|
स.क्रि. न. ( राजा . ) पाण्याच्या प्रवाहाची दिशा बदलण्याकरतां घातलेला बांध ; असा बांध घालण्यासाठीं उपयोगांत आणिलेलें गवत व गाळसाळ इ० [ सं . बंध ] आंवळणें ; एकत्र करणें ; तांगडणें ; अडकवणें . गांठ देऊन आवळणें ; गांठ मारणें . नाल मारणें ; पायबंद घालणें ( घोड्याला ). ( पागोट्यास ) घड्या घालून नीट आकार देणें ; गुंडाळणें . ( बांध इ० घालून पाणी ) अडविणें . ( नियम , कायदे , रीति , वेळ इ० ) योजणें ; स्थापन करणें ; प्रचारांत आणणें . बांधून घेणें ; रोधणें ; जखडून टाकणें ; आखणें ( कायद्यानें , नियमानें ). त्याचा सारा वेळ बांधलेला असे . - नि ९९८ . ( घर , भिंत , जहाज इ० ) रचणें ; उभारणें ; बनविणें . ( धरण , रस्ता इ० ) बांधून पक्का करणें . ( काव्य , व्याख्या , ग्रंथ ) रचणें ; रचना करणें ; जुळणी करणें . ( तर्क , कल्पना , बुद्धि , युक्ति ) योजणें ; रचणें ; बनविणें ; एकत्र करणें . बनविणें ; वस्तूंना आकार देणें ( जोडे , मिठाई इ० ). ( वैर , मत्सर , द्वेष ) धरणें ; बाळगणें ; मनांत ठेवणें . मंत्रानें ताप न येईल किंवा न दिसेल असें करणें ; मंत्रानें थांबविणें ; बंद करणें . [ सं . बंध ; पोर्तु . बदेलार ] म्ह० बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं . बांधली गांठ - स्त्री . बंद केलेली पैशाची पिशवी ; राखून ठेवलेले , साठविलेले पैसे ; सांठा ; संचय . [ बांधणें + गांठ ] बांधल्या कमरेचा - वि . कमरबंद ; तयार ; सावध .
|