|
स्त्री. एक हलकें धान्य ; एक कडधान्य . याचा बेल असून त्याला शेंगा येतात . वि. १ संख्यावाचक विशेषण . एकावर पांच शून्यें देऊन होणारी संख्या ; शंभर हजार ; लक्ष पहा . लाख मरोत पण लाखांची पोशिंदा न मरो . - राजसंन्यास ७३ . २ ( ल .) अतिशय उत्तम ; फार महत्त्वाची ; बिनमोल ( गोष्ट , युक्ति , माणूस ). त्याने काल एक लाख गोष्ट सांगितली मावशी सुद्धां खरोखर लाख माणूस आहे - निचं ३८ . ३ ( ल .) पुष्कळ ; अनेक अरे जा !! तुझ्यासारखे लख पाहिले आहेत . [ सं . लक्ष ; प्रा . लक्ख ; लाख ] म्ह० १ ( कों .) लाखोश्री आण भिकेश्री एकच ( मेल्यावर गरीब व श्रीमंत सारखेच ) २ लाख मरावे पण लाखांचा पालनवाला मरुं नये . ( वाप्र .) लाख नसावा पण साख असावी - संपत्ति नसली तरी पत असावी . लाखांतली गोष्ट - अतिशय महत्त्वाची गोष्ट . सामाशब्द - लाखपंचोत्र्या - वि . लख गोष्टी सांगितल्या असतां स्यांतील पांच गोष्टी त्याच्या खर्या असतेल असा ; गप्पा मारणारा ; थापाडया ; गप्पीदास . लाख - लाखाचा माणूस - पु . अत्यंत श्रेष्ठ , योग्य लाखांत एक या योग्यतेच मनुष्य . लाख रुपयांचा - वि . अत्यंत महत्त्वाचा , अमोल , उत्कृष्ट . लाख रुपयांची संधि --- स्त्री . अमूल्य संधि ; ग्यो वेळ . इतक्यांत ही लाख रुपयांची संधी ... त्यानें वायां जाउम दिली नाहीं . लक्ष्मी आणि सरस्व्ती लाखांचा पालनवाला - वि . अनेक माणसांचे , कुटुंबाचें पालनपोषण करणारा ; अनेकांच्या उपयोगी पडणारा ( राजे , कोटयाधीश , सरदार , उदार लोक यासंबंधी योजतात ). लाखाच्या ठिकाणीं --- वि . क्रिवि लाख रुपये दिले तरी न मिळणारी ( अडचणीच्या वेलीं दिलेल्या लहान रकमेबद्दल , मदतीबद्दल योजतात ). तूं मला दहा रुपये आतां दिलेस तर ते लाखांच्य ठिकाणीं आहेत . लाखी --- वि . जीस मोल नाहीं अशी ; अमोल ( गोष्ट , वस्तु , मसलत ). ही लाखी मसलत रावमुरारीस कोणी दिली असेल ती असो . - नि ५३९ . लाखों - वि . असंख्य अनेक ; लक्षावधी लाखोलाख -- वि . लक्षावधि , असंख्य . [ लाख द्वि .] लाखोपति - वि . लक्षाधीश ; मोठा श्रीमान , लाखोली , लाखौली - स्त्री . १ लाख संख्या . २ देवाला फुलें , फळें , धान्य मोजून त्यांची वाहिलेली लक्ष संख्या . ( क्रि०वाहणें _. - ज्ञा १३ . ३८७ . शतजन्मीं नमनांची मे तुज वाहत असेन लाखोली - मोशांति ६ . ८ . कणैरीची लाखौली वाऊनी। - शिशु ७३९ - दा १७ . ३ . ६ . ३ ( उप .) शिव्यांचा वर्षाव , भडिमार करणें ; एखाद्यास खूप शिव्या देणें . [ लाख + आवली ] लाखोंशा - क्रिवि . लक्षावधि ; लाखो ; असंख्य [ लक्षश ] लाख्या - वि . १ उत्कृष्ट उत्तम ; लाख रुपये किंअतीचा ; बहुमोल ( मनुष्य , पदार्थ , भाषण ). तो लाख्या बोलणारा आहे २ पहिल्या प्रतीचा ; श्रेष्ठ ; प्रतिष्ठित ( व्यापारी पेढीवाला ). ३ लक्षाधीश ; धनाढय ( सावकार ). स्त्री. १ रंग वगैरेच्या उपयोगी पडणार बोर , पिंपळ इ० वृक्षांपासून निघणारा एक कृमिज पदार्थ . एक प्रकारच्या किडया पासून होणारा पदार्थ . पत्रावर मोहोर करणें इ० कामीं लाखेचा उपयोग होतो . लाखेपासून रंग व राळ अस दोन पदार्थ होतात . २ एक पक्का रंग . [ सं . लाक्षा ; प्राप . लव - खा ; हिं . गु - लाख ; फा - लाक तेलगू लाका ] ०काडी --- स्त्री . ( सोनारी ) कोणत्याहि जिनसाच्या पोकळ भागांत लख भरण्यासाठी केलेली लाखेची लांबट सळई , कांडी . लाखट - वि . लाखलेले ; लाख चिकटविलेलें लाखनें माखलेलें ; पोटीं लाख भरलेले ( सोन्याचे दागिने ) लाखटणे - स्त्री . लाखेनें माखणें [ लाखटणे ] लाखटणें - सक्रि . लाख भरणें ; लाख माखणें ; लाखणें - अक्रि दाटणें ; बसणें ; चोंदणें ( गशा - कफ , बेडका सांचून ); आवाज बसणें ; लाखट बेगड - स्त्री . सामान्य हलका दागिन्आ ( ज्यांत लाख भरलेली आहे असा ). जस्तीपत्र्याचे रंग ; मुलामा दिलेले जिन्नस . [ लाखट + बेगड ] लाखट - लाखी - दागिना - पु . लाख भरविलेला सोन्याचांदीचा दागिना . लाखडी - स्त्री . ( कु .) राखडी ; डोकींत घालावयाच एक अलंकार लाखणें - क्रि . मडकें इ० स लाख किंवा राळ माखणें , लावणें , लाखदाणा - पु . चीन देशांतून आलेली उत्तम जातीची लाह . लाखपाड - पु . १ आंगठीवर रत्नाचा खडा बसविण्यासाठीं कोंदणांत लाख भरणें . २ ( अशी लाख भरलेली ) आंगठी किंवा इतर दागिना ; लाखेचा घाट . तूं आधी लाखपाड कर मग मी व जन करुन देईन लाखलोटगें , लाखलोटें , लाखलोटकें , लाखलोटा --- नपु . लखेनें मढविलेलें , लाखटलेलें गाडगें लाखलोटा --- पु . लाख लावण्याचा धंदा . ( क्रि - करणें )- वि . लाखेनें मढविलें ; लाखटलेलं ( क्रि०करणें ) लाखवण - न . मढविण्याचा पदार्थ , लाख , राळा , डिंक इ० [ लाख ] लाखाजोहर - न . ( लाक्षागृह ) लाक्षाजोहार पहा . लाखीघराची आग . पांडव लाखाजोहारीं जळतां । विवरद्वारें काढिले। - दा ४ . ८ . ११ . ०मुआदि१ . १४० . जोहर पहा . [ लाख + काडी ] लाखाळणें --- क्रि . लाखणे पहा . लाखाळें - न . १ लाखेचा दागिना . २३ लाखलोटें . लाखी - वि . १ लाखेसारख्या रंगाचें . तडप रुचि र्लाखी उंच हा नेसवीला। "- सारुह . २ लाखट . लाखीरंग --- पु . रंगाचा प्रकार . - सेपू १ . ७९ . लाखीशाई --- स्त्री . लाख शिजवून तिच्या रसांत काजळ घोटून तयार केलेली काळ शाई . ही पाण्यानें धुतली जात नाहीं . पूर्वी पोथ्या लिहिण्यास हो वापरीत . लाखें न . कातडयांवरील तांबड चट्टा . [ लख ] लाखोटा - पु . १ कागदाच्या पिशवींत घातलेलें पत्र ; लखोटा ; मोहोरबंद पत्र . जेणें अभयवर दिला त्या गुरु हस्तांत म्याहि लाखोटा " - मोकृष्ण ८३ . २३ . २ आंत पत्र घालून जिचें तोंड ( लाख , डिंक इ० नें ) बंद केलें आहे अशी पिशवी ; पत्र आत घालण्यासाठी केलेली कागदाची पिशवी ; पत्र आंत घालण्यासाठी केलेली कागदाची पिशवी ; लिफाफा , पाकीट पहा . तयानें लाखोटा उखळुनी असें जे उकलिलें। - सारुह ५ . ८३ . ३ ( कागद , केंस , पानें इ० चा ) एकत्र झालेला , चिकटलेला गुड्डा ; पुंजका . ४ एकत्र चिकटून झालेली स्थिति , गुंता ; लादा ; लगदा , उदा० केसांचापांघरुणाचा - चुन्याचा - दगडाचा लाखोटा . चिक्कण मातीचा लाखोटा चांगला बसतो ५ लाखलोटा ; भांडयास लाविलेला लाखेचा लेप . वरि बरवा आंत न ज ओ तो काय करील काम लाखोटा। , औद्योत १२ . १३ . ०फुकडी - स्त्री . एक फुगडीचा प्रकार फुगडी खेळ ग लाखोटा । धर माझा आगोठा - भज ३२ . लाखोला - वि . लाखेचें बनविलेलें - केलेलें ; लाखी ( बांगडी , गोट वगैरे ).
|