Dictionaries | References

तळ

   
Script: Devanagari

तळ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  खंयचेय वस्तूचो, बी सकयलो भाग   Ex. ह्या आयदनाच्या तळाक बुराक आसा / चामार जोत्याचो तळ बदलता
HYPONYMY:
तळ
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोंद
Wordnet:
asmতলি
bdथाला
benতলা
gujતળિયું
hinतला
kanತಳ
kasتَلہٕ , تَلہٕ پوٚت
malഅടിത്തട്ട്
marबूड
mniꯃꯈꯥ꯭ꯊꯪꯕ꯭ꯁꯔꯨꯛ
nepतल्लो भाग
oriତଳ
panਤਲਾ
tamஅடிப்பகுதி
telఅడుగుభాగం
urdپیندا , تلا
noun  खंयचेय वस्तुचो भितरलो सकयलो भाग   Ex. तांबयाच्या तळाक गोबर दाटला
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोंद
Wordnet:
asmতলি
benতলা
gujતળિયું
hinतला
kanಕೆಳಭಾಗ
malഅടിയില്
marतळ
mniꯃꯅꯨꯡꯒꯤ꯭ꯃꯈꯥꯊꯪꯕ꯭ꯁꯔꯨꯛ
nepपिँध
oriତଳଅଂଶ
panਤੱਲ
sanतलम्
tamஅடிப்பகுதி
telఅడుగున
urdپیندی , پیندہ , تلی , تلا , تہ , تلہٹی
noun  जाचेर ती आदारून आसता असो खंयचेय वस्तूचो सकयलो भाग   Ex. हे कायलीचो तळ रुंद आसा
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोंद
Wordnet:
asmতলী
bdथाला
benতলা
gujમૂળ
hinपेंदा
malഅടിഭാഗം
mniꯃꯕꯨꯛ
oriତଳ
sanतलः
tamஅடிப்பாகம்
telఅడుగు
noun  जोत्या पोंदचो भाग बी   Ex. ह्या जोत्याचो तळ गेला
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सोल
Wordnet:
asmশ্বʼল
bdसल
benসোল
gujસોલ
hinतला
kanತಳಭಾಗ
kasمَل پار
malസോള്
mniꯈꯨꯒꯥ
oriସୋଲ୍‌
panਤਲਾ
sanपादुकातलम्
tamஅடிபாகம்
telకిందిభాగము
urdسول , تلا , تلوا
noun  यात्रे वेळार मार्गांत रावपाची सुवात   Ex. सांज जाता मेरेम आमी आमच्या तळा मेरेन पावतले
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठिकाण थांबो मुक्काम
Wordnet:
asmজিৰণি ঠাই
bdजिराय जायगा
benগন্তব্যস্থল
gujપડાવ
hinपड़ाव
kanತಂಗುವ ಸ್ಥಳ
kasٹھِکانہٕ
malവിശ്രമതാവളം
marमुक्काम
mniꯂꯟꯗꯟꯐꯝ
oriରହଣି ସ୍ଥାନ
telమజిలీ
urdپڑاؤ , ٹھکانہ , مقام
noun  उदका सकयली जमीन   Ex. हे न्हंयेचो तळ निवळ दिश्टी पडटा
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पोंद
Wordnet:
kasژوٚک
mniꯈꯣꯡꯅꯨꯡ
panਤਲ
tamஅடித்தளம்
telఅడుగుభాగం
urdتلہٹی , تالی , سطح
See : लोक, आदार

तळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To be all over in a passion.

तळ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Bottom. Ground. A camp. The sole of a shoe.
तळ करणें   Encamp, alight.
तळची आग मस्तकास जाणें   Be all over in passion.
तळ लागणें   To be exhausted.

तळ     

ना.  खोली , पाया , बूड .

तळ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग   Ex. उन्हाळ्यात या विहिरीचा तळ दिसायला लागतो.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
ठाव
Wordnet:
asmতলি
benতলা
gujતળિયું
hinतला
kanಕೆಳಭಾಗ
malഅടിയില്
mniꯃꯅꯨꯡꯒꯤ꯭ꯃꯈꯥꯊꯪꯕ꯭ꯁꯔꯨꯛ
nepपिँध
oriତଳଅଂଶ
panਤੱਲ
sanतलम्
tamஅடிப்பகுதி
telఅడుగున
urdپیندی , پیندہ , تلی , تلا , تہ , تلہٹی
noun  जलाशयाचा आत दिसणारा सर्वात खालचा भाग   Ex. ह्या नदीचा तळ स्पष्ट दिसायला लागला आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasژوٚک
mniꯈꯣꯡꯅꯨꯡ
panਤਲ
tamஅடித்தளம்
telఅడుగుభాగం
urdتلہٹی , تالی , سطح
See : बूड, छावणी, पडाव, मुक्काम, पाय

तळ     

 पु. १ ( एखाद्या पदार्थाचा ) खालचा भाग , बूड . २ जमीन ; जमीनीचा पृष्ठभाग . दोन्ही दळभारा देषता । प्रद्मने ( प्रद्युम्ने ) आणीला तळा । - उषा १४१५ . ३ ( झाड , छपर इ० कांच्या ) खालील जागा , जमीन . लपे आत्मभ्रांतिछाया । आपणया तळी । - ज्ञा १६ . १० . ४ सैन्य ; स्वारी इ० कांची मुक्कामाची जागा छावणीचा गोठा ; शिबिर ; कँप . ( क्रि० घालणे , देणे ; मांडणे ; धरणे ; पडणे ; येणे ; सोडणे ). महाराणीसाहेबांचा तळ बडोदे मुक्कामी ज्या राजवाड्यांत मुक्काम असेल तेथील पाहरे - बडोदे , राजमहाल , कामगारी - कारकून नियम ७ . ५ पृष्ठभाग ; सपाट भाग . जसे हाताचा पायाचा तळ . ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ । - ज्ञा १४ . १०३ . पृथ्वीतळ उलथो पहात । - ज्ञा १ . १५६ . ६ व्यापारी , प्रवासी , लमाण , गाड्या , घोडी इ०कांच्या मुक्कामाची जागा , अड्डा . ७ एखाद्या ठिकाणी काही काळ झालेले सैन्याचे वास्तव्य ; मुक्काम ; छावणी , कँप . ८ एख्याद्या पदार्थाच्या राशीने व्यापलेली जागा ; पदार्थ ज्या ठिकाणी असेल ती जागा . ( पदार्थ हलविताना , तेथून दुसरीकडे नेतांना सापेक्षतेने या शब्दाचा उपयोग करतात ). आंबे सगळेच नेऊ नकोस , कांही तळावर ठेव ., ९ विस्तृत व सपाट भूभाग ; मैदान ; सपाट प्रदेश . या तळाची प्रदक्षिणा चार कोसांची आहे . बूट , जोडा इ० कांचा खालचा ( ज्यावर पाय टेकतात तो ) भाग ; तळवा ; जोड्याच्या तळव्यांतील चामड्याचा तुकडा . ११ ( - न ) कुंभाराच्या चाकाच्या मध्याची फळी , १२ नाश ; रसातळ . मानी मेलाचि जरि दुर्जय तरि निजशतात्मजरिपु तळा । - मोस्त्री २ . २२ . १३ . ( वणजारी ) तांडा . [ सं . तल ; फ्रे . जि . तलै = खाली , आंत ] ( वाप्र . )
०करणे   मुक्काम करुन राहणे ; डेरा देणे ; बिर्‍हाड लावणे ,
०घालून   - १ ( एखाद्या ठिकाणी ) कायम वस्तीच्या इराद्याने राहणे ; उतरणे ; आसन ; ठाण मांडणे . २ दुसर्‍यांचा पैसा गिळंकृत करुन , लुबाडून बेदरकारपणे स्वस्थ आणि निर्धास्त राहणे . तळ मारणे . तळची - तळपायाची आग मस्तकात जाणे - ( कर्त्याची षष्ठी ) रागाने नखशिखान्त संतप्त होणे ; अतिशय राग येणे . तळचे मडके हाणणे - फोडणे - ( मडक्यांच्या उतरंडीतील सर्वात खालचे मडके फोडणे ) ( ल . ) मुळावरच घाव घालणे ; समूळ नाश करणे .
बसणे   - १ ( एखाद्या ठिकाणी ) कायम वस्तीच्या इराद्याने राहणे ; उतरणे ; आसन ; ठाण मांडणे . २ दुसर्‍यांचा पैसा गिळंकृत करुन , लुबाडून बेदरकारपणे स्वस्थ आणि निर्धास्त राहणे . तळ मारणे . तळची - तळपायाची आग मस्तकात जाणे - ( कर्त्याची षष्ठी ) रागाने नखशिखान्त संतप्त होणे ; अतिशय राग येणे . तळचे मडके हाणणे - फोडणे - ( मडक्यांच्या उतरंडीतील सर्वात खालचे मडके फोडणे ) ( ल . ) मुळावरच घाव घालणे ; समूळ नाश करणे .
०झाडणे   ( सर्व सामग्री , बेगमी इ० ) खाऊन फस्त करणे .
०थांबणे   ( एखाद्याचे ) आसन स्थिरावणे ; जन्माची सोय लागणे ; थार्‍यास , ठिकाण लागणे ( कर्त्याची षष्ठी ).
०न   - ( कर्त्याची षष्ठी ) एखाद्याच्या पायाला भोवरा पडणे ; बूड स्थिर नसणे ; भटकभोवरी करणे .
थांबणे   - ( कर्त्याची षष्ठी ) एखाद्याच्या पायाला भोवरा पडणे ; बूड स्थिर नसणे ; भटकभोवरी करणे .
०मारणे   तळ घालून बसणे ; अर्थ २ पहा .
०लागणे   पडणे ( कर्माची षष्ठी ). ( सामग्री , बेगमी इ० ) जवळ जवळ फस्त होणे , संपण्याच्या बेतांत येणे . तळावर बसणे राहणे १ विपन्नावस्थेस येणे ; अवदशेस येणे ; अकिंचन होणे . २ ( ल . ) घरी बसणे ; समाईकीच्या वांटणीतील भागास मुकणे ( चोर , लुटारु त्यांच्यापैकी घरी बसणार्‍यास लुटीचा काहीही भाग देत नसत त्यावरुन . ) ३ धंद्याच्या ठिकाणी , नेहमीच्या जागी असण . ( एखाद्यास ) तळावर बसविणे एखाद्यास समाइक वाटणीतील भाग देणे ; त्याच्या कपाळी वाटाण्याच्या अक्षता लावणे . सामाशब्द -
०काठी  स्त्री. शिडाचे कापड तळाशी लांब ताणण्याकरिता वापरलेली काठी .
०कोंकण  न. सह्याद्री आणि समुद्र यांमधील देश ; कोंकण पट्टीचा दक्षिण भाग ; गोवे मुलुख व त्याजवळचा प्रदेश .
०खंड  न. ( कों . ) १ जात्याची खालची तळी ; ( सामा . ) जात्याच्या दोन तळ्यांपैकी कोणतीहि एक याअर्थी खालचे वरचे तळखंड असाहि शब्द प्रयोग करतात . २ खालचा भाग ; तळ ; उदा० भिंतीचे तळखंड असाहि शब्द प्रयोग करतात . ३ फणसाच्या चारखंडास आंतून चारीसारखा अंश ( पाती ) असतो व वर कांटे असतात त्यांच्यामध्ये जो दळदार भाग असतो तो .
०खडा  पु. खांब ज्यावर बसवितात तो दगड ; उथळ्याचा दगड .
०खप  पु. ( माल , व्यापारी जिन्नस इ० कांचा ) स्थानिक , तळावर होणारा , गांवातल्या गांवांत होणारा खप . या मालाचा तळखप कमी . - मुंव्या ४९ .
०घर  न. १ घराच्या तळमजल्याच्या खाली ( जमीनीच्या पोटांत ) मनुष्य इ० कास राहण्यासारखे केलेले स्थळ ; खोली ; दालन ; भुईघर . २ ( कु . ) माडी असलेल्या घराचा तळमजला . - शास्त्रीको .
०घाट  पु. १ पर्वताचा पायथा . पर्वताचा पायथा . पर्वताच्या पायथ्यालगचा प्रदेश ; घाटबुडी पहा . सह्यादी खालचा प्रदेश . [ तळ + घाट ]
०चेपणी  स्त्री. १ धान्याचा कणगा इ०कांचे बूड व्यापेल इतके पदार्थ धान्य इ० कांचे परिमाण . घागरभर रसाने या काहिलीची तळचेपणी मात्र होईल . [ तळ + चेपणी ]
०जमीन  स्त्री. भातजमीन . - शे ३ . ४ . [ तळ + जमीन ]
०झाडा  पु. १ ( घर , खोली इ० ) पूर्णपणे रिकामे करणे . २ खालपासून वरपर्यंत , कोनाकोपर्‍यांतून केलेली , घेतलेली ( घर इ० कांची ) झडती ; झाडा ; तपासणी . ३ ( खाद्य पदार्थ , धान्याची बेगमी इ० ). खाऊन फस्त ; चट्ट ; निःशेष करणे ; ( सामा . ) ( एखाद्या पदार्थाचा , बेगमीचा खाऊन केलेला ) चट्टामट्टा ; निःशेषता ; फन्ना ; फडशा . ४ ( स्वयंपाक , यज्ञ , इमारत इ० करिता ) जमीन झाडून , सारवून , साफसूफ करण्याची क्रिया . ५ ( सैन्य इ० काचा ) मुक्काम उठल्यानंतर ज्या ठिकाणी तळ असेल तेथे काही जिन्नस वगैरे राहिला आहे की काय हे पाहण्याकरिता केलेला शोध ; तपासणी ; तळशोधणी .
०तूट  स्त्री. व्यापारी जिन्नसांची स्थानिक तूट ; तुटवडा . तोच माल खरेदी करुन पाठवा असे लिहिल्यास त्या निशाणीचा माल बाजारात तळतूट असल्यास कमी किंमतीचा माल असला तरी ज्यास्त किंमत देऊन घ्यावा लागतो . - मुंव्या ५३ .
०पाय  पु. पावलाचा खालचा भाग ; पायाचा तळवा .
०पायाची   मस्तकास जाणे - तळची आग मस्तकास जाणे पहा .
आग   मस्तकास जाणे - तळची आग मस्तकास जाणे पहा .
०पूस  स्त्री. १ खाद्यपदार्थ खाऊन सप्पा , फस्त , निःशेष करणे ; ( सामा . ) ( खाद्यपदार्थांचा खाऊन पाडलेला ) फडशा ; फन्ना ; चट्टामट्टा . तळझाडा अर्थ ३ पहा . २ नायनाट . [ तळ + पुसणे ]
०बूड   १ वृक्ष इ० कांचा बुंधा ; तळ ; खालचा भाग . तंव तंव होती थोराडे । अकर्माची तळबुडे । आणि जन्मशाखा पुढेपुढे । घेती धांव । - ज्ञा १५ . १६८ . २ खळ्यांतील , धान्याची पेंवांतील ( धान्य इ० ने युक्त ) गाळसाळ ; गदळ ; झाडणी . हा महारांचा हक्क असतो .
०वट   पुन . १ माळ जमीनीचा प्रदेश ; मैदान . २ डोंगरांच्या पायथ्यालगतचा सपाट भूप्रदेश . ३ खालचा भाग ; अधोभाग . ना तरी कढेयातळवटी । जैसा आपुलाचि बोलु किरीटी । पडिसादु होऊनि उठी । निमित्त योगे । - ज्ञा १८ . ३२२ . कुंकुमातळवटी टिक लागे ।
०वणी  न. ( क्व .) जमीनीवरील ( नदी , नाले , ओढे , तळी इ० कांचे ) पाणी . वळवणी आले तळवणी घेऊन गेले . [ तळ + पाणी ]
०वाट  स्त्री. भुयाराची वाट ; चोरवाट .
०शोधणी  स्त्री. सैन्य इ० कांचा तळ उठल्यानंतर त्या ठिकाणी कांही राहिले की काय ते पुरतेपणी पाहण्याची क्रिया ; तळझाडा अर्थ ५ पहा . [ तळ + शोधणे ]
०सरा   सरी स्त्री . खांबाचा तळखडा ; उथळा .
०सांड   क्रिवि . जमीनीपासून निराळे ; तळापासून उचललेल्या स्थितीत ( ओझे इ० असणे ); जमीनसांड ; भुईसांड . [ तळ + सांडणे ] तळहात , तळात , तळाथ , तळाटा , तळाठा पु . हाताचा तळवा . [ तळ + हात ]
०हातचा   हातावरचा फोड - पु . ( ल . ) अत्यंत प्रिय व नाजूक वस्तु ; अत्यंत प्रिय व जिव्हाळ्याची व्यक्ति ( तळहातावर झालेल्या फोडास किंचितहि धक्का लागू नये म्हणून आपण फार जपतो यावरुन ). तळहाताच्या फोडासारखे वागविणे - बाळगणे - मानणे - ( एखाद्या वस्तूची , व्यक्तीची ) अतिशय काळजी घेणे ; जिवापाड प्रेम जपणे . तळहाताचा मळ - पु . ( ल . ) अल्प श्रमाने होणारे कोणतेहि काम ; सहज लीलेने करता येण्याजोगी गोष्ट . चित्रे काढणे हे त्याला तळहाताच्या मळाप्रमाणे आहे . या अर्थी हाताचा मळ असाहि शब्दप्रयोग रुढ आहे . तळहाताला केस येणे - अशक्य गोष्ट शक्य कोटीत येणे ( तळहाताला कधीच केस येत नसतात त्यावरुन हा अर्थ ). तळहाताला केस येणे - असमर्थ नसणे ; अंगांत धमक असणे . तळहातावर शीर घेणे - जिवाची तमा न बाळगणे ; ( एखाद्या कार्यासाठी ) मरणहि पत्करण्यास तयार होणे . तळाची आरी - स्त्री . ( चांभारधंदा ) जोड्याचा तळ शिवण्याची आरी . तळातळ - न . सप्त पातालापैकी चौथे पाताल . तलातल पहा . इणे जे नर बुडविले । ते नेले तळातळा । - जै ६४ . १९ . [ सं . तलातल ]

तळ     

तळ करणें
मुक्काम करून राहाणें
डेरा देणें
बिर्‍हाड लावणें
पेणें करणें
तात्‍पुरते राहणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP