Dictionaries | References

नजर

   
Script: Devanagari

नजर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

नजर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

नजर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  sight, vision. regard. A present.
नजर देणें   To have the eye upon; to aim.
नजर न पुरणें   To be beyond the reach of vision.
नजर फांकणें   To become ambitious or avaricious.
नजर मरणें   To get familiarized with the sight of.

नजर

नजर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्यावर ठेवलेले ध्यान   Ex. अमेरिकाच्या नजरा जगातील प्रत्येक देशावर आहे.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdنظر
 noun  डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे   Ex. जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : दृष्टी, दृष्ट, दृष्टी

नजर

  स्त्री. दृष्टि ; नदर . माझ्या नजरेस जो पडेल त्याची मी आहुती घेई . - विवि ८ . ८५५ . २ धोरण ; उद्देश ; पहाणे . अवरंगजेबास ठायी ठेवावे ही नजर पावली नसली तर .... अवहेलनाकरितां गुण ते बोलावे . - मराआ १५ . ४ इच्छा ; हांव . नजर भारी ! होनाचे नाणे ! लकाराशिवाय बोलीच नाही असा प्रकार . - ख ७ . ३२५९ . ५ वाईटबाधक दृष्टि ; दृष्ट . लोभी , कामी दृष्टि . त्यांची नजर आपली तुझ्यावर . - मोर ३५ . ६ . ( ल . ) तर्क ; अवलोकन करण्याची शक्ति . त्यांत माझी नजर बराबर चालली नाही . - विवि ८ . १ . १८ . ७ निगा ; काळजी . [ अर . नझर ; हिं . गु . नजर ]
०करणे   निगा ठेवणे . संग्रह करावा . याची बरी नजर करावी . - मराआ १२ .
०टाकणे   ( एखाद्या वस्तूकडे ) ओझरते पहाणे . या अर्थावरुन नजर टाका . - भक्त मयूर केकावली २ .
०देणे   ( एखादी गोष्ट ) विचारांत घेणे .
०धरणे   इच्छा करणे . कदाचित त्याचे वंशजांनी त्यामागे हरामखोराची नजर धरली तर त्यास त्याच वृत्तीचे बल होणार . - मराआ २४ .
०न   - ( एखादी गोष्ट ) दृष्टीच्या , शक्तिच्याबाहेर कक्षेबाहेर ( विस्तृत , गूढ , मोठी , बहुसंख्यांक ) असणे .
पुरणे   - ( एखादी गोष्ट ) दृष्टीच्या , शक्तिच्याबाहेर कक्षेबाहेर ( विस्तृत , गूढ , मोठी , बहुसंख्यांक ) असणे .
०पडणे   ( एखाद्याची ) दृष्ट लागणे ; बाधणे . - विचावि २३० .
०फांकणे   दृष्टि विस्तृत होणे . २ ( एखाद्याची ) महत्त्वाकांक्षा , लोभ इ० वाढणे .
