Dictionaries | References

वेठ

   
Script: Devanagari
See also:  वेंट , वेंठ , वेट

वेठ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
vēṭha or vēṇṭha m f P Commonly वेट or वेंट.
The money paid together with the old vessels. वेठ करणें or काढणें To do in a slurring, slubbering, heedless manner. वेठीचें करणें Superficial and careless execution or performance.

वेठ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  A twist (of grass, &c.). A contortion of the bowels. A roll (around anything) of a rope.
 f  Press-service. A load or a burden carried by a person or an animal pressed.

वेठ     

ना.  बिगार , मोफतचे काम , सक्तीचे काम .

वेठ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  मजुरीवाचून करावे लागणारे काम   Ex. जमीनदार शेतकर्‍यांकडून वेठीने काम करवून घेत असत
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बिगार
Wordnet:
asmবিনা মজুৰি
bdबैगार होनाय
gujવેઠ
hinबेगार
kanಪುಕ್ಕಟೆಕೆಲಸ
kasبٮ۪گٲرۍ
kokविठबिगारी
malനിര്ബന്ധിതജോലി
mniꯈꯨꯠꯁꯨꯃꯜ꯭ꯄꯤꯗꯕ꯭ꯊꯕꯛ
nepबेकार
oriବେଠି
panਵਗਾਰ
tamஅடிமை
telవెట్టిచాకిరిచేయువాడు
See : बिगार

वेठ     

 पु. 
  1. वेट पहा .
  2. वळलेल्या चर्‍हाटाचे जे अनेक पेढ असतात ते प्रत्येक . 

( महानु . ) पेठ ; उतारपेठ . की धर्माची उत्तर वेंठ । - ऋ ११ .
 स्त्री. 
  1. बिगार ; रोख मेहनतान्यावांचून करावें लागणारें काम . - गांगा ४९ . मजुरी न देतां अंमलदार , जमिनीचा मालक , खोत इ० नीं करवून घेतलेलें काम . गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहतां मेलें । - तुगा १७० . ( कायदा ) कोणा मनुष्याकडून त्याच्या संमतीवांचून काम करून घेणें . ( इं . ) कपल्सरी लेबर . 
  2. पैसे न देतां खोत , सरकारी अंमलदार इ० नीं कुळें किंवा रयत यांपासून अधिकाराच्या जोरावर घेतलेले जिन्नस् ‍ ; खोतवेठ . ३ जुलमानें मनुष्य किंवा जनावर यांकडून वाहून नेलेलें ओझें . [ सं . विष्टि ; प्रा . विठ्ठि , वेठ्ठि ; ते . वेट्टि ] म्ह० १ वेठीच्या घोडयास तरवडाचा फोंक . 
  3. ( गो . ) वेठीधर्मान गोंय ( वेठीला धरून नेल्यानें गोवें पहाण्यास मिळालें ) = वाइटांतून चांगलें निघणें . 

वेठण , वेठन  न . 
  1. नांगराचें जोखड टेरूंजवळ इसाडास जोडण्याचा दोर ; जुंपण व इतर दोर ; विणकर्‍याच्या राहाटाचा दोरखंड ; तेगार . ( सामा . ) सर्व आउतांस येटक घालण्यास लागणारी दोरी . 
  2. ( कों . ) सुंभाची जाड दोरी ; चर्‍हाट . 
  3. गाडी इ० कामासाठीं जोडणें ; गाडीवर सरंजाम घालणें . 
  4. ( कुण . ) खुबी ; सफाई ; हातोटी ; कसब ; उद्योगधंद्यांतील कौशल्य . 
  5. वेष्टन पहा . 
  6. घोडयावरील मांड . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ] 

एखाद्याला वेठीस धरणें    आपलें काम करण्यासाठीं एखाद्याला भाग पाडणें ; फुकट काम करण्यासाठीं धरणें ; ताबडणें .
वेठीचें करणें, वेठीचें वारणें   न .   वरवर , कसें तरी , निष्काळजीनें केलेलें काम ; हलगर्जीपणाचें काम ;
०करणें, वळणें काढणें   कसेंबसें , कसें तरी , निष्काळजीनें काम करणें .
वेठकरो,वेठया, वेठी  पु . 
  1. वेठीस धरलेला माणूस ; बिगारी .
  2. ( सामा . ) हमाल . राबेत तेथें कितियेक वेठे । - सारुह ३ . ३१ .

०बिगार, ०विरळा  स्त्रीपु  
  1. वेठीनें करविलेलें काम ; बिगार ; वेठ पहा .
  2. वेठीनें काम करवून घेण्याचा खोत इ० चा हक्क .

वेठी वेठें वेठया  पु . नपु . बिगारी . नाहींवेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । - तुगा ३६० .
आठलावेठला वि  दोर्‍या , बंद इ० नीट बांधून तयार केलेला ; व्यवस्थित रीतीनें जोडलेला ; सज्ज केलेला
वेठणें उक्रि .  
  1. गाडी , नांगर , कुळव इ० ला वेठण बांधणें ; जोखड आणी इसाड वेठाणानें एकत्र बांधून गाडा , नांगर इ० कामाला तयार करणें .
  2. ( दोर्‍या , जोखड इ० ) एकत्र जोडणें , बांधणें ; जुंपणें .
  3. ( सामा . ) वेढणें पहा . सज्ज तयार होणें . वेठला शब्दाच्या द्वैशक्तीनें आठूनवेठून , आठलावेठलां असे प्रयोग येतात . 

वेठणें  अक्रि   
  1. वेष्टलें जाणें ; बांधलें जाणें . आणि पूर्णाहंता वेटलों - अमृ १० . १५ . ते भोगावरी न वेठती । त्यागावरी न नुठती । - एभा १ . ४८ .
  2. पोशाख करणें ; धारण करणें . जैसा पुरुष वेंठे । तैसी तैसी छाया नटे । - एभा २ . ६६ . [ सं . वेष्टन ; प्रा . वेठ्ठण ]

वेठणें क्रि .  वेठीला धरणें ; आपल्या कदरेंत घेऊन मर्जीप्रमाणें काम करावयास लावणें . - ज्ञा १८ . १४५९ . पुंडलिकें पितरांस्तव वीटेवर वेठिलें विठोबाला । - गोखलेकृत देवी . सुशील .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP