|
पु. ( कु . ) एक जातीचा पक्षी . सुकणें - अक्रि . १ वाळणें ; शुष्क होणें ; ओलावा नाहींसा होणें . २ नदी , खाडी इ० मधील पाणी कमी होणें , पात्र कोरडें पडणें . ३ आजारीपणामुळें शरीर क्षीण होणें ; वाळणें . [ सं . शुष् = वाळणें ] म्ह० ( गो . ) सुकलेलें पान न्हयं झालेले सांग = निरुपयोगी माणसास भलतेंच काम सांगणें . सुकणावळ - स्त्री . सुकल्यामुळें झालेली द्रवपदार्थाची खराबी . सुकतळ - न . जोडयांत पावलाचा घाम शोषून घेण्यासाठीं घातलेला चामडयाचा तुकडा ; घामोळें ; खोगिराच्या खालचें घामोळें ; अंगरखा इ० कामध्यें कांखेंत असल्या प्रकारचें घातलेलें जोड कापड . [ सुकणें + तळ ] सुकताव - पु . भट्टींत सोनेम तापवून हवेनें आपोआप थंड होऊं देण्याची क्रिया . याच्या उलट पाणताव ( पाणी ओतून थंड करणें ). [ सुका + ताव ] सुकती - स्त्री . नदी , समुद्र इ० ची ओहोटी ; पात्र कोरडें होणें . सुकती भरती - स्त्री . समुद्र इ० चें पाणी उतरणें व चढणें . सुकवडा - पु . उडदाचे पिठांत मिरें , सुंठ , हिंग इ० घालून तळलेला वडा . सुकवणस - न . १ धान्य इ० सुकविणें ; वाळवण . २ वाळविण्याची मजुरी . - स्त्री . जीर्ण स्थिति ; अशक्तता . सुकवत , सुखवत - स्त्रीन . वाळलेलें केलीचें पान . सुकवणी - स्त्री . १ क्षयरोग ; क्षीणता . २ ( व . ) एक प्रकारची गवती चटई . सुकविणें - सक्रि . १ वाळविणें . २ ( ल . ) निस्तेज करणें . - मोस्त्री ४ . ३९ . सुकवें - न . ( कों . ) करपलेलें पीक ; वाळलेलें शेत . सुका - वि . १ सुकलेलें ; वाळलेलें . २ ( ल .) लाभरहित , उत्पन्नरहित ; पोकळ ; निरर्थक ; अर्थहीन ; कसहीन . ३ कोरडा , जेवणाशिवाय ( पगार ). [ सं . शुष्क ; तुल० फ्रेंजि . शुको ] सुकाकूल - न . एक जातीचें फळ , मिस्त्री . सुकाट - न . ( कु . ) वाळविलेला कोलंबी जातीचा एक मासा ; सुंगाट . सुकाटणक , सुकाठणक - वि . कोरडा ठणठणीत ( जमीन ). सुकाड - पु . १ सुकंडा पहा . २ शेतांतील पांखरांसाठीं उभें केलेलें बुजगावणें . सुकाताव - पु . १ भुकेमुळें होणारा पोटाचा भडका ; भुकेमुळें होणारी व्याकुळता . २ शुष्क पाहुणचार ; निरर्थक फेरफटका ; साफ नाकबुली ; खरडपट्टी ; धसमुसळेपणा . ( क्रि० देणें ; बसणें ). ३ सुकताव पहा . सुकादुकळ , सुकादुष्काळ - पु . पावसाच्या अभावामुळें पडलेला दुष्काळ . सुका लफडा , सुका लफडें - पुन . निरर्थक ब्याद , त्रास , अडचण , भांडण इ० . सुकाळें - न . ( गो . ) सुकें तळें . सुकीकेळ , सुकेंकेळ , सुकेळ - न . सोलून तूप लावून वाळविलेलें केळें . सुकीखरूज , सुक् खरूज - स्त्री . कोरडी , पू नसलेली खरूज . सुकेड - स्त्री . ( राजा . ) वाळलेली बाजू , जागा . [ सुका + कड ] सुको जामोर - ( गो . ) फायद्याशिवाय काम करणें . सुक् खा - वि . ( राजा . ) सुका पहा . सुक्यो पोळयो - ( गो . ) हवेतेल बंगले मनचे भाडे .
|