०मरणे   ( तीच तीच गोष्ट पुनःपुनः केल्याने तिच्या बद्दलचे ) भय , आदर , किळस इ० नष्ट होणे ; ( एखादी गोष्ट ) दृष्टीला पूर्ण परिचित होणे . या संबंधाने बर्‍याच लोकांची अजून नजर मेली नाही . - आगर ३ . ४३ . नजरेत नजरांत आणणे ताब्यांत आणणे ; डोळ्यांसमोर ठेवणे ; लक्ष्यांत घेणे . नजरांत आणिला कारभार । - दावि ३१ . नजरेत धरणे पर्वा करणे . हम्बीरराव याणी दिलेलखान नजरेत धरला नाही . - सभासद ६४ . नजरेस पडणे दिसणे . नजरेस येणेपसंत पडणे . २ माहित होणे ; दृष्टीस पडणे ; लक्षात घेणे . नजरांत आणिला कारभार । - दावि ३१ . नजरेचा खेळ पु . १ केवळ दृष्टिक्षेपाने , एकदां नजर टाकण्याने होणारे काम , गोष्ट ; किरकोळ सुलभ काम . २ मुख्यतः दृष्टीनेच साध्य असलेले काम , विषय . उदा० चित्रकला , तिरंदाजी , लेखन . ३ दृष्टीचे अद्भुत , विलक्षण , आश्चर्यकारक कृत्य , काम . जसेः - अतिशय सूक्ष्म अक्षरे , चित्रे काढणे ; बारीक शिवणे ; घड्याळाची सूक्ष्म यंत्रे बसविणे इ० . ४ चांगली बळकट दृष्टि , पराकाष्ठेची तारतम्यदृष्टि लागणारी गोष्ट . दृष्टीचा खेळ व नजरेचा खेळ हे शब्द एकमेकांबद्दल पर्याय म्हणून योजतात व तसे करणे इष्ट आहे . कांही मात्र वर दिलेल्या अर्थाप्रमाणे उपयोगांत आणितात . दृष्टीचा खेळ पहा . नजरेची बाधा दृष्ट . आज रामूला नजरेची बाधा झाली . नजरचे पाप , नजरेचे पाप न . प्रत्यक्ष ( एखादी वाईट गोष्ट ) पहाण्याने होणारे पाप ; पाहण्याचे पाप . ( एखादी विशिष्ट गोष्ट नजरेआड घडल्यास खपते पण समोर घडल्यास खपत नसते अशा वेळी उपयोग ). नजरेने क्रिवि . समक्ष ; प्रत्यक्ष . त्यासही येथील विचार नजरेने दाखवून जो विचार सांगणे ... - पेद ३ . १८३ . नजरेने पाषाण उलणे फार वाईट नजर असणे . दृष्टि या शब्दांतील इतर वाक्प्रचार पहा . सामाशब्द -
०अंदाजा  पु. नजरेने पाहणी करुन ( पीक इ० कांचा ) केलेला अंदाज ; ( सामा . ) डोळ्यांनी पाहून एखाद्या वस्तूचे मान , परिमाण ठरविणे ; अशा रीतीने ठरविलेला अंदाज , अटकळ . नजर - अंदाजा - पाहणी - मोजणी - मोजदाद - अजमास - पडीत - वहीत - पीक - बार - किंमत - वजन . [ नजर + अंदाज ]
०एनायत  स्त्री. कृपादृष्टि . नजर एनायत फर्माऊन . - रा १६ . १३८ .
०कैद  स्त्री. साधी अटक . [ नजर + कैद ]
०गहाण   गाहण गहाण ठेवलेली मिळकत सावकाराच्या ताब्यात न राहता ऋणकोजवळ न राहता ऋणकोजवळच राहते असला गहाणाचाच एक प्रकार ; ह्या प्रकारांत ऋणकोने मी जातीने कर्ज फेडीन न फेडल्यास सावकाराने माझी विवक्षित मिळकत विकून तिच्या किंमतीतून आपले कर्ज सव्याज फेडून घ्यावे असे लिहून द्यावे लागते . - घका ३० . याच्या उलट अमलगहाण , ताबेगहाण . [ नजर + गहाण ]
०गुजार  स्त्री. परीक्षा ; पारख . आपण राजियांनी नजरगुजर करुन एकेक माणूस पाहून ठेवावे . - सभासद २१ . - वि . डोळ्याखालून घातलेले ; गेलेले ; पारखलेले ; दृष्टिगोचर झालेले . तसेच तटसरनोबत ... जे ठेवणे ते बरे मर्दान कबिलेदार विश्वासु असे पाहून नजरगुजार करुन ठेवीत जावे . - मराआ २८ . [ नजर + फा . गुझार - गुझास्तानचे अज्ञार्थी रुप ]
०गुजारत   गुजारा - स्त्रीपु . नजरानजर ; दृष्टादृष्ट ; भेट . त्याची व आमची नजरगुजारत होईल तेव्हां काय बोलणे ते बोलूं . [ नजर + गुजारत , गुजारा ]
०चूक  स्त्री. दुर्लक्षामुळे , नकळत , घडलेली झालेली चूक , दोष ; दृष्टिदोष . [ नजर + चूक ]
०चोर  पु. धूर्तपणाने , कावेबाजपणाने नजर चुकविणारा ; दृष्टीस पडण्याचे टाळणारा . [ नजर + चोर ]
०दौलत  स्त्री. लक्ष्मीची कृपादृष्टि . - राव्यको ८ . ६७ . [ नजर + दौलत ]
०पापी वि.  वाईट , पापी , दुष्ट नजरेचा .
०पारख  स्त्री. १ पाहतांक्षणीच , बाह्यस्वरुपावरुन ( एखाद्या गोष्टीची , व्यक्तीची ) केलेली परीक्षा , अनुमान . २ पाहतांक्षणी , बाह्यस्वरुपावरुन अनुमान , तर्क करण्याची शक्ति , चातुर्य . [ नजर + पारख = परीक्षा ]
०पाहणी  स्त्री. केवळ नजरेने पीक , जमीन , धान्याची रास इ० कांचा केलेला अजमास , अटकळ . [ नजर + पाहणी ]
०बंद  पु. नजरबंदी करणारा ; गारुडी . २ ( कों . ) नजरबंदी पहा . क्रिवि . साध्य अटकेत ; ज्याच्या हालचालीवर सक्त नजर आहे अशा स्थितीत . बादशहाने नजरबंद केले . - मराचिथोशा ३ . [ फा . नझरबंद ]
०बंदी  पु. १ दृष्टीला भूरळ पाडणे ; जादुगिरी ; हातचलाखी ही जादूची नजरबंदी कुणि आणि कुठे कशी केली ? - वाग्वै
०बाग  पु. घर , राजवाडा इ० कांसमोर शोभेकरिता केलेला सहज दृष्टीस पडावयाजोगा बाग . पांच कैदी नव्या वाड्यांतील नजरबागेत आणून त्यास समक्ष रुळ ढोराप्रमाणे त्याचेकडून ओढवले . - विक्षिप्त २ . १०१ . २ गच्चीवर , खिडकीपुढे फुलझाडांच्या कुंड्या वगैरे ठेवून केलेली बागेसारखी टुमदार रचना .
०बाज वि.  सूक्ष्म नजरेने परीक्षा , निरीक्षण करण्यांत कुशल . २ हेर ; टेहळणी करणारा . - ऐटी १ . ४४ . शहारांत नजरबाज लोक ठेवून ... - मरिउनि २ . २०० . ३ डोळे मोडणारा , मारणारा ; नेत्रसंकेत करणारा . [ नझरबाझ ]
०बुलंद  स्त्री. कृपादृष्टि . गरिबांवर नजरबुलंद झाल्याने आपलेच गांव आहे . - पदमव १७ .
०भूल  स्त्री. पाहण्यांत झालेली चूक ; डोळ्यांना पडलेली भुरळ ; नजरचूक . [ नजर + भूल = चूक , मोह ]
०मासला  पु. नुसत्या नजरपहाणीने मिळालेला मासला , नमुना नजरअंदाजा या शब्दाबद्दल योजितात .
०मुबारक   मुबारकी - स्त्री . शुभदृष्टि ; कृपादृष्टि . [ नजर + अर . मुबारक = शुभ , मंगल ]
०मोजणी  स्त्री. मोजण्याच्या कोणत्याहि साधनाचा उपयोगकरतां केवळ नजरेने केलेली मोजणी . नजर मोजणी करावयाचा शिरस्ता आहे . - मसाप २ . २ . १४१ . [ नजर + मोजणी ]
०मोजबा  पु. चौकशी ; पाहणी . - वाडसमा २ . २ . ३५ .
०हुजूर   नजरेहुजूर - क्रिवि . प्रत्यक्ष ( राजाच्या , हुजुराच्या ) समक्ष , दृष्टीखाली ; समोर . [ नजर + हुजूर ] नजरानजर - स्त्री . परस्परांनी एकमेकांस पाहणे ; दृष्टादृष्ट ; भेट . [ नजर . द्वि . ]

नजर

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP