Dictionaries | References

गुंडाळणें

   
Script: Devanagari

गुंडाळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

To die.

गुंडाळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Wind around, roll up. Gather together. Shut up. Put by (a work or business).
v i   Wind or roll up.
v i   Die.

गुंडाळणें     

गुंडणें - गुंडाळणें पहा . व्याप्त होणें . जी भूतीं भूतळ माडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें । - ज्ञा ११ . २८६ . [ सं . गुंठन ]
उ.क्रि.  १ वळकटी करणें ; ( दोरी इ० नें ) लपेटणें ; वेष्टणें . २ एकत्र गोळा करणें . ३ आवरणें ; आटोपणें ; बंद करणें , ठेवणें ( उद्योग , कामधंदा ). सारे कागद रुमालांत गुंडाळून ठेव . ४ पराजित करणें ; जिंकणें ; कुंठित करणें ; निरुत्तर करणें . ५ हाताखालीं घालणें ; बळकावणें ; काबीज करणें ( परका देश , माल इ० ). यास ज्ञान नाहीं म्हणून चार शेतें होतीं तीं दायादांनीं गुंडाळिली . ६ ( सामा . ) व्याप्ति कमी करणें . ७ आच्छादणें ; वेढणें . माथें वस्त्रानें गुंडाळतो . - अक्रि . १ गुंडाळलें जाणें . २ ( पंचप्राण एकत्र आल्यामुळें ) मरणें . [ सं . गुड = वेष्टणें , प्रा . गुडदालिअ = एकत्र करणें ? ] गुंडाळून ठेवणें - न . जुमानणें ; बाजूला सारणें . प्रसंग पडला म्हणजे युक्तिवाद गुंडाळून ठेवणारी सुधारक मंडळी दृष्टीस पडते . - टि ४ . १३८ .

गुंडाळणें     

गुंडाळून ठेवणें
आपण एखादी वस्‍तू बाजूस ठेवावयाची असली, तिचे काही काम नसले म्‍हणजे ती कशात तरी गुंडाळून एका बाजूस ठेवतो. यावरून न जुमानणें
बाजूला सारणें. ‘प्रसंग पडला म्‍हणजे युक्तिवाद गुंडाळून ठेवणारी सुधारक मंडळी दृष्‍टीस पडते.’-टि ४.१३८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP