Dictionaries | References

वाळणें

   
Script: Devanagari

वाळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vāḷaṇēṃ v i To dry; to lose or part with wetness, moisture, succulence, sappiness. 2 To become lank and meagre; to dry and waste.
vāḷaṇēṃ v i To suffer वाळ or वाळीत ejection from caste.
, to clinch. वाळता करणें-घेणें &c. or -देणें See explained under the commoner form वळता.

वाळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Dry; become lank and meagre.
v t   Clinch, give a twist.

वाळणें     

अ.क्रि.  १ सुकणें ; नीरस होणें ; रुक्ष होणें ; रस , रक्त इत्यादि आटून आर्द्रतारहित होणें . २ कृश होणें ; रोडणें ; रोडावणें ; क्षीण होणें . [ सं . ज्वल् ‍ ] वाळवण - न . वाळण्यासाठीं उन्हांत घातलेलें धान्य . २ वाळयामुळें कमी होणारा अंश . वाळत राहणें -( कर . ) उपाशीं राहणें . वाळवणें , वाळविणें - सक्रि . १ सुकविणें . २ कृश करणें . [ वाळणें प्रयोजक ]
उ.क्रि.  १ वर्ज्य करणें ; टाकणें ; त्याग करणें . वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । - ज्ञा ११ . ६४२ . परमेश्वराचां डोळां । वाळुनि देवताचक्राचा मोळा । - भाए ५४३ . २ वाळींत टाकणें ; बहिष्कार घालणें , टाकणें . मी रे गोरी चापेकळी । तुझ्या दर्शनें होईन काळी । मग हे वाळी जन मज । - तुगा १२९ . कुळें वाळिती जातिभ्रष्टातें । - मुसभा ३ . ८७ . ३ वजा करणें ; परत करणें ; निकालांत काढणें . तसलमात टाकून वाळणें . -( बडोदें ) खानगीखातें पृ . १५६ . खर्च पडलेली रक्कम मांडून वाळण्यास उपरी अधिकारी . - खानखातें १५५ . [ वळणें ] वाळता करणें , वाळता घेणें , वाळता देणें - वळता करणें पहा .
स.क्रि.  खिळा वगैरे उपटून येऊं नये म्हणून वळविणें ; बोळविणें . [ सं . वल् ‍ = वळविणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP