Dictionaries | References

कडकणें

   
Script: Devanagari
See also:  कडकणा , कडकणी

कडकणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 4 To dry stiffly or hard--cloth. 5 To craunch; to crackle; to rustle--crisp bread under chewing, dry grass or corn under cutting, thorns under burning, dry and stiff clothes, paper &c. 6 To rail and bellow in passion; to storm at. With वर of o. 7 To crack or peal--thunder. Ex. वीज कडकली. कडकून सांगणें-बोलणें &c. To tell, say, or speak in a loud voice; to exclaim, bawl, bellow.

कडकणें     

पुस्त्रीन . १ नवरात्रांत ( अगर इतर वेळीं ) देवीच्या वरील मंडपीला टांगलेले कागदाचे नक्षीदार वाटोळे तुकडे . २ वरील आकाराच्या तळलेल्या पुर्‍या ; तेलच्या फुलोरा . ' कृष्णालागी तेलवणें । आणलीं कडकडीत कडकणें । ' - एरुस्व १५ . ९० . - वेसीस्व ८ . ११७ .
अ.क्रि.  १ वाळणें ; सुकणें ; कडकडीत होणें ( कापड , भाकर , इ० ) २ अतिशय सुकल्यानें तडकणें ; उलणें . ३ शुष्क होणें ; आक्रमण ; करपणें ( थंडीनें , उष्णतेनें उभें पीक इ० ) ४ पक्कें होणे ; वाळणें ; कापणीला तयार असणें ( गवत , धान्य इ० ) ५ अशक्त , दुबळें होणें ( माणुस , जनावर ). ६ कडकड वाजणें ( चावतांना भाकरी ; कापतांना गवत ; जळतांना काटे , वाळलेले कपडे , कागद इ० ). ' बहु वाद्यें मेळा कडकत भरें व्योम भरलें । ' - दावि २२३ . ७ खूप रागावून मोठ्यानें भांडण करणें ; ताशेरा झाडणें . गोदूबाई पुन्हां कडकल्या .' - हांकाध ९९ . ८ कडकड वाजणें ; गडगडाट होणें ( मेघ , वारा , वीज यांचा ). ' वीज कडकडली .' ' तया तेजापेक्षां कडकत बळें वात सुटला । ' - दावि २५५ . ९ महाग होणें ; जास्त वाढणें ( बाजारभाव ). - शे . ८ . १८७ . कडकून सांगणे - बोलणें - मोठ्यानें , जोरानें सांगणें ; बोलणें , ओरडणें , शिरा ताणून बोलणें . ( कडक )

कडकणें     

कडकून सांगणें-बोलणें
मोठ्याने, जोराने सांगणें, बोलणें
रागाने, शिरा ताणून बोलणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP