Dictionaries | References

कळा

   
Script: Devanagari
See also:  कला

कळा

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  चंद्रीम वा ताच्या चान्न्याचो सोळावो अंश वा भाग   Ex. पुनवेचो चंद्रीम आपल्या सोळाय कळांनी भरिल्लो आसता
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

कळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : a large कळी in some other senses. see कळी, of which word this is the intensive or enhancing form. 2 From कला and used in all its senses.

कळा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A large bud.
  f  An art, &c. see कला.

कळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या ओटीपोटात होणार्‍या वेदना   Ex. कळा सुरू झाल्यावर तिला दवाखान्यात भरती केले.
ONTOLOGY:
बोध (Perception)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
   see : चंद्रकला, टवटवी

कळा

  पु. १ फुलाची मोटी कळी ; कोरक ; कळीचें मोठें स्वरुप , ' तो कनक चंपकाचा कळा । ' - ज्ञा ६ . २५७ . २ केळ . - एभा २ . ५७७ . ३ चौफुला वगैरेस शोभेसाठीं कळीच्या आकाराचें हातांत धरण्यासाठीं जें बोंड बसवितात . तें . ४ बुगडीचा वरचा कळीसारखा भाग . ( सं . कलिका )
  स्त्री. कला या शब्दाच्यासर्व अर्थी योजतात . ' कीं हें नाना कळांचें जीवन । ' - दा १ . ७ . २ . ' असो सकळ कळा प्रवीण । विद्यामात्र परिपूर्ण । ' - दा . २ किरण ; प्रकाश . ' जैसें शारदीयेचे चंद्रकळे । माजीं अमृत कण कोंवळें । - ज्ञा . १ . ५६ . ३ तेज . ' तैसें पिंडाचेनि आकारें । तें कळाचिकां अवतरे । ' - ज्ञा ६ . २५० . ' जनविजन समान कळा । तेचि आपाद वनमाळा । ' - एरुस्व १ . ४१ . ४ चंद्राचा १६ वा अंश ; त्यावरुन वोसावला । ' - ज्ञा १५ . ३०३ . ' चंद्रासि लागति कळा उपराग येतो । ' - र २ . ५ मनस्थिति . ' काय भाव एक निवडूं निराळी । जाणसी तूं कळा अंतरींची । ' - तुगा १६१३ . ६ देखावा ; दशा . ' दावूनि वैराग्याची कळा । भोगी विषयांचा सोहळा । ' - तुगा २८३५ . ७ युक्ति . ' कळा तुजपाशीं आमुचें जिवनउचित करुन देई आम्हां । ' - तुगा ९ . ८ चातुर्य ; करणी ' पाव्यामाजी रागज्ञान । केल्या अति मधुर गायनतो पाव्याचा नव्हे गुण । कळा जाण गात्याची । ' - एभा १० . २६७ . ज्याची कळा तोच जाण । ' - ऐपो १४४ . ९ ज्ञान . ' कस्तूरीचा वास घेईन काऊळा । तरिच ती कळा कळे तया । ' - ब ९८ . १० हालचाल ; चलनवलन . ' शरीरांतूनिया प्राण गळाल्या लोपति सर्व कळा । ' - रत्‍न ४ . ३ . ११ प्रकार ' जेवीं माउली देखोनि डोळाबालक नाचे नाना कळा । ' - एभा ३ . ५९९ . ( सं . कला )
  स्त्री. लिहिणें , वाचणें , गाणें , घोड्यावर बसणें , चित्रें काढणें इ० कौशल्याची कामें ; कला चौसष्ट आहेत . चौसष्ट कला पहा . २ चतुराईची यांत्रिक वगैरे योजना ; तिच्या रचनेचें ज्ञान . चालविण्याची युक्ति ; त्यांपासुन विवक्षित फल उप्तन्न करण्याचें चातुर्य ; त्याची गुप्त खुबी , किल्ली , मख्खी ; यटक . ३ चतुराई ; बुद्धिकौशल्य ; शोधक बुद्धि ; कसब ; युक्ति ; लीला . ' तुका म्हणे त्याची कोण जाणें कळा । वागवी पांगुळा पायवीण । ' - तुगा ३६७७ . ' तयांत फिरती तरी करिती अप्सरांच्या कला ' - नरहरी , गंगारत्‍नमाला १४३ . ( नवनीत पृ . ४३२ .) ४ चंद्राच्याबिंबाच्या सोळावा भाग ; प्रत्येक दिवशीं वाढणारी किंवा कमी होणारी चंद्राची कोर . ' चंद्राची लगती कळा । उपराग येतो । ' - र २ . ५ वेळाचें एक परिमाण सुमारें ८ सेकंदाबरोबर ; ३० काष्ठा म्हणजे एक कला . ६ एक अंशाचा ( वर्तुळाच्या ३६० व्या भागाचा ) एकसांठांशाचा भाग . ७ पदार्थमात्राचा ( सोळावा किंवा लहानसा ) अंश ; लेश ; लव ; तीळ ; रज ; कन . ८ कांति ; टवटवीतपणा ; स्वच्छपणा ; नितळपणा ; सौंदर्य ; तेज चमक ( माणसांच्या चेहेर्‍यावरील ). ' राजसुकुमार मदनाचा पुतळा । रविशशि कळा लोपलिया । ' - तुगा २ . ' घराची कळा अंगण सांगते .' ९ सूर्य ; पृथ्वी व परप्रकाश खस्त पदार्थ यांमध्यें कोण झाल्यामुळें पृथ्वीवरुन त्या पदार्थाची जी कांही प्रकाशितअप्रकाशित आकृति दिसते ती . - सृष्टिशास्त्र १३८ . ग्रहांच्या प्रकाशित भागाचा जो अंश आपणाम्स वाढतांना किंव कमी होतांना दिसतो तो . - ब्रूस , ज्योतिःशास्त्राची मुलतत्त्वें . १० ( प्रणिशास्त्र ) शरीरांतील नाजुक त्वचेसारखा पडदा . ( इं .) इंटरनल मेंब्रेन . ११ ( अश्व ) कुच आणि कुष्किका घोड्याचें अवयव . - अश्वप ६४ . १२ ( ताल ) मात्रा ; नियमा नुसर तालाचे झालेले भाग ; हें आठ आहेत ध्रुवका ; सर्पिणी , कृष्णा , पद्मिणी ; विसर्जित ; विक्षिप्ता ; पताकापतिता . १३ ( ताल ) खाली ; टाळीवाजविणें . १४ शास्त्राचा व्यावहारिक उपयोग ; कोणत्याहि उद्दिष्ट विषयास उद्दिष्ट प्रसंगीं शास्त्रीय सिद्धांत लागू करणें ( शास्त्र यांच्या विरुद्ध .) - सुकौ १२ . ( सं .)
   जीवंतमध्ये पहा .
०जाणें वि.  ( व .) अवनति होणें ; दुर्मखलेलें दिसणें . त्याच्या अठरा कारखान्याच्या गेल्या कळा । ' - ऐपो १४२ .
०तीत वि.  अत्यंत सूक्ष्म ; अंशाच्या विभागाच्या पलीकडला ; मायेच्या पलीकडला .' कलितकाळ कौतुहल । कलातीत । ' - ज्ञा १८ . ३ ( सं .)
०फूल  न. एक औषधासाठीं वाळविलेली फुलाची कळीं . २ कोणतेंहि कलीच्या आकाराचें फुल .
०निधि  पु. चंद्र , ' आल्हादकारक कलानिधि परंतु न्यून क्शयासहित । ' - सीता स्वयंवर . ( नाको .) ( सं .)
०ईत वि.  कुशल ; कलावान ( मनुष्य ).
०मोगरा  पु. ( सोनारी ) मोगर्‍याच्या फुलांच्या कळीसारखा आकार दिलेला कोणत्याहि दागिन्याचा भाग . कळी पहा .
०कळी  स्त्री. मर्म ; कौशल्य . ' तेआं जुंझाची कळाकळी । ते देशंचि वेगळी । ' - शिहु ८७९ .
०कांती  स्त्री. ( शरीराची , चेहर्‍य़ाची , देहाची ) चमक ; सतेजता ; तेज ; टवटवी . ' परम मळीण दिसती । कळाकांती नसे कांहीं । ' -
०कुशलताकौशल्य   स्त्रीन . कसब व चातुर्त्य ; नैपुण्य व कारामत ; शहाणपणा व बुद्धि .
०कुसरी  स्त्री. १ ( कुसरी हा शब्द लुप्त झाला असुन बहुधा कला शब्दाबरोबर अधिक जोर येण्याकरितां योजितात ) चातुर्यांची कल्पना ; युक्ति ; करामत ; कुशलतेची रचना ; शहाणपणाची योजना ; २ कौशल्य ; कसब ; कारागिरी ( गाणें , चित्रकला इ०तील ). ' परिच्या संगावांचूनि सर्व स्त्रीच्या वृथा कळाकुसरी । ' - मी . ३ बारीक नक्षीकाम ( जीगचेंकाम , भारतकाम इ० ) ( अनेकवचन ; कळा = कुशलता + कुसरी )
०खाऊ   घाण - वि . १ एखाद्याच्या मोठेपणास , अब्रूस काळिमा आणणारा . २ जो दुसर्‍याला मुर्ख बनवितो , घोटाळ्यांत , गोत्यांत आणतो तो . ' घरी कळाखाऊ अवळा नसावी अशीअवघा वेळ रागामधी नागीण घुसघुशी । ' - पला ८० . २ ( व्यापक .) शोभा येण्यासाठी , सौंदर्यासाठीं कोणतीहि गोष्ट केली असतां तिचा ज्यावर परिणाम होत नाहीं अशी व्यक्ति ( विशेषतः स्त्रिया व मुलें ); घाणेरडा ; कळाहीन ; मळकट ; घाण . ' कळाखाऊ कपडे घालून जर गेलात तर काम कसें होईल ?
०तीन  स्त्री. ( व .) कळांवंतीण . ०धर - वि . कलावान ; पंडित ; विद्वान . ' जितेके कळाधन पृथ्वीवरी । जे जे आले शाहूनगरी । ' - निमा ( आत्मचरित्र ) १ . १०६ .
०निधि  पु. चंद्र . २ ज्याच्यापाशीं पुष्कळ कला आहेत असा .
०न्यास वि.  अनेक कलाकौशल्यानें बनविलेलीं ; नक्षीदार . ' पांचा आंगोळियां विन्यास । कळान्यास मुद्रिका । ' - एरुस्व १५ . ५३ .
०पात्र वि.  कळावान ; कलावंत . ' विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सप्तात्रें । ' - दा . १ . ८ . २३ . - न . कलावंतीण . ' तों सभेसी आलीं कळापात्रें । श्रीची लीला वर्णिती विचित्रें । त्या गौरविल्या राजीव नेत्र । वस्त्रें भूषणें देवोनियां । ' - ह . २९ . १५१ .
०वंत वि.  कलावंत पहा .
०वतो   वंती वंतीण - स्त्री . कलांवंतीण , कळवंतीण पहा . ' कलावती ते करी दरिद्रकामिका पाश घालूनि । ' - दावि ४५१ .
०विद वि.  कलावन ; कुशल . ' तें कळाविदीं आइकावी । अवधान देओनी । ' शिशु ६५१ .
०विदपण  न. कुशलता . ' एथ कळाविदपण देओनी । ' - शिशु ६५१ .
०विदपण  न. कुशलता . ' एथ कळाविदपणा कळा । ' - ज्ञा २ . ३७ .
०सूत्र  न. कळसुत्र पहा .
०सुत्राचा  पु. कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .
खेळ  पु. कळसुत्री बाहुल्यांचा खेळ .
०सित्राची   स्रि . विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनी हालणारी बाहुली .
वाहुली   स्रि . विशिष्ट प्रकारच्या दोर्‍यांनी हालणारी बाहुली .
०सूत्री वि.  कळसूत्री पहा .

कळा

   कळाखाऊ
   १. कळाहीन
   घाणेरडा. २. अब्रू घालविणारा
   काळिमा आणणारा. ‘घरी कळाखाऊ अबला नसावी अशी।’ -पला ८०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP