Dictionaries | References

ठेवणें

   
Script: Devanagari
See also:  गाणें , टोपर

ठेवणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. This verb, used with the suspensive or ऊन form of the past participle of another verb, expresses either the laying up or putting by of the subject of some action; or the preservation of the state or appearance which the action has accomplished. Ex. हें पत्र लिहून ठेव; हें कापड घडी करून ठेव; ती गाय बांधून ठेव; शेतें पेरून ठेव; पिठांत पाणी घालून ठेव. Betwixt this verb and the verb टाकणें as used in this connection there are points of agreement and points of difference. The learner will be profited if he now study and apprehend them. ठेवणें & टाकणें agree in signifying completeness of action and the leaving or letting go of the subject; but whilst ठेवणें implies care and heed in order to the preservation of it, or to the maintenance of the effect produced upon it, टाकणें expresses an utter quitting and throwing off, a washing the hands of, a doing and dropping. Ex. त्याची पोथी त्यास देऊन टाक; रुपये देऊन फडशा करून टाक; तें झाड उपटून टाक. For illustration of ठेवणें see the five examples above.

ठेवणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To put, place, set, lay. To put up; to set aside. To preserve; to keep or hold inviolate.

ठेवणें     

 स्त्री. न . स्त्री . १ ( काव्य ) ठेव अर्थ १ पहा . गुप्तधन . राहाणें ठेवणीं सांपडती । - दा ९ . ८ . २१ . २ निक्षेप . ठेव अर्थ २ पहा .
टेपर ठेवणें पहा . दुसर्‍यावर ठपका ठेवणें .
स.क्रि.  १ राखणें ; स्थापणें ; मांडणें ; लावणें ; बाजूस काढणें . २ एका बाजूस टाकणें ; बिर्‍हाड मांडणें ; ( काम ) करणें . निराळें काढणें ; शिल्लक राखणें ; एखादें कार्य कांहीं काळ न करतां तसेंच राखणें . ३ राखणें ; वांचविणें ; राखून ठेवणें ; रक्षण करणें . ४ जागेवर कायम राखणें , होणें , स्थापन करणें , नियुक्त करणें ( काम , हुद्दा यावर ). ५ चाकरीस , नोकरीस , सेवेस राहवून घेणें किंवा बाळगणें ( चाकर , सैन्य ). ६ कायम राखणें ; जसेंच्या तसें जपून ठेवणें , राखणें ; जोपासना करणें ; अबाधित मानणें . यानें त्याची प्रतिष्ठा ठेविली . ७ घेऊन न जाणें ; जेथल्या तेथें पडूं देणें पेंढार्‍यांनीं कांहीं एक भांडें घरांत ठेविलें नाहीं . ८ रांड बाळगणें . ९ एखादी वस्तु संरक्षणासाठीं दुसर्‍याचे स्वाधीन करून त्याजकडे राखणें . [ सं . स्थापन ; प्रा . ठावण ] ( जेव्हां हें क्रियापद दुसर्‍या क्रियापदांच्या ऊन प्रत्ययांत धातु साधितांशीं योजतात , तेव्हां त्याचा अर्थ एखादी गोष्ट करणें , कोणत्याहि क्रियापदाच्या विषयाचें ठेवणें , किंवा तीच स्थिति राखणें , अथवा त्या क्रियेनें झालेली आविष्कृति असा होतो . जसें - हें पत्र लिहून ठेव ; हें कापड घडी करून ठेव ; ती गाय बांधून ठेव ; शेतें पेरून ठेव ; पिठांत पाणी घालून ठेव इ० ; ठेवणें हें क्रियापद आणि टाकणें हें क्रियापद यांमध्यें अर्थाच्या दृष्टीनें साधर्म्य व विषमताहि आहे . दोन्हीही क्रियापदें एखाद्या कृत्याची पूर्णता किंवा एखाद्या विषयाची पूर्णता दर्शवतात ; परंतु ठेवणें हें क्रियापद क्रियेमध्यें काळजी व लक्ष्य - विशेषत : राखून ठेवण्यांतील - कौशल्य दर्शवितें . तर टाकणें हें क्रियापद एखादी वस्तु दूर , लांब किंवा कायमची सोडून देणें , तिचा त्याग करणें , हात धुवून मोकळें होणें , किंवा दुर्लक्ष्य , हयगय इ० अर्थ दर्शवितें . जसें - त्याची पोथी त्यास देऊन टाक ; रुपये देऊन फडशा करून टाक ; तें झाड उपटून टाक इ० . यांत कसें तरी कार्य पूर्ण करण्याचा बोध होतो उलट ठेवणें क्रियापदाच्या स्पष्टीकरणार्थ वर दिलेलीं हें पत्र लिहून ठेव इ० उदाहरणें पहा . )
 न. ठेव अर्थ १ , २ पहा . कीं हें आदिशक्तीचें ठेवणें । - दा १ . ७ . ३० .

ठेवणें     

ठेवावी चांगली संगत, गणले जाल त्‍या संख्येत
आपण जर चांगल्‍या लोकांच्या सहवासात राहिलो तर त्‍या लोकांतच आपली गणना होऊन लोक आपणांस प्रतिष्‍ठित समजत जातील. वाईट लोकांच्या संगतीत राहिल्‍यास लोक आपणाबद्दल प्रतिकूल मत करून घेतील. A man is known by the company he keeps. (अ) सगः सतां किमुत मंगलमातनोति। (आ) सतां हि संगः सकलं प्रसूते।

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP