Dictionaries | References

माप

   
Script: Devanagari
See also:  मोप , मोपर , मोपाड , मोपार

माप

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

माप

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचे वरवीं कितेंय मेजतात अशें साधन   Ex. हें एका लिटराचें माप
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  खंयच्याय वस्तुची लांबाय, रूंदाय, उंचायेचो, बी विचार खंयच्याय निर्दिश्ट लांबायेच्या आदाराचेर वा तुळेंत जाता   Ex. सोहनाचे कमराचें माप तीस इंच आसा
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  वजन, तांक मापपाचो एकक   Ex. वजन आनी तांक मापपाचीं मापां वेगळींवेगळीं आसतात
SYNONYM:
 noun  मेजपाचें आयदन वा पात्र   Ex. दुदवालो मापान दूद मापता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  जातूंत दवरून कसलीय वस्तू मेजतात अशें पात्र   Ex. आवय मापान दाळ मेजता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : प्रमाण, जोख, वजन, वजन

माप

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A large sundried brick.
   measure is an abomination. Deut. xxv. 13--15.

माप

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A measure; measuring.

माप

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मापून निश्चित केलेले परिमाण   Ex. सोहनच्या कमरेचे माप तीस इंच आहे.
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  आकारमान मोजण्याचे भांडे   Ex. दुकानदाराने मापाने ज्वारी मापून दिली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  प्रमाणने मोजून निश्चित करण्याचे साधन   Ex. ह्याच्यात दोन माप दूध घाल.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
 noun  प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे साधन   Ex. डबाभर तांदळाचे माप किती भरले?
ONTOLOGY:
माप (Measurement)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  प्रमाणाने मोजून निश्चित करण्याचे पात्र   Ex. दोन माप भरून चुरमुरे विकत घेतले.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

माप

  पु. लक्ष्मीपति ; विष्णु [ सं . मा + पति ]
 वि.  रगड ; पुष्कळ ; उमाप . आज पाऊस माप पडला आहे . [ अमाप ]
  न. 
  न. ( गों . ) उन्हांत वाळविलेली मोठी वीट ; कच्ची वीट . - शामची आई . [ मापणें ]
   प्रमाणानें मोजून निश्चित करण्याचें साधन ; ( वजन , सांठा , लांबी , वेळ इ० ) मोजण्याची , गणण्याची क्रिया . ( क्रि० करणें ; चालवणें ; घेणें ; मांडणें ; लावणें . ) आज भाताचें माप चाललें आहे .
   गणना ; गणनेनें निश्चित करणें . आंब्याचें माप झाले म्हणजे खुरद्याचें माप घे .
   ( सामा ) मापण्यानें निश्चित केलेलें मान , परिमाण . दहा खंडी माप भरलें ; ( सामा . ) मापण्याचें साधन ( वजन , सांठा , लांबी इ० चें ) उदा० वजनी माप , कैली माप , धान्य माप , कापडाचें माप . इ० , मापण्याचें कोणतेंहि साधन .
   मापलेला , परिमित भाग . त्या खांचरांत चार मापें आहेत .
   ( खा . ) बारा डोळें किंवा चार पायली , डोळा अर्थ १० पहा . [ सं . मा = मोजणें ]
०देणें   घेणें - मापून देणें , घेणें .
०कुतर्‍यानें   - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें ,
नेणें   - एखादी गोष्ट गतगोष्टीपैकीं एक होणें ; एखाद्या गोष्टीची गतगोष्टींत गणना होणें . पदरीं घालणें ,
०घालणें   एखादी गोष्ट अमान्य करणारास ती अनेक प्रमाणांनीं खरी करुन पटवून देणें .
०लागणें   मापीं लागणें - कमी कमी होणें . मापीं लागलें शरीर । - दा ३ . ९ . १ . आपल्या मापानें मोजणें मापानें मोजणें - आपल्या स्वतःच्या ( प्रमाण असलेल्या ) मापानें मोजणें . माप आणि महापाप - खोटें माप घालणें भहापाप होय . सामाशब्द -
०पट्टी   ऐनजिनसी सारा घेतांना धान्य मापण्याबाबत शेतकर्‍यावर बसविलेला कर .
०वरताळा   वर्ताळा - पु .
   धान्याच्या सार्‍याच्या खंडीमागें सरकारानें हक्कानें मागितलेला वरतावळा .
   ( कों . ) कुळाकडून धान्य घेतांना माप घेण्यासाठीं हक्क म्हणून ठरीव खंडापेक्षा एकचौसष्टांश किंवा एकअष्टमांश जास्त घेतलेला मा , रकम . मापटें - न . साठप्याचें माप ; अर्धा शेर , एक अष्टमांश पायली ; निठवें . म्ह० ( व . ) आपलं तें मापटं दुसर्‍याचं तें दीड पायली . मापणें - सक्रि . ( वजन , साठपा , लांबी , वेळ यांच्या ) मापानें निश्चित करणें ; मोजणें ; तोल करणें ; मेज घेणें . [ सं . मा ; झें . मा ; ग्री . मेचिओ ; लॅ० मेतिओर ] मापन - न . मापणें ; मोजणें ; माप घेणें . मापाड्या , मापारी , मापेली - वि .
   ( सरकारी कोठ्या , बाजार माल यांतील ) सरकारी धान्य मापणारा .
   ( सामा . ) मापणारा . आयुष्य मोजायाला बैसला मापारीतूं कांरे व्यापारीं संसाराच्या । मापारकी - स्त्री . मापार्‍याचा धंदा . मापारी - स्त्री . धान्य इ० मोजण्याचें फरा नांवाचें एक माप . मापी - वि .
   साठप्याच्या मापानें निश्चित केलेला .
   मापानें मोजण्यासारखें ; साठप्याचें ; वजनीच्या उलट . माप दाखविणार्‍या शब्दांच्या पूर्वी हा शब्द जोडून येतो . जसें मापी खंडी - मण - शेर . मापीव , मापित - वि . मापलेला . ह्याच्या उळट तोलीव , मोजीव .

माप

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP