|
न. रहावयासाठीं भाड्यानें घेतलेली जागा , घर , खोली इ० . हें आमचें बिर्हाड हवाशीर आहे . एखाद्या ठिकाणीं उतरुन कांहीं काळ राहणें ; मुक्काम ; वसति ; वास्तव्य . ह्या खोलींत दुसर्याचें बिर्हाड आहे . बिर्हाडकरुचें सामानसुमान , खटलें , चीजवस्त , संसार . आम्हीं येथून बिर्हाड उचलून तिकडे नेलें . तळाचा किंवा व्यापारी मंडळीच्या फिरत्या स्वारीचा निराळा भाग ; एकाच व्यापार्याच्या सामानाचा ( माल , तंबू , गुरें इ० चा ) एकटा स्वतंत्र समुदाय ( तळावरील किंवा वाटेवरील ). भाड्यानें , भाडेकर्याप्रमाणें राहणें . आम्ही तेथें बिर्हाडानें आहों . भाड्यानें दुसर्यांच्या घरांत राहणारें कुटुंब ; भाडेकरु . गुप्तपणा ; स्पष्टपणें न बोलतां चोरुन ठेवलेला मुद्दा , मजकूर . घरोब्यानें बोलत असतां आंत बिर्हाड ठेवणें चांगलें नव्हे . [ बिड ( ढा ) दूर पहा ] ०आटोपणें गाशा गुंडाळणें ; निघून जाणें . मरणें . ०उचलणें एखाद्या ठिकाणाहून आपली चीजवस्त घेऊन निघून जाणें ; तळ हलविणें . ०करणें कायमचें वास्तव्य करावयाच्या उद्देशानें आपल्या सामानासुमानासह , बायकांमुलांसह एखाद्या ठिकाणीं राहणें . एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्या घरी किंवा शरीरांत ठाणें करुन राहणें . कफानें माझ्या छातींत बिर्हाड केलें आहे . विंचवाचें बिर्हाड पाठीवर - फारसें लटांबर जवळ नसणें . सामाशब्द - ०करी करु बिर्हाडू - पु . भाड्यानें बिर्हाड करुन राहणारा इसम . बिर्हाडाचा मालक किंवा रहिवाशी . बिर्हाड अर्थ ४ पहा . ०खर्च पु. बिर्हाड करुन राहण्याबद्दल येणारा , जागेचें भाडें वगैरेचा खर्च . ०बाजलें न. बाडबिस्तरा ; सामानसुमान ; चीजवस्त ; बोचकें ( प्रवाशी इसमाचें ); खटलें . बिर्हाड बाजलें संगातीच असणें घर , बायकांमुलें इ० पासून अलिप्त , मोकळें असणें ; मागें लटांबर नसणें ; सडेसोट असणें .
|