Dictionaries | References

चौसष्ट

   
Script: Devanagari
See also:  चौसट

चौसष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
causaṣṭa or causaṭa a Sixty-four.

चौसष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Sixty-four.

चौसष्ट     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  साठ अधिक चार   Ex. हे पुस्तक चौसष्ट पानी आहे.
MODIFIES NOUN:
काम अवस्था तत्त्व
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
६४ 64
Wordnet:
asmচৌষষ্ঠি
bdदजिब्रै
benচৌষট্টি
gujચોસઠ
hinचौसठ
kanಅರವತ್ತುನಾಲ್ಕು
kasژُہٲٹھ
kokचवसठ
mniꯍꯨꯝꯐꯨꯃꯔꯤ
nepचौसट्ठी
oriଚଉଷଠି
panਚੌਂਹਟ
sanचतुःषष्टि
tamஅறுபத்திநான்கு
telఅరభై నాలగు
urdچونسٹھ , 64
noun  साठ अधिक चार मिळून होणारी संख्या   Ex. चौसष्टाला आठानी भाग दिल्यावर आठ उतरतात.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
६४ 64
Wordnet:
malഅറുപത്തി നാല്
nepचौंसट्ठी
panਚੌਂਹਟ
sanचतुःषष्टिः
tamஅறுபத்திநான்கு
telఅరవైనాలుగు
urdچوسٹھ , ۶۴ , 64

चौसष्ट     

वि.  ६४ संख्या ; साठ आणि चार . [ सं . चतु : षष्टि ; प्रा . चउसट्ठी ; तुल० हिं . चौसठ , गु . चोसट - ठ ] सामाशब्द -
०कला   कळा - स्त्रीअव लिहिणें , वाचणें , गाणें , नाचणें , चित्रें काढणें इ० चौसष्ट कौशल्याची कामें चौदा विद्या चौसष्ट कला . या चौसष्ट कला कोणत्या याबद्दल निश्चित मत नाहीं . सर्व कलांची यादी केल्यास त्या चौसष्टांपेक्षां जास्त भरतील . निरनिराळया ग्रंथांतून चौसष्ट कलांची भिन्न भिन्न यादी आहे . श्रीमद्भागवत , शुक्रनीति , वात्सायन कामसूत्र , वार्ताविद्या , दण्डनीति इ० कांत चौसष्ट कलांच्या भिन्न भिन्न याद्या आहेत . त्यापैकीं वात्स्यायन कामसूत्रांतील यादी पुढें दिली आहे - १ गायन . २ वादन . ३ नृत्य . ४ नाटय . ५ आलेख्य = लिहिणें वगरे . ६ विशेषकच्छेद्य = निशाण मारणें . ७ तण्डुलकुसुमबलिप्रकार = तांदूळ व फुलें यांच्या तर्‍हेतर्‍हेच्या आकृती करणें . ८ पुष्पास्तरण = फुलांचे गालीचे काढणें . ९ दशनवसनांगराग = निरनिराळया रंगांनीं दांत सुशोभित करणें , वस्त्रावर वेलबुटी काढणें , व अंगास उटी लावणें , अंग गोंदणें इ० १० मणिभूमिकर्म = त्रिकोण , चौकोन इ० आकृतींनीं जमिनीवर रत्नांची , मण्यांची रचना करणें . ११ शयनरचना = नाना तर्‍हेच्या बिछायती वगैरे घालणें व बिछायती वस्तू नीटनेटक्या ठेवणें इ० १२ उदकवाद्य = जलतरंग यासारखीं वाद्यें तयार करणें व वाजविणें १३ चित्रयोग = मातीचीं चित्रें तयार करणें १४ माल्यग्रथनविकल्प = फुलांचे हार , तुरे , गजरे इ० तयार करणें १५ शेखरापीडयोजन = तुरे इ० नीं मुकुट , टोप , सुशोभित करणें १६ नेपथ्यप्रयोग = नाटकांतील पात्रें ( पडद्या आड ) रंगविणें , त्यांना नटविणें इ० १७ सुगंध युक्ति = सुवासिक पदार्थ तयार करणें . १८ कर्णपत्रभंग = कानांवर कोंवळया पाकळया ठेवून ते सुशोभित करणें १९ भूषणयोजन = सोन्याचे अलंकार करणें , घालणें , नीटनेटके ठेवणें इ० . २० ऐंद्रजाल = जादुगिरी २१ कौचुमार योग = अंग रंगवून निरनिराळीं रूपें धारण करणें , बहुरूप्याची कला . २२ हस्तलाघव = हातचलाखी २३ चित्रशाकापूपभक्ष्यविकारक्रिया = नाना तर्‍हेच्या भाज्या व पक्वान्नें तयार करणें २४ पनासव - रसरागासव योजना = नाना तर्‍हेचीं पेयें करणें , तर्‍हेतर्‍हेच्या रसांचीं पुटें देणें , पदार्थांवर निरनिराळे रंग देणें व मद्य तयार करणें २५ सूचीवाय कर्म = शिवणकला . २६ सूत्रक्रीडा = बाहुल्या नाचविणें , भोंवरे फिरविणें इ० २७ वीणाडमरुक वाद्यवादन = वीणा , डमरु इ० वाद्यें वाजविणें . २८ प्रहेलिका = उखाणे जिंकणें २९ प्रतिमाला = भेंडया लावणें . ३० दुर्वाचकयोग = कठोर वर्णमिश्रित श्लोकपठण ३१ वाचन . ३१ नाटकाख्यायिकादर्शन = नाटकें , प्रहसनें इ० करून दाखविणें . ३३ काव्यसमस्यापूरण = दुसर्‍यानें दिलेला अपूर्ण श्लोक पुरा करून देणें . ३४ पट्टिकावेत्रबाणविकल्प = छडी , पट्टा , बाण , तलवार इ० कांच्या उपयोगांत नपुण्य . ३५ तक्षमर्मे = कातरकाम , जाळया इ० करणें . ३६ तक्षण = सुतारकाम . ३७ वास्तुविद्या = घरें बांधणें . ३८ रौप्यरत्नपरीक्षा = रत्नें व नाणीं यांची परीक्षा करणें . ३९ धातुवाद = अशोधित धातु शुध्द करणें इ० . ४० मणिरागज्ञान = रत्नांनां रंग देणें इ० . ४१ आकरज्ञान = खाणी कशा व कोठें सांपडतील इ० सांगणें . ४२ वृक्षायुर्वेद = वृक्षांची जोपासना , वाढ व त्यांचें आयुष्य वाढविणें इ० विषयीं ज्ञान . ४३ मेषकुक्कुटालावक युध्दविधि = एडके , कोंबडे , लावी पक्षी यांच्या झोंब्या लावणें . ४४ शुकसारिकाप्रलापन = पोपट , मैना इ० कांना बोलावयास शिकविणें . ४५ उत्सादन = पतंग उडविणें . ४६ केशमार्जनकौशल = केसांना नानाविध तेलें लावणें व त्यांची नानाविधप्रकारें रचना करणें . ४७ अक्षरमुष्टिकाकथन = मनांतील अक्षरें , विचार इ० व मुठींत काय आहे तें सांगणें . ४८ म्लेछित कुतर्कविकल्प = करपल्लवी , नेत्रपल्लवी इ० भाषांची योजना करणें . ४९ देशभाषाज्ञान = देशभाषा जाणणें . ५० पुष्पवाटिकानिर्मितिज्ञान = बागबगीचे करणें इ० चें ज्ञान . ५१ यंत्रमातृकाधारण = गूढ यंत्रें तयार करणें . ५२ मातृकासंवाच्य = मंत्र टाकणें , भारणें . ५३ मानसी काव्यक्रिया = न बोलतां मनांतल्या मनांत काव्यें रचणें . ५४ अभिधानकोश = अनेक कोशांचें ज्ञान . ५५ छंदोज्ञान = छंद ; शास्त्राची माहिती . ५६ क्रियाविकल्प = चमत्कार करून दाखवणें . ५७ वस्त्रगोपन = वस्त्रें नेहमीं नवीं राहतील अशा युक्तीनें ठेवणें , कापसाचें वस्त्र रेशमी दिसेल असें करणें . ५८ छलितकयोग = खुषमस्करीपणा . ५९ द्यूतविशेष = जुगार , फांसे खेळणें ; इ० ६० आकर्षक्रीडा = दुसर्‍याची मत्ता ( मंत्रानें ) स्वहस्तगत करणें . ६१ वैनायिकीविद्याज्ञान = विघ्नें नाहींशीं करण्याची जादू , युक्ति इ० चें ज्ञान . ६३ वैतालिकी विद्याज्ञान = भूत , वेताळ , पिशाच्च इत्यादिकांविषयीं ज्ञान . ६४ वजयिक विद्याज्ञान = एका प्रकारच्या मंत्रविद्येचें ज्ञान . इ० - ज्ञाको इ १५३ . अधिक माहितीकरितां - ज्ञाको भाग १० , कला व - मसाप १ . २ . ७ पहा . [ चौसष्ट + कला ] चौसष्टी - स्त्री . १ एकाच जातीच्या चौसष्ट वस्तूंचा समुदाय . २ ( एका पक्षाच्या ) एकाच रंगाच्या चार सोंगटया मारल्या गेल्यानें अंगावर येणारी बाजू ( सोंगटयांतील ) चौबारी . ३ चौसष्ट कला . शिणल्या बहुत चौसष्टी । ... स्वरूप तुझें वर्णितां । - ह ३ . ४ . [ चौसष्ट ]
०पिंपळी  स्त्री. चौसष्ट प्रहर खलून औषधाकरितां तयार केलेली पिंपळी . [ चौसष्ट + पिंपळी ]
०मूर्छना   स्त्रीअव . मूर्च्छनेचे ( स्वरभेदाचे ) ६४ प्रकार . तेणें साही राग छत्तीस भार्या । चौसष्टी मूर्च्छना दावूनियां । अनेक उपरागांच्या क्रिया । गाइल्या तेव्हां रिसानें । - ह २५ . ११९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP