Dictionaries | References

माशी

   
Script: Devanagari
See also:  माशीचें झाड

माशी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  भूमि की एक माप   Ex. एक माशी दो सौ चालीस वर्ग गज के बराबर होती है ।
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

माशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   used in accounting for or noticing a loss or other evil occurrence.
   flower.
   māśī a relating to the weight मासा. used in comp. with the numerals; as एकमाशी, दुमाशी, तिमाशी, चौमाशी.

माशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A fly. The bead or sight of a gun.
माशा मारत बसणें   be without occupation.

माशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  दोन पंख असलेला छोटा किटक   Ex. शेणावर माशा भिणभिणत होत्या.
ATTRIBUTES:
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
 noun  बंदुकीच्या टोकावर असलेला उंचवट्यासारखा भाग ज्याच्या सहाय्याने नेम धरण्यात येतो   Ex. शिपायाची नजर माशीवर केंद्रित आहे.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
malതോക്കിന്കുഴലിന്റെ അറ്റം
oriବନ୍ଧୁକର ମକ୍ଷୀ
   see : घरमाशी

माशी

 वि.  मासा नामक वजनासंबंधीं . समासांत संख्यावाचकांसह योजतात . जसें - एकमाशी - दुमाशी - तिमाशी - चौमाशी .
   स्त्रीन . एक झुडूप . याच्या पानांचा पलिस्तर मारण्यांत उपयोग करितात . याला अतिशय लहान , माशीसारखें फूल येतें .
  स्त्री. 
   मक्षिका . एक घरांत आढळणारा सपक्ष जीव , कीटक .
   नेम धरण्यास उपयोगी असें बंदुकीच्या तोंडावरच माशीसारखें चिन्ह ; मासकी ; मखी . [ सं . मक्षिका ; प्रा . मक्खिआ ; पं . मक्खी ; सिं . मखी ; हिं . गुज . माखी ; हिं . मछिआ ; बं . माछी ; फ्रेंजि . मखी ] म्ह० ( व . ) माशी पादली = माशी शिंकणें याअर्थी . ( वाप्र . ) माशा उडवणें - स्वस्थ बसणें . माशा खाणें , गिळणें -
   मूर्ख , गोंधळलेला , बावरा झालेला दिसणें .
   गमणें ; रेंगाळणें ; चाचपडणें . माशा मारणें , मारीत बसणें - निरुद्योगी बसणें . माशी लागणें -
   दागिना इ० च्या वरील मुलामा , पातळ पत्रा झिजून आंतील लाख दिसूं लागणें .
   एखादें कामं चालू असतां तें मध्येंच थांबणें ; अडणें . पण कुठें माशी लागली ? - नाकु ३ . ७७ .
   मळमळूं लागून वांति होणें .
०शिंकणें   ( हानि किंवा अनर्थकारक गोष्ट घडून येण्यास क्षुल्लक कारण दाखविणार्‍या माणसाच्या उपहासार्थ योजतात ) हरकत येणें ; अडथळा येणें ( माशी शिंकणें ही गोष्ट अशक्य तेव्हां असेंच असंभवनीय कारण सांगून कार्य बंद ठेवणारास उद्देशून उपयोग ). नाका तोंडावरची माशी हालणें , माशी हालणें गरीब स्वभावामुळें कांहींबोलणें . माशीला माशी ( नक्कल करितांना मूळच्या लेखांत शाईवर माशी बसून डाग पडला असल्यास नकलेंतहि तसाच डाग दाखविणें यावरुन ल . ) हुबेहुब , बिनचुक पण अर्थ न समजतां नक्कल करणें . माशी हागणें क्रि . जनावराच्या अंगांतील व्रणांवर कीड होण्याचीं चिन्हें दिसणें . गुळावरल्या माशा किंवा साखरेवरले मुंगळे जोंपर्यंत गोडी ( उत्कर्षाचे दिवस ) आहे तोंपर्यंत मित्र म्हणविणारे लोक . माशांचा वाघ पु . माशा पकडणारा कीटक , कोळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP