Dictionaries | References व वेढणें Script: Devanagari Meaning Related Words वेढणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To be covered with writing--a sheet of paper &c.; to be fully taken up. वेढणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Surround. Fig. Hem in. वेढणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उ.क्रि. १ घेरणें ; गराडणें ; गराडा घालणें ; वेढ , घालणें . २ एखाद्या पदार्थाभोंवतीं ( दोरी इ० ) गुंडाळणें ; लपेटणें ; वळसा , विळखा घालणें . हृदय हृदया लावुनी वेढ हातीं । - मंमं ३३ . ३ ( ल . ) ( अडचणी , संकटें इ० नीं ) चहूंबाजुंनीं घेरणें ; पाठपुरावा करणें ; सर्व बाजूंनीं अंगावर कोसळणें . ४ ( सामान्यतः वेढून घेणें ) कसें तरी नेसणें ; कमरेभोवतीं सरासरीनें गुंडाळून घेणें ( स्नान वस्त्रांतर इ० करावयाचें असतां ). ५ परिधान करणें ; नेसणें . जसे जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । - ज्ञा २ . १४४ . ६ ( ल . ) पादाक्रांत करणें ; ( देश , गांव इ० चा ) पूर्ण कबजा घेणें ; ताब्यांत घेणें ; व्यापून टाकणें . प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें । तें जयाचिये यशा धाकुटें । वेढूं न पुरे । - ज्ञा ६ . १०९ . - अक्रि . १ ( कागद , भिंत इ० ) चित्रें , अक्षरें इ० नीं व्यापला जाणें ; लिहून भरला जाणें . २ ( कोणी मनुष्य ) कामाखालीं दडपून गेलेला असणें . [ सं . वेष्टन ; प्रा . वेढण ] वेढा - पु . १ गराडा ; फेरा ; घेरा . ( क्रि० घालणें ). २ ( एखाद्या पदार्थाभोंवतीं घातलेला दोरी इ० चा ) विळखा ; फेरा . ३ मळसूत्र , भोंवरा इ० चा स्वतांच्या आसाभोंवतीं होणारा एक सबंध फेरा , गिरकी ; मध्यबिंदूभोंवतीं किंवा स्वतःभोंवतीं फिरणार्या पदार्थाची एक फेरी ; गिरकी ; वर्तुळ . ४ मात्रा इ० सहाणेवर उगाळतांना होणारा तिचा एक वळसा . [ सं . वेष्ट् ]०घालणें देणें - एखाद्या शहराला किंवा किल्ल्याला गराडा घालणें ; भोंवतालीं सैन्याचा फेरा पडणें ; कोंडून धरणें ; घेरणें ; वेढणें .०रिगणें रिघणें - ( काव्य ) भ्रमण करूं लागणें . भ्रामकाचेनि संगें । जैसें लोही वेढा रिगे । - ज्ञा १८ . १३११ . वेढाळणें - ( काव्य ) वेष्टणें ; वेढणें . मी मज माझियानि वेढाळिलें बाई - निगा ८२ . - अक्रि . वेढला जाणें . - गीता २ . ५९ . वेढिता - वि . नेसणारा . वेढें - न . हाताच्या किंवा पायाच्या बोटांत घालावयाचें सोनें - चांदीचें वळें ; जाड आंगठी ; वेढणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP