Dictionaries | References

बांधणें

   
Script: Devanagari

बांधणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
bāndhaṇēṃ n R A dammed up part of a water-channel, to divert the course: also, by meton., the grass and rubbish employed in constructing the dam.
. बांधल्या कमरेचा Of girt loins, ready, alert, attent.

बांधणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Hurt; oppose; to assail and strike with some disease or evil-used of a पिशाच्च or devil. Work injuriously.
v t   Tie. Bind. Confine. Set up (rules). Build; make up.

बांधणें     

स.क्रि.  
 न. ( राजा . ) पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याकरतां घातलेला बांध ; असा बांध घालण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें गवत व गाळसाळ इ० [ सं . बंध ]
आंवळणें ; एकत्र करणें ; तांगडणें ; अडकवणें .
गांठ देऊन आवळणें ; गांठ मारणें .
नाल मारणें ; पायबंद घालणें ( घोड्याला ).
( पागोट्यास ) घड्या घालून नीट आकार देणें ; गुंडाळणें .
( बांध इ० घालून पाणी ) अडविणें .
( नियम , कायदे , रीति , वेळ इ० ) योजणें ; स्थापन करणें ; प्रचारांत आणणें .
बांधून घेणें ; रोधणें ; जखडून टाकणें ; आखणें ( कायद्यानें , नियमानें ). त्याचा सारा वेळ बांधलेला असे . - नि ९९८ .
( घर , भिंत , जहाज इ० ) रचणें ; उभारणें ; बनविणें .
( धरण , रस्ता इ० ) बांधून पक्का करणें .
( काव्य , व्याख्या , ग्रंथ ) रचणें ; रचना करणें ; जुळणी करणें .
( तर्क , कल्पना , बुद्धि , युक्ति ) योजणें ; रचणें ; बनविणें ; एकत्र करणें .
बनविणें ; वस्तूंना आकार देणें ( जोडे , मिठाई इ० ).
( वैर , मत्सर , द्वेष ) धरणें ; बाळगणें ; मनांत ठेवणें .
मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें ; मंत्रानें थांबविणें ; बंद करणें . [ सं . बंध ; पोर्तु . बदेलार ] म्ह० बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं . बांधली गांठ - स्त्री . बंद केलेली पैशाची पिशवी ; राखून ठेवलेले , साठविलेले पैसे ; सांठा ; संचय . [ बांधणें + गांठ ] बांधल्या कमरेचा - वि . कमरबंद ; तयार ; सावध .

बांधणें     

बांधली गांठ- साठविलेले पैसे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP