी । हळदीचा उंडा बाई उंडा ॥
रेशमाचा गोंडा बाई गोंडा । रेशमाच्या गोंडयावर पाय कसा देवू ॥
मामाच्या लेकची नाव कसे घेवू बाई नाव कसं घेवू ।
नमो घालू देवा जन्मा बहिणीवाचून भावाले ।
निंबोनीवाचून शोभा नाही बगिच्याले ॥

किंवा
बोळवण केली बाप बैया येशीलोक ।
भाऊ आले मेरं लोक । भासे आले शिवलोक ।
आंगडं टोपडं पाळण्याच्या कळसाले ।
बैयाच्या बाळाले काय तान्हं राजसाले ।

किंवा
माय इतकी मया बहिणी इतका कनवळा ।
हात नाही घालू बाई बिरान्याच्या गळा ।

किंवा
माय लेकीचं भांडन जसी दुधाची उकळा ।
बैया मनाची मोकळी ॥
लाडक्या लेकीले सासू पहा करणीची ।
जाणल तहान भूक हरणीची ॥

किंवा
इनी सवंदरी नको म्हणून मोठी झाली ।
शेंग चवळीची येला गेली ॥
गौरी मही मैना काळया सावळयाले देली ।
माणका-शेजी रत्नटिक जडवली ॥

किंवा
अशीलाले कमशिल पाह्मतं कसूनं ।
चंदन बेलाचं लाकुड झिलपी निंघती तासुनं ॥
जिठं जाशील जीवा तिथं तुहं गोतं ।
वासनीच्या येलावानी बैया गेली मोकलतं ॥
मपलं मामकुळ कोण पुसतं इथं तिथं ।
चांदडी रुपया याले डाग नाही कुठं ।
घरची अस्तुरी जसं मुंदीचं ठिकडं ।
पर नारीसाठी करे मुंडासं वाकडं ॥
सुनले सासुरवास नको करु मायबाई ।
आपला होता चाफा आली परायाची जाई ॥
लेकाले म्हणते दादा सुनले म्हणते बाई ।
आपल्या वाडयात विठ्ठल रुख्माई ॥
सासरा महादेव सासु मही पारबती । कपाळाची कुंकू घोळात वागवती ॥
बाप मव्हा राजा काशीखंडाचा वड ।
माय गं गिरजा मही पाणी त्रिगुणीचं गोड ॥

किंवा
पुसतील शेज्या तुले भाऊ किती जण?
चांद-सूर्या दोघं बापाजी नारायण ॥
मोत्या पवळयाच्या पाऊस कुठं पडतो कुठं नाही ।
एवढया दुनियेत भाऊ बहिणीले अप्रूप बाई ॥

किंवा
भावापरत भावजय रतन । सोन्या कारण चिंधी करावी जतन ॥
सीता भावजय मले हासून बोलली । कुंकू कपाळाचं जसी डांळिबी खुलली ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP